Bigg Boss Marathi 6: ‘तन्वी कोलते किती बोलते’; भाऊच्या धक्क्यावर Riteish

सांज ये गोकुळी सावळी सावळी..
“शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते’ कवितेची अशी सहज सोपी व्याख्या करणारे कवी सुधीर मोघे मराठी सारस्वतां च्या दरबारातील एक मानाचं पान. कवी, गीतकार आणि संगीत दिग्दर्शक म्हणून लक्षणीय कामगिरी केलेले अष्टपैलू कलावंत सुधीर मोघे रसिकांचे अगदी लाडके होते. विलक्षण तरल आणि भावगर्भ गीतकाव्य त्यानी लिहिले.ग. दि . माडगूळकर , पी सावळाराम, जगदिश खेबुडकर आदिनी निर्माण केलेल्या परंपरेचा वारसा त्यानी अधिक समृद्ध केला. अत्यंत भावमधुर काव्य त्यानी लिहिले. त्यात सोपेपणा तर आहेच पण हृदयाला भिडणारा भावनेचा ओलावा त्यांच्या काव्यात आहे.
‘दिस जातिल दिस येतिल भोग सरलं सुख येईल’ या त्यांच्या गीतातील दुर्दम्य आशावाद गीत ऐकताना आपल्या मनालाही नवी उभारी देतो. सुधीर मोघे मूळचे सांगलीचे. ८ फेब्रुवारी १९३९चा त्यांचा जन्म. कवी म्हणूण त्यानी खूप गुणसंपन्न कलाकृती निर्माण केल्या. संगीतकार सुधीर फडके आणि त्यांचे चिरंजीव श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे सूर छान जुळले. त्यातून सजलेली अनेक गीते रसिकाना अक्षय आनंद देणारी ठरली आहेत. श्रीधर फडके यानी संगीत दिलेलं आणि आशा भोसले यानी गायिलेलं, सुधीर मोघे यांचं ‘सांज ये गोकुळी सावळी सावळी..’ हे गीत केवळ अविस्मरणीय आहे.श्रीधर फडके यानी त्याचं संगीत तर केवळ अप्रतिम दिलं आहेच पण सुधीर मोघे यानी शब्दांमधून साकारलेलं त्या सांजचित्राचं सौदर्य ते गीत ऐकताना डोळे मिटून घेतल्यावर आपल्यावर जी जादू करतं ती तर पुन्हा पुन्हा अनुभवायलाच हवी.

सुमारे तीस पस्तीस वर्षांच्या कालखंडात सुधीर मोघे यानी खूप गुणवत्तापूर्ण संगीत दिलं आणि भावकविता लिहिली. मराठी चित्रपट संगीतात गदिमा आणि जगदीश खेबुडकर, पी. सावळाराम आणि शांताबाई शेळके यानी अत्यंत संपन्न शब्दकळा आणि भावकविता आशयसंपन्न लिहिली. त्या परंपरेत बसेल अशी कविता नंतरच्या काळात लिहिली जात नाही. पण सुधीर मोघे त्या प्रभावळीत शोभणारे कवी होते. ते स्वतः उत्तम संगीत दिग्दर्शक होते. भेटशील केव्हा माझिया जिवलगा, भन्नाट वारा मस्तीत शीळ,माझे मन तुझे झाले, आदि गीताना त्यानी चढविलेला संगीत साज त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारा आहे.
आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, शब्दधून, स्वतंत्रते भगवती,या काव्यसंग्रहांमध्ये त्यांची कविता एकत्र भेटते. त्यांच्या लेखणीतून उतरलेली किती तरी गाणी दीर्घकाळ रसिकांच्या मनात रेंगाळत आहेत. त्यात रंगुनी रंगात सार्या,आला आला वारा, एकाच या जन्मी जणू,जरा विसावू या वळणावर, गुज ओठानी ओठाना,झुलतो बाई रास झुला, एक झोका चुके काळजाचा ठोका,त्या प्रेमाची शपथ तुला, तेथे नांदे शंभू, तपत्या झळा उन्हाच्या ,दयाघना का तुटले चिमणे घरटे,दिस जातिल दिस येतिल,फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, देवा तुला शोधू कुठं,शंभो शंकरा करूणाकरा,सखी मद झाल्या तारका, माय भवानी तुझे लेकरू,रात्रीस खेळ चाले,मी सोडुन सारी लाज, मंदिरात अंतरात तोच,मन मनास उमगत नाही अशा अनेक गीतांची जादू रसिकांच्या मनावर आहे.त्यानी पन्नासाहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.
‘आत्मविश्वास’, ‘एक डाव भुताचा’, ‘कळत नकळत’, ‘चौकट राजा’, ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘राजू’, ‘लपंडाव’, ‘शापित’, ‘सूर्योदय’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदि चित्रपटांचा सामवेश आहे. त्यांनी काही चित्रपटांना संगीत दिले. त्यात मराठी चित्रपट कशासाठी प्रेमासाठी आणि हिंदी चित्रपट सूत्रधार यांचा समावेश आहे. ‘अधांतरी’, ‘स्वामी’, ‘नाजुका’ या मराठी मालिकांना त्यांनी संगीत दिले. तर हिंदी मालिका ‘डॉलर बहु’, ‘शरारते’, ‘हसरते’ यांना त्यानी संगीत दिले. त्यांनी सजविलेले काही कार्यक्रम अविस्मरणीय झाले. त्यात झी टीव्हीवरील नक्षत्रांचे देणे या कवी, संगीतकार यांच्यावरील मालिकेत त्यानी कुसुमाग्रज,शांता शेळके आणि सुधीर फडके यांच्यावरील कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये बहुमोल कामगिरी केली.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
‘मंतरलेल्या चैत्रबनात’, ‘स्मरणयात्रा’ आणि कवी रॉय किणीकर यांच्या उत्तररात्र या काव्यसंग्रहावर आधारित काव्यप्रयोग ही त्यांची लक्षणीय निर्मिती आहे. चैत्रबन , दीनानाथ मंगेशकर केशवसुत आदि पुरस्कार त्याना लाभले.प्रसन्न व्यक्तिमत्व, दिलदार स्वभाव आणि स्नेहार्द्र आचरण यामुळे त्याना मोठा मित्र परिवारही लाभला होता.आता ते केवळ स्वर आणि शब्दरूपाने आपल्यात राहिले आहेत.त्यांच्या संकल्पनेतील ‘मंतरलेल्या चैतरबनात ‘ या कार्यक्रमाणे नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत त्या निमिताने त्यांचे स्मरण. हा प्रतिभावान कलावंत १५ मार्च २०१४ रोजी आपल्यातून निघून गेला.