Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह रि-रिलीज होणार!
साऊथ चित्रपटांचा प्रेक्षकांवर दिवसागणिक प्रभाव अधिक वाढताना दिसत आहे. बॉलिवूडपेक्षा साऊथ चित्रपटांचे सीक्वेल्स कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. मग यात केजीएफ, सालार अशा अनेक चित्रपटांची नावं नक्कीच घेता येतील. या सगळ्या यादीत एस.एस.राजामौली यांचा बाहुबली हा चित्रपट नक्कीच अग्रस्थानी असेल. बाहुबली ३ येणार की नाही माहित नाही पण सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या चित्रपटांच्या रि-रिलीज ट्रेण्डमध्ये आता बाहुबली चित्रपट देखील सामिल झाला असून लवकरच ‘बाहुबली: द बिगिनिंग’ (Baahubali The Beginning) (२०१५) आणि ‘बाहुबली 2: द कन्क्लुजन’ (Bahubali The Conclusion) (२०१७) एका ट्विस्टसह प्रदर्शित होणार आहेत.(re-release movie trend)

सर्वसाधारणपणे कितीही नवे चित्रपट किंवा सीरीज आले तरी काही जुने चित्रपट किंवा सीरीज कायमस्वरुपी आपल्या मनात अढळ स्थान निर्माण करुन जातात. बाहुबली हा देखील याच पठडीतील चित्रपट. कथा, अभिनय, भव्य सेट, गाणी सारं काही इतकं Larger Than Life होतं की वारंवार बाहुबहली चित्रपट पाहावासा वाटतो. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटगृहात पुन्हा एकदा तो अनुभव देण्याची योजना आखत ऑक्टोबर २०२५ मध्ये बाहुबली चित्रपटाचे दोन्ही भाग पुन्हा एकदा जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहेत. यात एक महत्वाचा ट्विस्ट असा असेल की दिग्दर्शक राजामौली (SS Rajamouli) दोन्ही चित्रपटांचे महत्त्वाचे क्षण एकत्र करून एक नवा चित्रपट तयार करणार आहेत. म्हणजे प्रेक्षकांना राजामौलींच्या सिनेमॅटिक एक्सपिरिमेंटमधून ६ तासांची कथा ३ तासांमध्ये पाहता येणार आहे. जर का राजामौली यांचा हा प्रयोग यशस्वी झाला तर नक्कीच भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा ट्रेण्ड सुरु होईल.(Bollywood news)
================================
हे देखील वाचा: Prajakta Mali : “तिने कशालाच हद्दपार…”, प्राजक्तानं केलं आलिया भट्टचं कौतुक
=================================
बाहुबली चित्रपटाने संपूर्ण तेलुगु चित्रपटसृष्टीला जागतिक दर्जा आणि ओळख मिळवून दिली. इतकंच नाही तर अभिनेता प्रभास यालाही एक नवा चाहता वर्ग ग्लोबली मिळाला. जगभरात बॉक्स ऑफिसवर बाहुबली चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बक्कळ कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार ‘बाहुबली : द बिगिनिंग’ ने ६५० कोटी, ‘बाहुबली : द कनक्लूजन’ने १८१० कोटींची कमाई करत एकत्रित या दोन्ही भागांनी २४६० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. बाहुबली चित्रपटात प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा दग्गूबत्ती, तमन्ना भाटिया, राम्या क्रिश्नन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. (Bahubali Movie cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi