
किशोर-Asha Bhosleच्या रोमँटिक गाण्याची लोकप्रियता आज सत्तर वर्षानंतर देखील का वाढते आहे?
‘ये रा ते ये मौ स म न दी का कि ना रा…’
पन्नासच्या दशकामध्ये किशोर कुमार गाण्यापेक्षा अभिनेता म्हणून जास्त लोकप्रिय झाला होता. त्यांनी अभिनय केलेल्या ‘आंदोलन’, ‘नौकरी’, ‘मुसाफिर’, ‘आशा’, ‘नई दिल्ली’, ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटांना चांगले यश मिळत होते. याच काळात निर्माता दिग्दर्शक एस डी नारंग यांनी किशोर कुमार आणि नूतन यांना घेऊन एक म्युझिकल रोमँटिक कॉमेडी सिनेमा काढायचे ठरवले. या चित्रपटासाठी त्यांनी तीन गीतकारांची निवड केली. मजरुह सुलतानपुरी, एस एच बिहारी आणि शैलेंद्र. या रोमँटिक चित्रपटाला संगीत कुणाचे घ्यावे याचा विचार करत असताना त्यांच्याकडे संगीतकार रवी अप्रोच झाले. संगीतकार रवी त्यावेळेला फिल्म इंडस्ट्री मध्ये नवीन होते. परंतु त्यांच्याकडे भरपूर ट्युन्स तयार होत्या. जेव्हा संगीतकार रवी दिग्दर्शक एस डी नारंग यांना भेटले आणि त्यांनी आपल्या जवळील ट्युन्स त्यांना ऐकवल्या तेव्हा नारंग खूप प्रभावीत झाले आणि त्यांनी लगेच आपल्या चित्रपटासाठी संगीतकार रवी यांना साईन केले. चित्रपटाचे नाव होते ‘दिल्ली का ठग’.

या चित्रपटातील गाण्यांच्या संदर्भात जेव्हा मीटिंग सुरू झाल्या त्या वेळेला स्वत: दिग्दर्शक नारंग उपस्थित राहू लागले. यांनी सुरुवातीला एका विनोदी फास्ट ऱ्हिदमच्या गाण्याची सिच्युएशन संगीतकार आणि गीतकार यना सांगितली. किशोर कुमार यांच्या बॉडी लँग्वेज ला स्यूट होईल असे गाणे लिहा असे देखील सांगितले. मजरुर सुलतानपुरी आणि रवी यांच्या मीटिंग सुरू झाल्या. रात्रभर जागून त्यांची ट्यून तयार झाली आणि त्यावर मजरूह सुलतानपुरी यांनी जबरदस्त शब्द लिहिले. सी ए टी कॅट कॅट माने बिल्ली आर ए टी रॅट रॅट माने चुहा…’ गाण्याचे शब्द आणि संगीत एस डी नारंग यांना खूप आवडले!
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
या चित्रपटात आणखी एक सिच्युएशन होती यात नायिका नूतन नायका वर नाराज असते आणि तिची समजूत काढण्यासाठी किशोर कुमार एक रोमँटिक गाणे गातो. या सिच्युएशनला गाणं लिहिलं गेलं ‘हम तो मोहब्बत करेगा दुनिया से नही डरेगा चाहे ये जमाना काहे हमको दिवाना आजी हम तो मोहोब्बत करेगा…’ या चित्रपटात आणखी एक युगलगीत होते. ज्या युगलगीताची चाल संगीतकार रवी यांनी सुरुवातीला एस डी नारंग यांना पहिल्या दिवशी ऐकवली होती. आता या ट्यूनवर मजरूह सुलतानपुरी यांना शब्द लिहायचे होते. पण काही केल्या त्यांना ते शब्द आणि गाण्याची ट्यून मॅच होत नव्हती. शेवटी संगीतकार रवी यांनी दिग्दर्शक नारंग यांना सांगितले की,”आपण या जाण्यासाठी शैलेंद्र यांना बोलवूयात. ते योग्य शब्द लिहितील.”

मजरूह सुलतानपूरी यांनी देखील खुल्या दिल्याने परवानगी दिली. (तो काळ निकोप स्पर्धेचा होता) गीतकार शैलेंद्र यांना आमंत्रित केले गेले. शैलेंद्र यांनी या गाण्याच्या ट्यून वर अतिशय सुंदर असे शब्द रचले आणि गाणे लिहिले. गाण्याचे बोल होते ‘ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा….’ गंमत म्हणजे या चित्रपटातील ही दोन्हीही युगलगीते ‘सी ए टी कॅट कॅट माने बिल्ली’ आणि ‘ ये राते ये मौसम नदी का किनारा’ एकाच दिवशी एकाच रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित करण्यात आले!
================================
हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!
================================
आज ही गाणी येऊन जवळपास ६५-७० वर्ष झालेली आहेत. पण ‘ये राते ये मौसम नदी का किनारा’ या गाण्याची लोकप्रियता दशकागुनिक वाढतच आहे आज देखील युवा पिढी या गाण्यावर नाचत आहे. आनंद घेत आहे. या गाण्याच्या अनेक रिल्स आज समाज माध्यमावर फिरत आहेत. किशोर कुमार आणि आशा भोसले यांचे हे सॉफ्ट रोमँटिक गीत ‘ये राते ये मौसम नदी का किनारा..’ आणखी अनेक शतके असेच प्रेमिकांचे मनोरंजन करत राहील यात शंका नाही!