Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prasad Oak : ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Last Stop Khanda Movie Poster: प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी सांगणारा ‘लास्ट स्टॉप खांदा’

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे ची

Nashibvan Marathi Serial: ‘रुद्र प्रताप घोरपडे’ च्या भूमिकेत आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात पुन्हा एंट्री होणार?

Parineeti Chopra आणि राघव चढ्ढा यांच्या घरी येणार चिमुकला पाहुणा!

लहानग्या Hrithik Roshan याने डान्स करून जितेंद्रची छुट्टी करून टाकली

Bahubali To KGF; साऊथच्या हिट चित्रपटांना ‘या’ मराठी कलाकांनी दिला

Inspector Zende :  मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा

Akshay Kumar तब्बल १७ वर्षांनंतर ‘या’ अभिनेत्यासोबत चित्रपटात एकत्र झळकणार!

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अरोरा चित्रपटगृहाची स्वतंत्र ओळख होती….

 अरोरा चित्रपटगृहाची स्वतंत्र ओळख होती….
कलाकृती विशेष

अरोरा चित्रपटगृहाची स्वतंत्र ओळख होती….

by दिलीप ठाकूर 11/11/2024

आजच्या ग्लोबल युगातील मल्टीप्लेक्स, ओटीटीवर जगभरातील अनेक देशांतील अनेक भाषेतील चित्रपट (ज्याला काहीजण कन्टेण्ड) पाहणाऱ्या मुव्हीज प्रेमीना कदाचित एका गोष्टीचे नक्कीच आश्चर्य वाटेल, एकेकाळी बेस्ट बसमधून मुंबईत प्रवास करताना खिडकीबाहेर डोकावताना एकादे सिंगल स्क्रीन थिएटर दिसले तरी चित्रपटवेड्यांना आनंद होई. (आजचा चित्रपट रसिक चित्रपटाला मुव्हीज म्हणतो). (aurora talkies)

मला आठवतय, लहानपणी कुटुंबासोबत अलिबागला एस. टी. ने ये जा करतानाच खिडकीबाहेर लक्ष ठेवल्यावर मराठा मंदिर चित्रपटगृह, मग सात रस्त्यावरचे न्यू शिरीन, काळा चौकीवरचे गणेश, लालबागचे भारतमाता, मग धरती (अगोदरचे सूर्या) , हिंदमाता, चित्रा, ब्राॅडवे असे करत करत जाताना महेश्वरी उद्यानला गेल्यावर अरोरा चित्रपटगृह (aurora talkies) दिसे. पण तेथे मराठी अथवा हिंदी चित्रपट नव्हे तर अनेकदा दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित झालेला दिसे आणि अर्थातच ती भाषा तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलगू अशी कोणती बरे आहे हे समजत नसे… जिलेबी अथवा अळूवडीसारखी ही भाषा कोणती असा प्रश्न पडे. त्याच वेळेस आपल्या देशातील बहुभाषिकता, बहुसांस्कृतिकता पाहून आनंदही होई.

हे आजच का आठवले? काही दिवसांपूर्वीच माटुंगा स्टेशनवरुन पूर्वेकडे गेलो असता याच अरोरा चित्रपटगृहाची अवस्था पाहून मनात धस्स झाले. येथील “खेळ” केव्हाच शांत झाला होता, त्यामुळेच या वास्तूवर एक प्रकारची अवकळा आली होती. निराशाजनक वातावरण होते. मुंबईतील झालेच पण राज्यातील, देशातील एकेक करत करत अनेक एक पडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर बंद होत होत जाताना रसिकांच्या किमान तीन पिढ्यांना आपण तेथे कोणकोणते चित्रपट एन्जाॅय केले हे तिकीट दरासह आठवले. खरं तर अशाच स्वप्नाळू, आशावादी, कष्टाळू सामाजिक स्तरावरील प्रेक्षकांनी आपल्या देशात चित्रपट जगवला, वाढवला, रुजवला.

हे होत असतानाच अनेक चित्रपटगृहांची काही खासियत वा वैशिष्ट्य निर्माण झाले. अरोरा चित्रपटगृह (aurora talkies) देखिल तसेच. दक्षिणेकडील, विशेषत: तमिळ भाषेतील चित्रपट पाह्यचा असेल तर अरोराला जायचे हे समीकरण पक्के. पश्चिम व पूर्व अशा रेल्वेमार्गावर माटुंगा स्टेशनवरुन पश्चिमेला थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूस रिव्होली चित्रपटगृह होते (त्याच्या कोणत्याच खाणाखुणा आज शिल्लक नाहीत) तेथेही मोठ्याच प्रमाणावर दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित होत आणि माटुंगा स्टेशनवरुन पूर्वेकडे मेन रोडवर डाव्या हाताला वळल्यावर अरोरा चित्रपटगृह.

एक तर अरोरा (aurora talkies) चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यापूर्वी अथवा नंतर मद्रास कॅफे, शारदा भवन, रामानुजन अथवा अन्य एखाद्या उडपी हाॅटेलमधील इडली सांबार खायचा अथवा अरोराजवळच्या इराणी हाॅटेलमधील ब्रुन मस्का पाव व चहा घ्यायचा हे पक्के सेटिंग. (पूर्वीच्या अनेक सिंगल स्क्रीन थिएटरजवळ हमखास इराणी हाॅटेल हेदेखील नाते उल्लेखनीय. पिक्चर एन्जाॅय केल्यावर याच इराणी हाॅटेलमधील राऊंड टेबल खुर्चीवर बसून मित्रांसोबत वाद घालणे हेही ठरलेले.)

माटुंगा हा प्रामुख्याने दक्षिण भारतीय नागरिकांचा मुंबईतील जणू हक्काचा विभाग. जवळच धारावी आणि वडाळा. या सगळ्यांना अरोरा चित्रपटगृह अगदीच सोयीचे. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा हुकमी प्रेक्षकवर्ग म्हणजे, अतिशय कष्टकरी कामगार वर्ग आणि त्याचे कुटुंबीय. त्यांना कधी काळी रुपेरी पडद्यावरील एमजीआर, शिवाजी गणेशन, जेमिनी गणेशन, एनटीआर यांचे पराक्रम प्रचंड मोठे वाटत, आवडत. प्रचंड टाळ्या शिट्ट्यांनी ते एन्जाॅय केले जात. कमल हसन, रजनीकांत, चिरंजीवी, मामुट्टी, मोहनलाल यांच्या युगात ते वैशिष्ट्य कायम राहिले.

अरोरा (aurora talkies) हे देखील इंग्रजकालीन सिंगल स्क्रीन थियटर. नेमके सांगायचे तर, १२ मार्च १९४२ साली अरोरा चित्रपटगृह सुरु झाले. बी. डी. भरुचा हे मालक होते. (मुंबईतील ऐंशी नव्वद वर्षापूर्वीच्या अनेक चित्रपटगृहांचे मालक पारशी, पंजाबी, मुस्लिम अथवा इंग्रज कंपनी असे. असा संदर्भ सापडेल. त्यातील अनेक चित्रपटगृहांच्या खाणाखुणा आज शिल्लक नाहीत. वा अनेक बंद झालीत. इंपिरियल वगैरे).

===============

हे देखील वाचा : तोडी नाक तबला ने फोडी नाक पेटी

===============

अरोरा हे सातशे आसन क्षमता असलेले चित्रपटगृह. मोनो साऊंड सिस्टीम आणि जुन्या काळातील प्रोजेक्शन. त्या काळातील चित्रपट रसिक एकदा का पडद्यावरील चित्रपट सुरु झाला की त्यात गुंतत जाई. कालांतराने येथे डाॅल्बी ॲटमाॅस साऊंड सिस्टीम आली. सुरुवातीस इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत. मग तमिळ भाषेतील चित्रपटाचे हुकमी स्थान ठरले. विशेषत: रोज दुपारी बारा वाजता तमिळ भाषेतील चित्रपटच असे. चेन्नईत (तमिळनाडू) प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट तीन चार महिन्यांनंतर मुंबईत रिलीज होई. (कारण तेव्हा चित्रपटाची रिळे असत, ती दूरदूरवर पाठवली जात.)

तोपर्यंत तमिळ भाषेतील प्रसार माध्यमातून त्या चित्रपटाची महती येथील प्रेक्षकांपर्यंत पोहचत असे. Oomai vizhial, ulagam sutrunvaliban, Aqytrathi oruvan, Nadodi maniiam, Adavi Ramudy, Gundamma Katha, deveramagan (थेवर मगन), एक दुजे के लिए ( मूळ तमिळ), हर नाईट्स, नायकन, रोजा, तिरुडा तिरुडा असे अनेक तमिळ भाषेतील चित्रपट येथे प्रदर्शित झाले.

टायटॅनिक वगैरे इंग्लिश, लाल पत्थर, मि. नटवरलाल, सरगम वगैरे हिंदी चित्रपट येथे प्रदर्शित झाले. जुन्या जाहिरातीत हे संदर्भ सापडतात. अर्थात काही चित्रपट चार सहा आठवडे तर काही पंधरा आठवडे मुक्कामाला असत. रजनीकांत युगात अरोरा जास्तच उजळले. त्याची ॲक्शनपॅक्ड भूमिका असलेला चित्रपट अरोरा (aurora talkies) त कधी रिलीज होतोय त्याच्या चाहत्यांना खूपच अगोदर खबर लागे. “कबाली” वगैरे चित्रपटाच्या वेळेस पहिल्याच दिवशी सकाळीच पाच वाजताचा पहिला खेळ.

वाजत गाजत नाचत पब्लिक अरोरा (aurora talkies) ला येणार, रजनीकांतच्या भल्या मोठ्या कटआऊटला दूधाने आंघोळ घालणार, अभिषेक करणार. रजनीकांतवरचे प्रेम प्रेम प्रेम म्हणजे काय याला अरोरा चित्रपटगृह साक्षी.. पिक्चर सुरु झाल्यावर रजनीकांतच्या एन्ट्रीची प्रचंड उत्सुकता आणि ती होताच पडद्यावर पैसे उडवत टाळ्या व प्रचंड शिट्ट्या. आपला शक्तीशाली हीरो पडद्यावर आल्याची भावना. आपला थलैवा आला रे आला… आपल्या देशात सिंगल स्क्रीन थिएटर्स युगात पिक्चर पाहणे म्हणजे सेलिब्रेशन असे.

ऐंशीच्या रंगीत दूरदर्शन व व्हिडिओचे आगमन झाले. नव्वदच्या दशकात मनोरंजन उपग्रह वाहिन्या आल्या, नवीन शतकात मल्टीप्लेक्स युग वाढत वाढत गेले आणि अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सप्रमाणेच अरोरा (aurora talkies) ची गर्दी ओसरत ओसरत गेली. वडाळा परिसरात डोम थियटर आणि भव्य दिव्य चकाचक मल्टीप्लेक्स आले. सायनच्या रुपम चित्रपटगृहाने कात टाकली. नवीन पिढीतील चित्रपट रसिक तिकडे वळला.

आता रजनीकांतचे भव्य दिव्य कटआउटस तिकडे लागले आणि दुधाचा अभिषेक तिकडे होवू लागला आणि अर्थातच आता पॅन इंडिया चित्रपट संस्कृती असल्यानेच दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट अन्य भाषेत डब होऊन प्रदर्शित होवू लागले. “बाहुबली” पासून महामनोरंजनाचे युग आले. पडदा छोटा पडतोय की काय असे ॲनिमल, कांतारा, देवरा असे चित्रपट पाहताना वाटते.

===============

हे देखील वाचा : ‘हम साथ साथ है’ला २५ वर्ष पूर्ण

===============

हळूहळू अरोरा (aurora talkies) कालबाह्य होत गेले. आता या वास्तूच्या मालमत्ता कराच्या वृत्ताने ते फोकसमध्ये आले. ही अतिशय मोक्याची जागा आहे, भविष्यात त्या जागेवर माॅल व त्यात मल्टीप्लेक्स आलेच तर आश्चर्य नको. त्यात एक “फ्रेम” वा प्रतिकृती अरोरा चित्रपटगृहाचे असावी. तेवढे या वास्तूचे भारतीय चित्रपट परंपरेत महत्व निश्चित आहे. चित्रपटगृह म्हणजे फक्त चार भिंती, छप्पर, तिकीट खिडकी, कलरफुल तिकीट, एक पडदा, प्रोजेक्शन, बुकिंग क्लर्क, डोअर किपर, त्याच्या हातातील बॅटरी एवढेच नसते, तर एकदा का पडद्यावर सिनेमा सुरु झाला की ती वास्तू अधिकाधिक सजीव होत जाते. आपण अमुक तमुक चित्रपटगृहात अमूक चित्रपट एन्जाॅय केला हा अनेकांना सुखावणारा फ्लॅशबॅक आहे. माझा तर आहेच आहे…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress Aurora Theatre Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.