
Bahubali : The Epic चित्रपटाने घातला धुमाकूळ; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच पार केला ३ कोटींचा आकडा
०१५ मध्ये दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपटातून महिष्मती साम्राज्य प्रेक्षकांसमोर आणलं…मोठ्या पडद्यावर एका वेगळ्याच साम्राज्याचा इतिहास पाहणं प्रेक्षकांसाठी एक नवी पर्वणीच होती… इतकंच नाही तर तेलुगु चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा मिळवून देणारा हाच ‘बाहुबली’ चित्रपट होता… बरेच रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांचा मिळून एक भव्य चित्रपट राजामौली आपल्या भेटीला आणणार आहेत… ‘बाहुबली : द एपिक’ हा दोन भागांचा एकत्रित चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी देशभरात रिलीज होणार असून भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भागांचं Re-Edit करुन हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे… आधीच बाहुबलीचा फॅन बेस हा खतरनाक असल्यामुळे Bahubali : The Epic साठी प्रेक्षक अधिक उत्सुक असून जगभरात ३ कोटींचा अॅडवान्स तिकिट बुकिंगचा चप्पा या चित्रपटाने पार केला आहे… (Telugu Movies)

दरम्यान, केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही ‘बाहुबली’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे… Two Brothers, One Throne. Two Women, One Conflict. Two Promises, One Breach. Two Films, One Experience असा दिव्य अनुभव प्रेक्षकांना देण्याच्या मार्गात असणाऱ्या ‘बाहुबली : द एपिक’ चित्रपटाने अमेरिकेत सर्वाधिक अॅडव्हान्स तिकिट बुकिंगचा टप्पा पार केला आहे… तसेच, दोन्ही भाग Individually ३ तासांचे असूनही दोघांचं एकत्रिकरण करुन ‘बाहुबली : द एपिक’ ३ तास ४५ मिनिटांचा असणार आहे… (Bahubali : The Epic movie news)

आजवर, चित्रपट सादरीकरण, वेगळं कथानक आणि सिनॅमॅटिक अनुभव देण्याच्या बाबतीत राजामौली (SS Rajamouli) यांनी हॅट्रिक केली आहे… अशातच त्यांच्या बाहुबली या फ्रेंचायझीने त्यांना जगभरात महत्वाची ओळख निर्माण करुन दिली… त्यामुळे आता बाहुबली : द एपिक या चित्रपटाच्या निमित्ताने दोन भागांचं रि-एडिट करुन पुन्हा रिलीज करण्याचा त्यांचा हा नवा पायंडा पुढे अजून कोण फॉलो करणार? आणि दोन्ही भागांप्रमाणेच आता बाहुबली एपिकलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळणार यात जराही शंका उरली नाही….
================================
हे देखील वाचा : Bahubali Movie :१० वर्षांनी पुन्हा एकदा ‘बाहुबली’ एका ट्विस्टसह भेटीला येणार!
================================
बाहुबली या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबत्ती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, राम्या क्रिष्णा, सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका होत्या… २०१५ साली ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि २०१७ मध्ये ‘बाहुबली २ : द कन्क्लुजन’ हे चित्रपट रिलीज झाले होते… बाहुबली हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतला पहिला चित्रपट ठरला होता ज्याने ५०० कोटींचा टप्पा पार केला होता… इतकंच नाही तर १००० कोटींचा क्लब भारतीय चित्रपटसृष्टीत सुरु करणारा ‘बाहुबली २’ हा चित्रपट ठरला होता…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi