Kiran Mane ‘भिकारचोटांनी इंडस्ट्री भरली’ किरण माने यांची ‘या’ अभिनेत्यावर
Akhtar Mirza : ‘नया दौर’च्या कथेची निवड कशी झाली?
पन्नास आणि साठच्या दशकामध्ये अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) यांचे मोठे नाव होते. ते चांगले कथालेखक पटकथाकार होते. एकदा त्यांनी लिहिलेल्या बावरे नैन, नया दौर, वक्त, जोशीला या चित्रपटांनी मोठे व्यवसायिक यश मिळवले होते. पन्नासच्या दशकाच्या मध्यावर एकदा ते B. R. Chopra यांना एक कथा ऐकण्यासाठी गेले. बी आर चोप्रा यांना ती कथा खूप आवडली आणि लगेच त्यांनी सायनिंग अमाऊंटचा चेक देखील देऊन टाकले.
चेक घेतल्यानंतर अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) म्हणाले मी आणखी एक कथा तुम्हाला सांगू का? बी आर चोप्रा म्हणाले सांगा. आता अख्तर मिर्झा यांनी दुसरी कथा त्यांना सांगायला सुरुवात केली. या नंतर मात्र बी आर चोप्रा म्हणाले, ”माफ करा. अख्तर साहेब. मी आता तुमच्या कथेवर सिनेमा आता बनवू शकत नाही!” अख्तर मिर्झा यांना खूप वाईट वाटले. पण खरी गंमत पुढेच आहे. काय होता हा नेमका किस्सा?
अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) पन्नासच्या दशकांमधले एक गाजलेले स्टोरी रायटर होते. ‘बावरे नैन‘ (१९५१) पासून ते विशेष चर्चेत होते. पण मोठे निर्माते त्यांना मिळत नव्हते. ते एकदा आपली कथा ऐकवण्यासाठी बी आर चोप्रा यांच्याकडे गेले. पहिली कथा त्यांनी सांगितली. ती चोप्रा साहेबांना खूप आवडली लगेच त्यांनी सायनिंग अमाऊंट चेक देखील दिला. मिर्झा खूश झाले. बी आरसारखे मोठे निर्माते आपली कथा सिनेमासाठी ऐकतात काय आणि लगेच चेक देतात काय सारंच कल्पनातीत होतं.
चेक घेतल्यानंतर मिर्झा (Akhtar Mirza) साहेब म्हणाले मी आणखी एक कथा तुम्हाला ऐकवतो नंतर त्यांनी चोप्रा यांना दुसरी एक कथा ऐकवली जी अनेक निर्मात्यांनी डावलली होती. ही कथा ऐकल्यानंतर मात्र बी आर चोप्रा म्हणाले, ”माफ करा. मिर्झा साहेब आता मी तुमच्या कथेवर चित्रपट बनवू शकत नाही!” अख्तर मिर्झा यांना हा मोठा धक्का होता. अगोदर त्यांना खूप वाईट वाटले. हाती आलेली संधी चालली गेली असे वाटले. ते स्वतःला देखील दोष देऊ लागले.
आपल्याला कशाला अशी दुर्बुद्धी झाली? आपण कशाला दुसरी कथा त्यांना ऐकवली? आपली दुसऱ्या कथानकवर तर कुणीच सिनेमा बनतच नाही आणि पहिली कथा जी बी आर यांना आवडली होती ते देखील आता देखील सिनेमा बनवत नाही! मूर्खपणा नडला. अख्तर (Akhtar Mirza) मनातल्या मनात स्वत:ला कोसू लागले. तरी त्यांनी बी आर चोप्रा यांना विचारले, ”चोप्रा साहेब, तुम्ही काही वेळापूर्वी माझी कथा खूप चांगली आहे म्हणून माझ्याकडून विकत घेतली आणि आता तुम्ही म्हणता चित्रपट बनवता येत नाही?”
त्यावर बी आर चोप्रा हसले आणि म्हणाले, ”मिर्झा साहेब बरोबर आहे. मी तुमच्या पहिल्या कथेवर आता चित्रपट बनवणार नाही. कारण आता मी आता तुमच्या दुसऱ्या कथेवर चित्रपट बनवणार आहे. कारण ही कथा मला जास्त चांगली वाटली.” आता अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) यांना हायसे वाटले अनेक निर्मात्यांनी जी कथा नाकारली होती त्या कथेवर बी आर चोप्रा यांनी एक उत्तम सिनेमा बनवला. ज्या सिनेमाने पन्नासचे दशक गाजवले तो चित्रपट होता ‘नया दौर’.
सिनेमा सुपर डुपर हिट झाला. त्या वर्षीचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला पहिला अर्थातच मदर इंडिया. या सिनेमासाठी अख्तर मिर्झा (Akhtar Mirza) यांना सर्वोत्कृष्ट कथेचे फिल्मफेअर अवार्ड मिळाले. बी आर चोप्रा यांचे अख्तर मिर्झा लाडके बनले. पुढे वक्त आणि धुंद या गाजलेल्या सिनेमाचा कथा आणि पटकथा अख्तर मिर्झा यांनी लिहिल्या होत्या.
============
हे देखील वाचा : Balraj Sahni : बलराज सहानी यांनी वाचवले मीना कुमारीचे प्राण!
============
आता थोडंसं नया दौर या चित्रपटाबद्दल. हा सिनेमा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा सिनेमा होता. श्रमशक्ती विरुद्ध यंत्र शक्ती असा तो लढा होता. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणार हा चित्रपट होता. असं असलं तरी हा सिनेमा प्रचारकी थाटाचा नव्हता तर निखळ मनोरंजन करणारा चित्रपट होता. मनोरंजनाच्या माध्यमातून चांगला सामाजिक संदेश यातून दिला होता. या चित्रपटाच्या दरम्यान प्रचंड घडामोडी झाल्या होत्या आधी मधुबाला या सिनेमात काम करणार होती नंतर तिच्याजवळ वैजयंतीमाला आली. Dilip Kumar यांनी अभिनय केलेला आणि संगीतकार ओपी नय्यर यांचा हा एकमेव चित्रपट आहे. २००७ साली हा चित्रपट कलर होऊन पुन्हा एकदा प्रदर्शित झाला होता.