जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!
सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान कधीकधी खूप funny incidence घडतात. जुनी मासिके /वृत्तपत्र चाळली तर आज इतक्या वर्षानंतर ते वाचून हसू येते! आता हेच पहा ना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी एका चित्रपटाच्या सेटवर लहानग्या करीना कपूर चे पाय धुतले होते! त्या वेळी करीना फक्त दोन – अडीच वर्षांची होती . कोणता होता तो चित्रपट आणि काय होता तो नेमका किस्सा? दिग्दर्शक रमेश बहल अमिताभ बच्चन रणधीर कपूर यांना घेऊन एक चित्रपट बनवत होते ‘पुकार’. हा चित्रपट गोवा मुक्ति संग्रामावर आधारित होता. या चित्रपटाचे शूटिंग गोवा आणि दिव दमण येथे झाले होते. या चित्रीकरणाच्या दरम्यानच हा funny incidence घडला होता.
या चित्रपटातील एका शॉट चे चित्रीकरण चालू होते ज्यात अमिताभ बच्चन रणधीर कपूरचा पाठलाग करत असतो. हा शॉट संपूर्ण गोवा दर्शन घडवणारा आहे. गोव्यातील कार्निवल फेस्टिवलची पार्श्वभूमी या शॉट ला आहे. या शॉट च्या शेवटी अमिताभ बच्चन रणधीर कपूर यांना पकडतात आणि त्यांच्याशी फायटिंग सुरू होते. या शॉट चे चित्रीकरण चालू असताना जेव्हा रणधीर कपूरला अमिताभ बच्चन मारत आहे असे लहानग्या करीना कपूरला दिसले तेव्हा ती जोरात ओरडली आणि धावत पळत जाऊन तिने आपल्या वडलांना (रणधीर कपूर ला) मिठी मारली आणि आपल्या वडिलांना एका गुंडापासून (म्हणजे अमिताभ पासून) वाचवले!

चिमुकल्या करीना च्या या कृतीने सेटवर सर्वत्र हशा पिकला. करीना कपूर आपल्या वडिलांना सोडायला तयार नव्हती. आपल्या पप्पा ना कुणी मारत आहे हे पाहून ती पायात चप्पल न घालता चिखलातून पळत आली होती. ती रणधीर कपूर ला सोडायला तयार नव्हती. शेवटी मग अमिताभ बच्चन ने एका वॉर्ड बॉय कडून पाणी मागवले कारण करीना कपूर चे पाय चिखळाने खराब झाले होते. सर्वत्र चिखल असलेल्या सेटवर चिखल तुडवत तुडवत रणधीर कपूर कडे धावत आली होती त्यामुळे तिचे कपडे आणि पाय चिखलाने बरबटले होते. अमिताभ बच्चन यांनी करीना कपूरचे पाय गरम पाण्याने धुतले तिला चॉकलेट दिले तिच्यासाठी आईस्क्रीम मागवले. पण ती ते घ्यायला तयार नव्हते. तिला वाटले या गुंड माणसाने (अमिताभ) आपल्या वडिलांना मारले आहे पण सर्वांनी समजून सांगितल्यानंतर तिने चॉकलेट घेतले.

त्या दिवसानंतर मात्र अमिताभ बच्चन आणि करीना कपूर यांच्या दोस्ती झाली. पुढे सिनेमाच्या शूटिंग संपे पर्यंत कायम करीना अमिताभ बच्चन यांच्या कडेवर फिरत होती. या चित्रपटाच्या शूटिंग साठी अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन, रणधीर कपूरची मोठी मुलगी करिष्मा कपूर, तसेच दिग्दर्शक रमेश बहल यांचा मुलगा गोल्डी बहल ही बच्चा कंपनी देखील उपस्थित होती. त्यामुळे सेटवर या बच्चा कंपनीचा कायम दंगा चालू असायचा! करीना ने नंतर अमिताभ सोबत कभी खुशी कभी गम , देव, सत्याग्रह या सिनेमात स्क्रीन शेयर केला.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
‘पुकार’ हा चित्रपट 18 नोव्हेंबर 1983 रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाला फारसे यश नही मिळाले पण यातील ‘समुंदर मे नहाके और भी नमकीन हो गई हो’ ,’तू माइके मत जइयो’,’बच के रहना रे बाबा’ ही गाणी लोकप्रिय ठरली. या सिनेमात झीनत अमान अमिताभ ची तर टिना मुनीम रणधीर ची नायिका होती. या चित्रपटाच्या क्लायमॅक्स ला अमिताभ बच्चनचा मृत्यू दाखवणार होते. पण त्याच वेळी ‘कुली ‘ च्या सेट वर एक्सीडेंट झाल्यामुळे संपूर्ण जगभर अमिताभ बच्चन बाबत सहानुभूतीची लाट आली होती यामुळे अमिताभ बच्चन यांचा मृत्यू कॅन्सल करून त्याला या सिनेमात जीवदान दिले होते!