Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे भाग्यच”; अनुष्काची भावूक पोस्ट

 Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे भाग्यच”; अनुष्काची भावूक पोस्ट
मिक्स मसाला

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे भाग्यच”; अनुष्काची भावूक पोस्ट

by रसिका शिंदे-पॉल 12/05/2025

किंग कोहली अर्थात सगळ्यांचा लाडका विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच टेस्ट क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती घेतल्याचं जाहिर केलं. कोहलीच्या चाहत्यांना खरं तर हा धक्काच आहे. जगभरातील विविध क्षेत्रांमधील त्याचे चाहते त्याला भावूक निरोप देत आहेत. अशात विराटची बायको अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सोशल मिडियावर सध्या पोस्ट व्हायरल झाली असून त्यात तिने “या प्रवासात तुझी प्रगती होत असताना पाहणं हे खरोखर माझं भाग्यच,” असं लिहिलं आहे. (Bollywood trending news)

अनुष्काने विराटचा कसोटी सामन्यानंतरचाच एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, “क्रिकेटविश्वात तू रचलेले विक्रम आणि माईलस्टोन याबद्दल सगळे बोलतील…पण या सगळ्यात तू सर्वांपासून लपवलेले अश्रू, कोणीही न पाहिलेला संघर्ष आणि या खेळावर तुझं असलेलं अढळ प्रेम हे सगळं मी पाहिलं आहे. मला माहितीये या दरम्यान तू काय काय गमावलं आहेस. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू आणखी अनुभवी, आणखी थोडा नम्र होऊन परत आलास…या प्रवासात तुझी प्रगती होत असताना पाहणं हे खरोखर माझं भाग्यच.”

पुढे अनुष्काने लिहिलं आहे की, “तरी, एक दिवस तू व्हाईट बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार याची कल्पना होतीच. पण तू कायम तुझ्या मनाचं ऐकलंस आणि माय लव्ह आज मला तुला हेच सांगायचंय की तुला मिळत असलेला हा भावुक निरोप यासाठी तू नक्कीच पात्र आहेस.” (Entertainment)

================================

हे देखील वाचा: Ind vs Pak conflict: “आपल्या देशाच्या खऱ्या हिरोंना सलाम”; कलाकारांनी केलं सैन्याचं कौतुक

=================================

दरम्यान, विराट कोहलीच्या क्रिकेटमधील कारकिर्दीला सिनेसृष्टीतील त्याचे चाहते आणि मित्र परिवार शुभेच्छा देत आहेत. तर, गेला काही काळ अनुष्का शर्मा मोठ्या पडद्यापासून दूर असून २०१८ मध्ये आलेला Chakda Xpress तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर अद्याप ती चित्रपटात झळकली नाही आहे. खरं तर फार पुर्वी एका मुलाखतीमध्ये लग्न झाल्यानंतर मला हाऊस वाईफ व्हायला आवडेल असं अनुष्का म्हणाली होती. तेच स्वप्न ती पुर्ण करत असल्याचं दिसून येत आहे. (Anushka Sharma movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anushka Sharma BCCI Bollywood Bollywood Chitchat Celebrity News cricket Entertainment india indian cricket team king kogli virat kohli
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.