Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ek Goan Ki Kahani चित्रपटाला ५० वर्ष पुर्ण!

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेता सौरभ गोखले झळकणार ‘फौजी’च्या भूमिकेत  

 अभिनेता सौरभ गोखले झळकणार ‘फौजी’च्या भूमिकेत  
kalakruti-actor-saurabh-gokhale-to-play-fauji-character-marathi-info/
मिक्स मसाला

अभिनेता सौरभ गोखले झळकणार ‘फौजी’च्या भूमिकेत  

by शुभांगी साळवे 16/06/2023

हल्ली अनेक वेगवेगळ्या विषयावर नवनवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागले आहेत. केवळ लव्ह स्टोरीवरच बांधील न राहता अनेक वेगळ्या धाटणीचे सिनेमे आता बनु लागले आहेत. त्यातलाच एक विषय म्हणजे देशप्रेम. सैन्य, लढाई या सारख्या विषयावर सुद्धा आना सिनेमे तयार होऊ लागले आहेत. याच विषयाशी निगडित फौजी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा विषय जसा वेगळा आहे तसाच या सिनेमात दिसणारा अभिनेता सुद्धा आपल्या अभिनयाने सिनेमाला न्याय देणाराच आहे.आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि जाहिरात विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपत रसिकांना मनमुराद आनंद देणारा हा अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या ‘रफ अँड टफ’ भूमिकेत दिसणार आहे. कमांडोच्या वेशातील सौरभचा नवा लूक नुकताच समोर आला आहे. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटामध्ये एका निडर सैनिकाची भूमिका तो साकारत आहे. (Saurabh Gokhale)

Saurabh Gokhale
Saurabh Gokhale

मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम येडे निर्मित आणि दिग्दर्शित ‘फौजी’ देशाचा प्राण, ‘आन बान शान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फौजी’ सिनेमाच्या निमित्ताने मला सैनिकाची भूमिका साकारायला मिळाली असून त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग सध्या मी घेत आहे.देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकाची भूमिका साकारणं हे माझ्यातील अभिनेत्यासाठी आनंददायी तितकेच आव्हानात्मक आहे, असं सौरभ सांगतो.सौरभ ने नुकतीच नवा गडी नव राज्य या मालिकेत सुद्धा  एंट्री केली आहे. आणि एक वकिलाच्या भूमिकेतुन तो या मालिकेमध्ये पहायला मिळतोय.अभिनेता सौरभ गोखले यांच्यासोबत प्राजक्ता गायकवाड, नागेश भोसले,  शहाबाज खान, अरुण नलावडे, कल्याणी चौधरी, संजय खापरे, अश्विनी कासार, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, जयंत सावरकर,सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

Saurabh Gokhale
Saurabh Gokhale

शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉट बॉय ते निर्माता दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला असून, चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा तर संकलन विश्वजीत दोडेकर यांचे आहे. (Saurabh Gokhale)

=============================

हे देखील वाचा: महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग

=============================

साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी तर वेशभूषा नाशीर खान यांची आहे. निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी महेश चाबुकस्वार यांनी सांभाळली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Saurabh Gokhale Entertainment fhauji marathi movie maratho movie saurabh gokhale
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.