Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!
नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून फार चर्चा रंगली आहे… प्रभू श्री राम आणि रावण यांची अमर कथा रामायण चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर झळकणार असून हा हिंदी चित्रपटसृष्टीतला पहिला बिग बजेट चित्रपट आहे… दरम्यान, ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक आज ३ जूलै २०२५ रोजी रिलीज झाली असून चित्रपटाची अधिकृत कास्ट जाहिर करण्यात आली आहे… आता या अनाऊसमेंट व्हिडिओवर आलिया भट्टने (Alia Bhatt) प्रतिक्रिया दिली असून ती भावूक झाली आहे…(Bollywood News)

रामायण चित्रपटाच्या अनाऊसमेंट व्हिडिओतून ‘रामायण’ या महाकाव्याची एक जादूई आपल्याला अनुभवण्यास मिळते… टीझरची सुरुवात होते ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्यापासून. या विश्वाचा समतोल ब्रह्मा (सृष्टीकर्ता), विष्णू (पालक) आणि शंकर (संहारक) या त्रिकुटामुळे टिकून असतो. मात्र या संतुलनातूनच उगम होतो एका अनोख्या राक्षस बालकाचा जो पुढे रावण बनतो. त्याला थोपवण्यासाठी विष्णू स्वतः मानवी रुपात श्रीरामाचा अवतार घेऊन पृथ्वीवर येतात, असं या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. टीझरच्या शेवटी प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर (Ranbir Kapoor) तर रावणाच्या भूमिकेत साउथ सुपरस्टार यश (Yash) यांची हलकी झलक पाहायला मिळते… (Latest Entertainment News)
================================
हे देखील वाचा: Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!
=================================
दरम्यान, आलियाने हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत लिहिले आहे की, “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात. हे पाहून असं वाटतंय की अविस्मरणीय गोष्टीची ही सुरुवात आहे. दिवाळी २०२६ ची वाट पाहतोय”. रामायण सिनेमात रणबीर कपूर— श्रीरामांच्या भूमिकेत, यश — रावण या सशक्त भूमिकेत, साई पल्लवी— सीता, सनी देओल— हनुमान, रवी दुबे — लक्ष्मण अशा कलाकारांची फौज असणार आहे. २०२६च्या दिवाळीत या सिनेमाचा पहिला भाग रिलीज होणार आहे. आजवर प्रभू श्रीराम यांचं जीवन विविध माध्यमांतून सादर करण्यात आलं… मात्र, मल्टिस्टारकास्ट असणाऱ्या ‘रामायण’ चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत…(Alia Bhatt social media post)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi