Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं

Ajit Pawar यांनी स्वत:च्या बायोपिकमध्ये ‘या’ कलाकाराने काम करावं असं सुचवलं होतं!
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावून गेलं… कामाचा माणूस अशी ओळख असणाऱ्या अजित दादांना निरोप देताना लोकं भावूक झाले होते… दादांच्या निधनानंतर त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, अशातच अजित पवार यांनी त्यांच्यावर जर का बायोपिक आला तर कुणी काम करावं हे नाव सांगितलं होतं.. जाणून घेऊयात ते नाव… (Ajit Pawar Death News)
अजित पवार यांचं भाषण हे कायम ऐकावं असंच राहिलं आहे… त्यांचं मिश्किल हास्य, विनोद हे आपल्याला भावले. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात त्यांनी बायोपिकविषयी मत मांडलं आहे. यामध्ये अवधूत गुप्ते अजित पवार यांना विचारतो “द अजित पवार नावाचा बायोपिक आला तर त्यात कोणत्या अभिनेत्याने तुमची भूमिका साकारावी?”. त्यावर उत्तर देताना क्षणाचाही विलंब न करता अजित पवार यांनी “डॉक्टरने करावं असं वाटतं” असं उत्तर दिलं होतं. शेजारीच उभ्या असलेल्या निलेश साबळेचं नाव घेतल्याने निलेश साबळेदेखील अचंबित झाला होता. (Nilesh Sabale)

जेव्हा अजितदादांनी त्याचं नाव घेतलं यावर निलेश म्हणाला की, “मी किती चांगली नक्कल करायचो हे माहीत नाही पण, हे लोकांना आवडायचं. पण मला माहित नव्हतं की, दादा स्वतः बघतात. पण, आता मला कळलं आहे. त्यामुळे आता जरा जास्तच जपून करायला पाहिजे”.
================================
================================
पुढे अजितदादा म्हणाले की, ‘मी पण कधी कधी ते काय बोलतात ते बघत असतो. आम्ही पण आरशासमोर प्रॅक्टिस करत बोलत नसतो. आम्ही एकदा माईक हातात आल्यानंतर जे विचार पटतात त्या पद्धतीने बोलत असतो. परंतु यांनी बऱ्याचदा ‘या ठिकाणी, या ठिकाणी’ माझी नक्कल करताना म्हटलं होतं. मी तेव्हापासून ठरवलं की, हा शब्द जेवढा कमीत कमी वेळा वापरता येईल तेवढा वापरेन. तुम्ही बघा त्यानंतरच्या काळात हा शब्द मी कमी केला आहे. त्यामुळे डॉक्टर तुम्ही अधून मधून माझी अशी नक्कल करत चला आणि मग त्यातून मलाही कळेल, आपलं काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. आणि त्याप्रमाणे मला दुरुस्ती करता येईल”. अजित दादांच्या या उत्तराने सगळ्यांनाच हसू आवरेनासं झालं होतं… (Ajit Pawar Biopic)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi