Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amitabh Bachchan यांचा ‘कालिया’: ‘जहां तेरी ये नजर है मेरी जा मुझे खबर है’

 Amitabh Bachchan यांचा ‘कालिया’: ‘जहां तेरी ये नजर है मेरी जा मुझे खबर है’
बात पुरानी बडी सुहानी

Amitabh Bachchan यांचा ‘कालिया’: ‘जहां तेरी ये नजर है मेरी जा मुझे खबर है’

by धनंजय कुलकर्णी 09/06/2025

अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टार पदाच्या कालखंडात ज्या दिग्दर्शकासोबत त्यांची चांगली जोडी जमली होती त्यामध्ये दिग्दर्शक टिनू आनंद हे देखील होते. अर्थात हे कॉम्बिनेशन प्रकाश मेहरा, मनमोहन देसाई आणि ऋषिकेश मुखर्जी इतकं लोकप्रिय नव्हतं पण या जोडीने काही चांगले सिनेमे नक्कीच दिले होते. या जोडीचा पहिला चित्रपट होता ‘कालिया’. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५  डिसेंबर १९८१  या दिवशी प्रदर्शित झाला होता. आजच्या सोशल मिडीया च्या काळात सुध्दा हा सिनेमा त्यातील जबरदस्त डायलॉग मुळे आठवला जातो. या सिनेमाच्या मेकिंगची कहाणी फार भन्नाट होती. (Amitabh Bachchan Movies)

खरं तर टिनू आनंद आणि अमिताभ बच्चन यांचा परिचय १९६९ सालापासून. हे दोघेही के ए अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटात एकत्र दिसणार होते. पण टिनू आनंद यांना त्याच वेळी  सत्यजित रे यांना असिस्ट करण्यासाठी संधी मिळाल्याने ते कलकत्त्याला गेले आणि म्हणून ते  या चित्रपटात दिसू शकले नाही. सत्यजित रे यांच्यासोबत सात आठ वर्षे काम केल्यानंतर टिनू आनंद यांनी बॉलीवूड मध्ये प्रवेश केला. त्यांचा पहिला चित्रपट होता ‘दुनिया मेरी जेब मे’. हा चित्रपट खूप रखडला. ऋषी कपूर आणि शशी कपूर हे दोन बिझी स्टार या सिनेमात असल्यामुळे डेट्सचा खूप प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे हा सिनेमा खूपच लांबच गेला. (Bollywood news)

एकदा तर या सिनेमाला तब्बल नऊ महिन्याचा गॅप पडला होता. या गॅप चा उपयोग एक वेगळी मूवी करण्यासाठी करावा म्हणून टिनू आनंद प्रयत्न करत होते. त्यांच्याकडे ‘कालिया’ या चित्रपटाची स्टोरी तयार होती. पण त्यांना निर्माता मिळत नव्हता. एकदा निर्माते  इक्बाल सिंग त्यांच्याकडे आले आणि म्हणाले ,” धर्मेंद्र सोबत मला एक चित्रपट बनवायचा आहे. स्टोरी आहे का?”  टिनू आनंद यांनी  लगेच हो म्हणून सांगितले आणि धर्मेंद्र सोबत मीटिंग फिक्स केली. टिनू आनंदने धर्मेंद्रला ‘कालिया’ ची स्टोरी अगदी अभिनय करून सांगितली. पण धर्मेंद्रला काही स्टोरी तेवढी अपील झाली नाही आणि त्याने नकार दिला.(Entertainment)

================================

हे देखील वाचा: अमिताभ बच्चन यांनी श्रीदेवीला चक्क ट्रक भरून फुले पाठवली!

=================================

यानंतर हेच कथानक घेऊन टिनू आनंद विनोद खन्ना यांच्याकडे गेले पण विनोद खन्ना देखील आपल्या हातातील सर्व चित्रपट संपवून ते आचार्य रजनीश यांच्याकडे जाणार असल्यामुळे त्यांनी सिनेमा करायला नकार दिला. यानंतर अमिताभ बच्चन यांच्याकडे टिनू आनंद केले. अमिताभ यांनी सुद्धा बरेच दिवस लावले मीटिंग करण्यासाठी. शेवटी ‘डॉन’ च्या सेटवर ‘कालिया’ची  कथा अमिताभ यांना ऐकवली. (Bollywood latest news)

कथानक ऐकल्यानंतर टिनू आनंद अमिताभ यांना म्हणाले,” आता तुम्ही असे म्हणू नका मला स्टोरी आवडली नाही. कारण तुम्हाला स्टोरी आवडली आहे!” अमिताभ ने विचारले,” आपने कैसे पहचाना?”  त्यावर आनंद म्हणाले,” मला माझ्या सिनियर कडून असे कळाले की जेव्हा तुम्हाला एखादी स्टोरी आवडत नाही तेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता आणि केसातून हात फिरवता. ही कृती या वेळेला तुम्ही केली नाही याचा अर्थ हा चित्रपट तुम्हाला आवडला आहे!” अमिताभ यांनी हसत हसत होकार दिला. १२  मार्च १९७७  या दिवशी ‘कालिया’ या चित्रपटाचा मुहूर्त झाला. अमिताभ बच्चन, परवीन बाबी, अमजद खान, प्राण, कादर खान, आशा पारेख अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमामध्ये होती. सिनेमाला संगीत आर डी बर्मन यांचे होते.(Kaliya Movie cast)

परविन बाबी हिला या काळात डिप्रेशनचा त्रास याच काळात होत असल्यामुळे ती अमेरिकेत उपचारासाठी गेली. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग लांबत गेले. अमिताभ बच्चन यांचा या सिनेमातील रोल त्यांच्या इमेजला साजेसा असा डॅशिंग हिरोचा होता. या सिनेमातील डायलॉग आज देखील तितकेच लोकप्रिय आहेत. सध्या समाज माध्यमावर या सिनेमातील डायलॉग वर खूप चर्चा होते.’हम जहां खडे होते है लाईन वही से शुरू होती है…!’ हा अमिताभ यांचा आयकॉनिक डॉयलॉग याच सिनेमात होता.

प्राण आणि अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी जबरदस्त होती. एका सीनमध्ये प्राण अमिताभ यांच्यावर बंदूक रोखून म्हणतात,”अब तुमने एक कदम भी आगे बढाया तो इस पिस्तुल में जितना लोहा है तुम्हारे अंदर गाड दूंगा” याला प्रत्युत्तर देणारऱ्या अमिताभ यांचा डॉयलॉग  जबरा होता पण अमिताभ डॉयलॉग  बोलायला तयार नव्हते. या वरून टिनू आनंद सोबत खूप वाद झाला. टिनूचे म्हणणे असे होते की “ या सिनेमातील डॉयलॉग माझ्या वडलांनी इंदर राज आनंद यांनी लिहिले आहेत. आणि त्यांच्या डॉयलॉग  मधील एखादा शब्दच काय तुम्ही स्वल्प विराम आणि पूर्ण विराम देखील बदलू शकत नाही!” भरपूर वादावादी नंतर अमिताभ यांनी डॉयलॉग म्हणायला होकार दिला.आणि हा डॉयलॉग देखील प्रचंड हिट झाला. तो असा होता” तू अशिके दोजख से डराता है जिन्हे… वो आग को पी जाते है पानी करके…!” या सिनेमाच्या डॉयलॉग ची स्वतंत्र एल पी रेकॉर्ड काढली गेली टायटल होते ‘Electrifying dialogs of Kaliya”. (Kaliya Movie)

यातील गाणी देखील प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘जहां तेरी ये नजर हे मेरी जा मुझे खबर है’ हे गाणं त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. अमिताभ यांनी अलीकडेच दिलेल्या  एका मुलाखतीत सांगितलं की या गाण्याची चाल त्यांना इटालियन गाण्यावरून सुचली होती. ती त्यांनी पंचमला सांगितली.  हे गाणं प्रकाश मेहरा यांच्या ‘नमक हलाल’ या सिनेमाच्या सेटवरच चित्रित करण्यात आलं होतं. ‘नमक हलाल’ या चित्रपटातील ‘जवानी जानेमन हसीन दिलरुबा’ हे गाणं ज्या सेटवर चित्रीत केलं होतं त्याच सेटवर दुसऱ्या दिवशी ‘जहाँ तेरी ये  नजर है’ हे गाणं चित्रीत केलं. या सिनेमातील ‘जबसे तुमको देखा हे जिते है मरते है ‘देखील गाणं खूप गाजलं होतं. ‘तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे (किशोर –आशा) सनम तुम जहां मेरा दिल वहां (आशा) कौन किसीको बांध सका सैय्याद तो इक (रफी) हि गाणी पण गाजली.

========================

हे देखील वाचा: Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?

========================

या सिनेमाचे पार्श्वसंगीत बनवताना दिग्दर्शक पंचमला खूप इरिटेट करत होता. पंचम चिडला आणि म्हणाला ,” मला माझे काम करू दे. काही प्रॉब्लेम असेल तर नंतर सांग!” टिनू ने जिथे जिथे चेंज सांगितले तिथे तिथे पंचम ने ‘कालिया कालिया कालिया ‘ हा डॉयलॉग  टीनूच्या च आवाजात रेकॉर्ड करून टाकला. हा प्रकार प्रेक्षकांना भलताच आवडला. हा सिनेमा मसाला पट होता.  हा चित्रपट बनायला तब्बल चार वर्षे लागली आणि २५  ऑक्टोबर १९८१ या दिवशी हा चित्रपट रिलीज झाला. सुरुवातीला चित्रपटाला प्रतिसाद नरम गरम होता पण नंतर सिनेमाने वेग पकडला आणि पुढची दहा वर्ष कायम रिपीट रन प्रदर्शित होत या सिनेमाने जबरदस्त गल्ला जमवला.(Classic movies of bollywood)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aasha parekh Amitabh Bachchan Bollywood Bollywood Chitchat bollywood classic movies bollywood update Celebrity News Entertainment Get Latest Marathi Entertainment update kaalia movie kadar khan Parveen Babi tinnu anand
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.