Madhubala मुंबईच्या मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Ashok Saraf : ‘आपली माणसं’ ते ‘एक डाव भुताचा’! मामांचे चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार…
भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. वयाच्या ६व्या वर्षापासून रंगभूमीवर काम करणाऱ्या महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांनी आजवर अनेक अजरामर नाट्याविष्कारासह उत्कृष्ट चित्रपट दिले. आजही टी.व्हीवर ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘गुपचूप गुपचूप’ हे चित्रपट लागल्यावर अशोक मामांचे चाहते आवर्जून कुटुंबासह पाहतात. केवळ स्टार कलाकार होणं सोप्पं नसतं तर ते स्टारडम टिकवून ठेवणंही तितकंच महत्वाचं असतं आणि अशोक सराफ यांनी गेली ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ ते टिकवून ठेवलं आहे. आता अशोक सराफ यांच्या कलेला अभिवादन करण्यासाठी खास ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. त्यांचे काही ठराविक आता प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहेत. (Marathi movies)

अल्ट्रा झकास या ओटीटी वाहिनीवर ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव’ साजरा केला जाणार आहे. अशोक सराफ यांचा जगभरात गाजलेला ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट तर सगळ्यांना माहितीच आहे, पण त्यासोबतच बरेच चित्रपट ज्यांची छाप प्रेक्षकांच्या मनात उमटली असून ते चित्रपट बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा लोकांना ओटाटीवर पाहण्याची संधी मिळणार आहे. यात ‘अफलातून’ (१९९१), ‘एक डाव भुताचा’ (१९८२), ‘आपली माणसं’ (१९९२), ‘वजीर’ (२०१५), ‘इना मिना डिका’ (१९८९), ‘सून माझी लाडकी’, ‘ऐकावं ते नवलच’, ‘देवघर’, ‘पैंजण’, ‘मोस्ट वाँटेड’, ‘कोणासाठी कुणीतरी’, ‘डीड शहाणे’, ‘या टोपीखाली दडलंय काय?’, ‘आंधळी कोशिंबीर’ (२०१४) असे प्रेक्षकांच्या काळजाला भिडलेले चित्रपट अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या खास अशोक मामा चित्रपट महोत्सवात पाहता येणार आहेत. (Ashok Saraf movies)
================================
हे देखील वाचा: Ashok Saraf : अभिनयाचे बादशाह!
=================================
अशोक सराफ यांनी आजवर २५० हून अधिक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. त्यापैकी १०० पेक्षा अधिक चित्रपट कर्मशिअली यशस्वी झाले आहेत. अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक ३ वेळा फिल्मफेअर best actor चा अवार्ड मिळाला आहे तर सर्वाधिक ७ वेळा नॉमिनेशनसुद्धा मिळालं आहे… ५५ वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी नाट्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीला वाहून देणाऱ्या पद्मश्री अशोक सराफ यांच्या कारकिर्दिला सलाम! (Bollywood news)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi | Marathi Entertainment News