
इम्रान हाश्मीसोबत झळकणार Akshaya Naik; म्हणाली, “सेटवर डोकं शांत ठेवून काम कसं करावं याचं..”
मराठमोळी अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) गेल्या काही काळापासून उत्तमोत्तम कलाकृतींचा भाग होताना दिसत आहे… नुकत्याच नेटफ्लिक्सवरील ‘ग्रेटर कलेश’ या वेबफिल्ममधून च्या माध्यमातून अक्षयाने हिंदी ओटीटोविश्वात दमदार पदार्पण केलं होतं… पहिल्याच ओटीटी पदार्पणात अक्षयाने सिक्सर मारला आणि आता थेट इम्रान हाश्मीसोबत (Emraan Hasmi) अक्षयला स्क्रिन शेअर करणार आहे.. नेटफ्लिक्सवरील आगामी तस्करी या वेब सीरिजमध्ये अक्षया नाईक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. (Netflix Web series)

दरम्यान, इम्रान हाश्मीसोबत काम करण्याचा अनुभव अक्षयाने सोशल मिडियावर एक फोटो शेअर करत व्यक्त केला आहे… तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘सेटवर डोकं शांत ठेवून काम कसं करावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इम्रान हाश्मी ! त्यांच्यासोबत माझे अगदी दोन-तीन छोटे सीन होते; पण त्यांचा अभिनयातील आँरा खूप काही सांगून आणि शिकवून गेला, त्यांच्या या कामाच्या पद्धतीचं निरीक्षण करून या मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर फायदा करून घेत होते. जेव्हा जेव्हा त्यांच्यासोबत चित्रीकरण असायचं, तेव्हा त्यांच्याच ‘दिल तो बच्चा है जी’ या सिनेमातलं ‘अभी कुछ दिनों से, लग रहा है, बहके बहके से हम हैं।’ हे गाणं कानात वाजायचं, पहिल्या वेब शोमध्ये त्यांच्यासोवत काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे”.. (Taskaree Web series)
================================
================================
दरम्यान, अक्षया नाईकने यापूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून लोकांच्या मनात घर निर्माण केलं… याव्यतिरिक्त ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्येही भूमिका साकारली होती. ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ नाटक, ‘बॅनर चोर’, ‘सावधान इंडिया’ अशा बऱ्याच प्रोजेक्ट्सचा ती भाग होती… (Entertainment News) तसेच, ‘तस्करी’ ही वेब सीरीज १४ जानेवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे… नीरज पांडे यांच्या या सीरीजमध्ये इम्रान हाश्मी, अनुजा साठे, अनुराग सिन्हा, अमृता खानविलकर असे बरेच कलाकार झळकार आहेत…
काही महिन्यांपूर्वी इम्रान हाश्मी ‘हक’ चित्रपटात दिसला होता… या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचवेळी अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) याने फार महत्वाचं विधान केलं होतं.. तो म्हणाला होता की, “हा चित्रपट प्रत्येक मुस्लिम बांधवाने पाहायला हवा”…. सुपर्ण वर्मा दिग्दर्शित ‘हक’ या चित्रपटात शाह बानो यांची भूमिका यामी गौतम साकारणार असून तिच्यासोबत इम्रान हाश्मी, शिबा चड्डा, वर्तिका सिंग, दानिश हुसैन यांच्याही महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत… हक हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी देशभरात रिलीज होणार आहे… (Haq movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi