
Mehmood : मुलाच्या जन्मानंतर हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी मेहमूदच्या खिशात एक पैसा ही नव्हता!
साठ आणि सत्तर च्या दशकात आपल्या कॉमेडीने चित्रपटातील नायकांवर देखील भारी पडणारा कलाकार म्हणजे विनोदी कलावंत मेहमूद. साठच्या दशकात त्याचा पडद्यावरच वट एवढा जबरदस्त होता की अनेक मोठे कलाकार त्याच्या सोबत चित्रपटात घ्यायला घाबरत होते. कारण मेहमूद चित्रपटात असला की त्याचीच चर्चा जास्त व्हायची नायकाला कोणी विचारतच नसायचे.त्या मुळे अनेक बडे सितारे मेहमूद पासून चार हात दूरच रहाणे पसंत करायचे! पण मेहमूद ला हे यश सहजासहजी मिळालं नव्हतं. सुरुवातीला त्याला खूप स्ट्रगल करावा लागला होता. त्याच्या इतका स्ट्रगल कदाचित दुसऱ्या कुठल्या अभिनेत्याने केला असेल. (Mehmood)

अर्थात याला तो स्वत: देखील जबाबदार होता. तो गुणी कलाकार होता पण आपल्या करिअर बाबत सिरीअस नव्हता. त्या मुळे त्याच्या तील या अव गुणांनी त्याला प्रस्थापित व्हायला खूप काळ लागला. त्याच्या स्ट्रगल पिरेड मध्ये अनेक संकटं आली. अभिनेत्री मीनाकुमारीची बहीण मधु हिच्या सोबत त्याने निकाह केला होता. खरंतर मेहमूद मीनाला टेबल टेनिस शिकवायला तिच्या घरी जात असे. त्याच वेळी मधू सोबत त्याची आंख मिचौली झाली. दोघे प्रेमात पडले. खरंतर या लग्नाला दोन्ही घरातून मोठा विरोध होता कारण मेहमूद तेंव्हा काहीच करत नव्हता. अक्षरशः आवारा गर्दी चालू होती. पण तरीही दोघांचे एकमेकावर अतोनात प्रेम होते आणि घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी लग्न केले. (Bollywood tadaka)
लग्न झाल्यानंतर तरी मेहमूद सुधारेल असं वाटत होतं पण त्यात अजिबात सुधारणा होत नव्हती. मेहमूद च्या घरी अठरा विश्व दारिद्र्य. (त्याचे वडील मुमताज अली एकेकाळी बॉम्बे टोकीज चे नट. पण व्यसनाने घराची वाट लागली होती.) त्यामुळे घरात सतत वाद होत असे. या वादातूनच मेहमूदने आपल्या वडिलांचे घर सोडले आणि तो आपल्या बायकोसोबत स्वतंत्र राहू लागला. याच काळात त्याची बायको प्रेग्नेंट होती. त्यावेळेला मेहमूदची आई त्याच्या मदतीला आली. जेव्हा त्याच्या पत्नीला डिलिव्हरीसाठी दवाखान्यात ऍडमिट केले. (Entertainment classic news)

त्यावेळेला त्याच्या खिशात एकही पैसा नव्हता. लोकप्रिय अभिनेत्री मीनाकुमारी ची बहिण असल्यामुळे त्याने सरकारी दवाखान्याच्या ऐवजी एका खाजगी प्रसूती गृहात तिला ऍडमिट केले. परंतु त्याला काळजी होती बिल किती होईल आणि ते बिल कसे द्यायचे याची! मेहमूद ची आई त्याला म्हणाली ,” तुझ्या वेळी जेव्हा मी दवाखान्यात ऍडमिट झाले तेव्हा मी खुदाकडे मला मुलगा व्हावा म्हणून अशी प्रार्थना केली आणि तुझा जन्म झाला तू देखील आता अशीच प्रार्थना कर!” त्यावर मेहमूद म्हणाला,” मला मुलगा होईल की मुलगी यापेक्षाही दवाखान्या चे बिल मला कसं भरता येईल याची काळजी आहे!” अखेर १४ जून १९५३ या दिवशी डिलिव्हरी झाली. मेहमूद बाप बनला. घरात सर्वत्र आनंद झाला. (Mehmood stories)
पण मेहमूद मात्र हॉस्पिटलचे बिल कसे पे करायचे याचीच चिंता होती. योगायोगाने ज्या दिवशी मेहमूद च्या पत्नीला डिस्चार्ज मिळणार होता; त्या दिवशी मीनाकुमारी आपल्या भाच्याला बघण्यासाठी आली. रितीप्रमाणे ‘मुंह दिखाने कि रस्म’ मध्ये तिने मधुच्या बाळाच्या हातात शंभर रुपये दिले ते पैसे पाहिल्यानंतर मेहमूदना खूप आनंद झाला. मीनाकुमारी गेल्यानंतर त्याने लगेच ते पैसे घेतले आणि तडक तो हॉस्पिटलच्या अकाउंट सेक्शनला गेला आणि बिल भरून टाकले. १९५३ साली प्रायव्हेट नर्सिंग रूमचे बिल ३५ रुपये झाले होते आणि इतके पैसे देखील मेहमूद भरू शकत नव्हता. मीना कुमारी आल्यामुळे त्याला ते पैसे भरता आले. मेहमूद ला आता आपलीच शरम वाटू लागली. त्याने आपल्या करीअरला सिरिअस ली घ्यायचे ठरवले. (Entertainment)
==============
हे देखील वाचा : Suresh Wadkar : ‘ही’ गजल गायल्यावर सुरेश वाडकर का अस्वस्थ होते?
==============
काळ कधीच सारखा राहत नाही. मुलाच्या आगमनानंतर मेहमूद आपल्या करिअर बाबत सिरीयल झाला आणि हळूहळू त्याला यश मिळत गेले. आणि पुढच्या पाच दहा वर्षातच मेहमूद अक्षरशः सुपरस्टार झाला! (Bollywood untold stories)