
जगातल्या सर्वात महागड्या Avatar : Fire and Ash चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहिर!
हॉलिवूडसह जगभरातील इतर भाषिक चित्रपटरसिक प्रेक्षकांना आपल्या अनोख्या दिग्दर्शकीय शैलीने मंत्रमुग्ध करणारे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी अवतार चित्रपट घेऊन येत विचारांच्या सर्व सीमाच पार केल्या. ‘अवतार’ (Avatar)(२००९) आणि ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (Avatar : The way of Water) (२०२२) या चित्रपटांनी जगभरात बक्कळ कमाई केली. जगातील सर्वात महागडी चित्रपटांची फ्रेचांयझी असणाऱ्या अवतारचा आता मोस्ट अवेटेड तिसरा भाग ‘अवतार :फायर अॅंण्ड एश’ (Avatar : Fire and Ash) (२०२५) लवकरच रिलीज होणार असून पैंडोराची पुढची गोष्ट पाहायला प्रेक्षक आतुर आहेत… नुकताच या चित्रपटाचा एक पोस्टर रिलीज झाला असून यावर ‘अवतार ३’ मधील विलन ‘वारांग’ची पहिली झलक समोर आली आहे…

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जॅम्स कॅमेरॉन (Jamesh Cameron) यांच्या ‘अवतार ३’ चित्रपटाचं बजेट २५ कोटी युएस डॉलर असून भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झालं तर ते २१,५६,२८,५८,७५० इतकं आहे… जगातला हा सर्वात महागडा चित्रपट प्रेक्षकांना १९ डिसेंबर २०२५ रोजी पाहायला मिळणार असून तिसऱ्या भागातील विलन ‘वारांग’ची भूमिका स्पॅनिश अभिनेत्री ‘ऊना चैपलिन’ (Oona Chaplin) साकारणार आहे…(Entertainment News)

तसेच, ‘अवतार :फायर अॅंण्ड एश’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना ‘द फॅंटास्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स’ या चित्रपटासोबत २५ जुलै २०२५ रोजी रिलीज केला जाणार आहे… न्युयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ‘अवतार ३’ चा ट्रेलर नुकताच डिझ्नीच्या लॉस एंजलिस आणि न्युयॉर्क ऑफिसमध्ये दाखवला गेला आहे…त्यामुळे प्रेक्षक आतुरतेने २५ जुलैची वाट पाहात आहेत यात काहीच शंका नाही…(Hollywood movie news)

‘अवतार’ ही जगातील सर्वात expensive चित्रपट फ्रेंचायझी म्हणून ओळखली जाते… २००९ मध्ये जेव्हा ‘अवतार’ हा पहिला पार्ट रिलीज झाला होता त्यावेळी तो बनवण्यासाठी चक्क दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमला १२ वर्ष लागली होती… कारण, १९९४ पासून कॅमेरॉन यांनी स्क्रिप्टवर काम करायला सुरुवात केली होती… आणि त्यानंतर कॉन्सप्ट execute करण्यापासून ते थिएटरमध्ये दर्जेदार तंत्रज्ञानाची जोड लावून रिलीज करण्यापर्यंतचा हा १२ वर्षांचा प्रवास अनोखा होता… हा चित्रपट तयार करण्यासाठी निर्मात्यांनी आपली पू्र्ण तिजोरी रिकामी केली. सांगितलं जातं की पहिल्या भागाचं बजेट 23.7 crores USD इतकं होतं आणि या चित्रपटाने १८,६०० कोटींची जगभरात बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती…
================================
हे देखील वाचा : Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”
=================================
तर, ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ (२०२२) या दुसऱ्या भागात समुद्री जलचरांच्या स्वरुपातील ते जग प्रेक्षकांना वेगळ्याच ग्रहावर घेऊन जाणारं होतं… हा चित्रपट तयार करण्यासाठी 46 crores USD इतकं बजेट होतं आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरात १४,०६० कोटींची कमाई केली होती… आजवर अवतार १ या चित्रपटाचा जगभरात बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडणारा एकही चित्रपट तयार झाला नाही आहे… त्यामुले जगातल्या सर्वात महागड्या ‘अवतार :फायर अॅंण्ड एश’ या तिसऱ्या भागात नेमकं काय घडणार आणि कॅमेरॉन आता आपल्या दिग्दर्शनाची कोणती नवी जादूची छडी फिरवणार हे पाहण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi