Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

एकाच कथानकावरील Amitabh Bachchan आणि Rajesh Khanna यांच्या सिनेमांची टक्कर!
सुपरस्टार राजेश खन्ना यांचे सुपरस्टार पद अमिताभ बच्चन सत्तरच्या मध्यावर हासील केले. ‘जंजीर’ या चित्रपटाच्या नंतर अमिताभ बच्चन यांचा जलवा सुरू झाला. राजेश खन्नाची रोमँटिक इमेज मागे पडली आणि अमिताभच्या अँग्री यंग मॅन चा तरुणाईवर मोठा ठसा उमटला! असं असलं तरी राजेश खन्ना हार म्हणायला तयार नव्हता. तो स्वतःला अजूनही सुपरस्टारच समजत होता आणि अमिताभ बच्चनच्या चित्रपटाला शह कसा देता येईल याचा कायम विचार करत असायचा. ऐंशीच्या दशकात देखील त्यांच्यातील हे कोल्ड वॉर चालूच होतं. १९८४ साली या दोघांच्या सारख्याच कथानकावर असलेल्या चित्रपटांनी मोठा हंगामा निर्माण केला होता.
एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोघे सोडत नव्हते. त्यातूनच हे दोन सिनेमे एकमेकांच्या समोर उभे राहणार होते. मीडियामध्ये या दोन सिनेमाबद्दल त्या काळात भरपूर चर्चा होत होती. या संघर्षात अमिताभला चक्क आजारी असताना त्याच्या चित्रपटाचा शूटिंग प्रीपोन्ड करून सलग चाळीस दिवसाचे शूट करावे लागले होते! आणि हा चित्रपट जो खरं तर सहा महिन्यानंतर प्रदर्शित होणार होता तो ताबडतोब प्रदर्शित करून टाकावा लागला होता. हे कोणते दोन चित्रपट होते ज्यामुळे एवढा हाय व्होल्टेज ड्रामा घडला होता? मोठा इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये मध्यंतरी यावर लिहिलं होतं.

चार नोव्हेंबर १९८३ या दिवाळीच्या दिवशी अमिताभ बच्चन यांचा पुन्हा एक मोठा अपघात घडला. त्या दिवशी फटाके उडवताना त्याच्या डाव्या हातामध्ये एक फटाका फुटला आणि अमिताभ बच्चन यांचा डावा हात पूर्णपणे भाजला गेला. अक्षरशः मांस वितळले गेले. प्रथमोपचारा नंतर डॉक्टरांनी त्याला ताबडतोब स्किन ग्राफ्टिंग साठी अमेरिकेला जाण्याचा सल्ला दिला. त्या नुसार अमिताभ त्याच्या कुटुंबीयांसोबत दिल्लीला रवाना झाला परंतु तिथे घडल्यानंतर वेगळंच नाट्य समोर आलं. अमिताभ बच्चन हाताच्या दुखापती वर इलाज करण्यासाठी अमेरिकेला जात आहे आणि पुढचे दोन तीन महिने काही येत नाही ही बातमी राजेश खन्नाच्या गोटात कळाली आणि त्यांनी ताबडतोब एक सिनेमा लॉन्च केला. दासरी नारायण राव दिग्दर्शित हा सिनेमा होता ‘आज का एमएलए राम अवतार’.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
या सिनेमाचं दहा दिवसाचं ओपनिंग शेड्युल देखील अनाउन्स झाले. ११ नोव्हेंबर १९८३ दिवशी या सिनेमाचे शूट सुरु ही झाले! ही बातमी कळल्यानंतर अमिताभ बच्चनचा फ्लोअरवरील चित्रपट ‘इन्कलाब’ त्याचे दिग्दर्शक टी रामाराव आणि निर्माते एन वीरा स्वामी आणि व्ही रविचंद्रन एकदम टेन्शन मध्ये आले. त्यांनी ताबडतोब अमिताभ बच्चन यांना फोन केला आणि आपली काळजी बोलून दाखवली. अमिताभ ने त्यांना सांगितले,” मी आता अमेरिकेला जाण्यात चा विचार करतो आहे” त्यावर हे तिघे म्हणाले,” थांबा. कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी आपण भेटू यात!” आणि रात्रीच्या फ्लाईटने हे तिघेही दिल्लीला अमिताभला भेटायला गेले त्यांच्यासोबत ए पूर्ण चंद्रराव हे देखील होते. दिल्लीला गेल्यानंतर अमिताभला त्यांनी आपला प्रॉब्लेम सांगितला.

‘इन्कलाब’ या चित्रपटाच्या कथानकाशी साम्य असलेले कथानक राजेश खन्नाच्या ‘आज का एम एल ए रामावतार’ या सिनेमाचे होते. आणि त्यांनी हा चित्रपट इन्कलाब च्या आधी पूर्ण करून रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ‘इन्कलाब’ या चित्रपटाला आता काहीच अर्थ रहणार नव्हता. आता अमिताभ बच्चन यांच्या देखील प्रॉब्लेम लक्षात आला. ‘इन्कलाब’ आणि ‘आज का एमएलए राम अवतार’ या दोन्ही चित्रपटाचे संवाद डॉ. राही मासूम रजा यांनी लिहिले होते. अमिताभ ने ताबडतोब त्यांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावर डॉ राही मासूम रजा यांचे असं म्हणणं होतं ,” मी स्क्रिप्टनुसार डायलॉग लिहिले आहेत. पण हे लोक आता त्यात बदल करून ‘इन्कलाब’ चा क्लायमॅक्स तिकडे वापरणार आहेत. असे समजते.!!” आता मात्र अमिताभ बच्चन यांचे धाबे दणाणले . त्यांनी अमेरिकेचा दौरा कॅन्सल केला. प्रकाश मेहरा यांना ‘शराबी’ साठी दिलेल्या डेट्स त्यांनी ‘इन्कलाब’ चित्रपटासाठी वापरायचे ठरवले!
अमिताभ ने दिल्लीहून थेट मद्रास गाठले. आणि पुढचे चाळीस दिवस सलग शूट करून ‘इन्कलाब’ हा चित्रपट पूर्ण केला. डाव्या हाताला प्रचंड मोठी जखम असल्यामुळे अमिताभने या सिनेमात हाताला कायम रुमाल बांधला आहे. तसेच डावा हात खिशामध्ये ठेवला आहे. ‘इन्कलाब’ या चित्रपटाचे शूट पूर्ण झाल्यानंतर ‘शराबी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. या चित्रपटाच्या वेळी देखील अमिताभ ने आपला डावा हात कायम खिशात ठेवला होता. आज तुम्ही ‘शराबी’ हा चित्रपट जेव्हा पाहता त्यावेळेला तुमच्या हे सहज लक्षात येईल. जानेवारी १९८४ मध्ये अमिताभ बच्चन अमेरिकेला स्किन ग्राफ्टिंग साठी रवाना झाले. ‘इन्कलाब’ हा चित्रपट अत्यंत घाईघाई मध्ये शूट झाला होता. त्याचे एडिटिंग बरोबर झाले नाही. 25 जानेवारी 1984 या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

सुरुवातीला चांगले ओपनिंग मिळाले. त्या काळात राजकारणाचे होणारे गुन्हेगारीकरण हा विषय ऐरणीवर होता. ‘इन्कलाब’ या चित्रपटात तर मुख्यमंत्री बनलेल्या अमिताभ बच्चन ने आपल्या संपूर्ण भ्रष्ट कॅबिनेटला मिनिस्टर ला मशीनजन उडवून देण्याचा शॉट होता. त्यामुळे सेन्सर बोर्डाची देखील यावर कात्री चालण्याची शक्यता होती पण तसं काही झालं नाही. हा शॉट सिनेमात कायम राहिला. अमिताभ बच्चन सुपरस्टार पदाच्या कालावधीत त्याच्या सर्व चित्रपटांना रसिक चांगला प्रतिसाद देत असायचे या सिनेमाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला. पण दोन-तीन आठवड्यानंतर मात्र प्रेक्षक येणे कमी झालं. हा चित्रपट अवरेज हिट म्हणून बॉक्स ऑफिसवर याची नोंद झाली. या सिनेमात श्रीदेवी पहिल्यांदा अमिताभ ची नायिका बनली होती.
================================
हे देखील वाचा : नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?
================================
दुसरीकडे जेव्हा ‘इन्कलाब’ हा चित्रपट घाईघाईने पूर्ण होत आहे असे लक्षात आल्यानंतर दासरी नारायणराव यांनी आपल्या ‘आज का एम एल ए रामावतार’ या चित्रपटाचा शूट स्लोली चालू ठेवला. हा चित्रपट फेब्रुवारीला तयार झाला आणि 23 मार्च 1984 या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण या विषयावर या वर्षी आणखी एक चित्रपट आला होता ‘यह देश’ यात जितेंद्रने प्रमुख भूमिका केली होती. दुर्दैवाने या तिन्ही चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही! अमिताभ बच्चन यांनी मध्ये आपल्या ब्लॉगमध्ये या सिनेमाच्या मेकिंग च्या काळातील काही घटनांचा उल्लेख केला होता. प्रकाश मेहरा यांनी त्या काळतील मीडियामध्ये राजेश खन्नाच्या डर्टी पॉलिटिक्स बद्दल तोंडसुख घेतले होते.