Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’मध्ये दिसणार Subodh Bhave चा लव्ह ट्रायअॅंगल

Salman Khan याने २२ वर्षांपूर्वी आलेल्या ‘तेरे नाम’मधील ‘ही’ गोष्ट

‘Saare Jahan Se Accha Premier: OTT वर कधी प्रदर्शित होणार

बापरे ! KBC 17 साठी Amitabh Bachchan घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी;

Ye Re Ye Re Paisa 3: ‘आली रे आली गुलाबाची कळी’

Parinati Marathi Movie Trailer: दोन सशक्त स्त्रियांची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या परिणती

Ajay Devgan : ‘सन ऑफ सरदार २’ मधील आणखी एका

राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Bajrangi Bhaijaan : चित्रपटात एकही शब्द बोलली नाही पण रातोरात

Amruta Khanvilkar : “माझ्या घरी आलात तर आदर करणं…”; मराठी-हिंदी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘बाहुबली’ खरचं ठरला सर्व रेकॉर्ड्सचा बाहुबली

 ‘बाहुबली’ खरचं ठरला सर्व रेकॉर्ड्सचा बाहुबली
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

‘बाहुबली’ खरचं ठरला सर्व रेकॉर्ड्सचा बाहुबली

by सई बने 10/07/2020

पाच वर्षापूर्वी आलेल्या बाहुबलीनं बॉक्सऑफीसवर त्याच्या नावासारखा रेकॉर्ड केला. एकाचवेळी 4 हजाराहून अधिक चित्रपटघरात बाहुबली चित्रपट प्रदर्शित झाला.  कधीनव्हे ते या चित्रपटासाठी वेगळी भाषा तयार करण्यात आली…बाहुबली…..या आरोळीनं अवघं आसमंत जणू दुमदुमला….या बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागाची निर्मिती आणि त्यातील कलाकारांनी त्यासाठी किती मेहनत घेतली…याचा कलाकृती मिडीयानं घेतलेला आढावा…

कटप्पाने बाहुबली को क्यु मारा….

बाहुबली.  या चित्रपटाच्या नावासारखंच सगळंच अभूतपूर्व.  एकतर ते भव्यदिव्य सेट.  कालकेयची किलकिली भाषा.  अभूतपूर्व शस्त्र.  त्यातले दागिने. वस्त्र .सगळंच भव्य. दिव्य. अभूतपूर्व. पुन्हा पुन्हा बघावंस वाटेल असं. पहिल्यांदा बघतांना अवघा चित्रपट नजरेत भरण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर फक्त सेट साठी बघावा.  नंतर त्यातील अॅक्शनसाठी.  देवसेनेच्या डोळ्यातील अंगार बघण्यासाठी.  मग नुसता बाहुबली.  बाहुबली.  या जयघोषासाठी.  अजोड व्ही. एफ. एक्स. तंत्रज्ञानासाठी.  कटप्पाच्या राजभक्तीसाठी.  हा चित्रपट किती वेळा बघितला गेला याची नोंद नाही. त्यातच चित्रपट बघितल्यावर पडणारा तो प्रश्न.  कटप्पाने बाहुबली को क्युं मारा… बाहुबलीनंतर जळी स्थळी हाच प्रश्न व्यापला होता जणू.  कटप्पानं बाहुबलो को क्यु मारा…. या प्रश्नानं सोशल मिडीयात धुमाकूळ घातला…

प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या तपर्श्चयेचे प्रतिक म्हणजे बाहुबली चित्रपट.  10 जुलै 2015 रोजी तामिळ भाषेतील हा चित्रपट हिंदी आणि अन्य विदेशी भाषांसह भारतभर झळकला. आणि अवघ्या देशात एकच नारा गुंजत राहीला. बाहुबली…प्रभास, राणा डग्गुबटी, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णन यांची नावं प्रत्येकाच्या तोंडी झाली. बाहुबलीनं अनेक विक्रम केले. त्यातला एक मुख्य म्हणजे, या चित्रपटानं चक्क एका भाषेची निर्मिती केली. मधन कर्की यांनी 750 शब्द आणि 40 व्याकरणांचे नियम मिळून किलिकिली नावाच्या भाषेची निर्मिती केली. चित्रपटांत जेव्हा  कालकेय कबिल्याचा राजा जेव्हा ही भाषा बोलतो, तेव्हा अवघं चित्रपटगृहही त्याच्यासोबत या किलिकिलीमध्ये रंगून जात असे…

माहेष्मती राज्याची ही कथा. राज्य कसंल ते तर अवाढव्य साम्राज्य. या साम्राज्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी चाललेला अंतर्गत संघर्ष. अमरेंद्र बाहुबली, भल्लाल देव, देवसेना, कटप्पा. या सर्वांची यातील भूमिका. कट-कारस्थानं. त्यात झालेली देवसेनेची होरपळ. एक हळूवार फुलणारी प्रेमकहाणी. प्रभास या कलाकारानं यात अमरेंद्र बाहुबलीची भूमिका केली आहे. तर राणा डग्गुबटी भल्लालदेवाच्या भुमिेकेत आहे. महाराणी देवसेनेच्या करारी भूमिकेत अनुष्का शेट्टी,  तर राजगादीचा रक्षणकर्ता म्हणून असलेल्या कटप्पाच्या भूमिकेत सत्यराज,  आणि अवन्तिकाच्या भूमिकेत तमन्ना हे कलाकार चमकले. या सर्वांच्या भूमिका आणि त्यांनी साकारलेली पात्र अजरामर झाली. या सर्व कलाकरांनी या भूमिकांसाठी अनेक महिने मेहनत घेतली. घोडेस्वारी, तलवारबाजीचं शास्त्रीय शिक्षण या सर्वांनी घेतलं. जवळपास दोन वर्ष या चित्रपटाचं शुटींग चालू होतं. त्यात व्ही. एफ. एक्स तंत्रज्ञानासाठी परदेशी तंत्रज्ञानांची मोठी टीम अहोरात्र झटत होती. 

या चित्रपटाचं शुटींग झालं ती स्थळं आता बाहुबलीच्या नावानं प्रसिद्ध झाली आहेत. हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये काही स्थळांना बाहुबलीच्या नावानं ओळख मिळाली. केरळमधील प्रसिद्ध धबधबा अथिरप्पिल्ली,  हैद्राबादमधील गोवळकोंडा किल्ला,  हैद्राबादचाच अन्नपूर्णा स्टुडीओ,  महाबळेश्वर येथे या चित्रपटाचे शुटींग झाले. शुटींग दरम्यान अनेकवेळा जोरदार पावसामुळे अख्खा सेट वाहून गेला. त्यात दाट धुके, जोरदार पाऊस अशा वातावरणात शुटींग करावं लागे. या सर्वांत चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे जात होती. चित्रपटाच्या ट्रेलरनं भलतीच उत्सुकता निर्माण केली होती. हा ट्रेलर रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवसांत लोखो चाहत्यांनी तो बघितला. येवढ्या उत्सुकतेनंतर प्रदर्शित झालेल्या बाहुबलीवर प्रेक्षकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. पहिल्याच दिवशी 70 करोडचा गल्ला जमा करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. पहिल्या आठवड्यातच 250 करोड रुपये चित्रपटानं जमा केले. परदेशातही या चित्रपटानं सर्व रेकॉर्ड तोडले. 

या चित्रपटाचा प्रमुख अभिनेता प्रभासच्या फॅन क्लबमध्ये तर मोठ्या प्रमाणात वाढ झाली.  प्रभासला या चित्रपटासाठी निर्मात्यांनी दीड करोडचे व्यायामाचे सामान भेट म्हणून दिले होते.  प्रभासच्या ट्रेनिंगसाठी मिस्टर वर्ल्ड लक्ष्मण रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर या चित्रपटाच्या कालावधीत प्रभासनं अन्य कुठलाही चित्रपट साईन केला नाही. सलग 300 दिवस बाहुबलीसाठी प्रभास शुटींग करत होता. त्यासाठी 95 किलोचे वजन त्याला ठेवणे गरजेचे होतं.  तीन वर्ष हे वजन प्रभासनं कायम ठेवलं. त्यासाठी त्याची मेहनतंही प्रचंड होती. अर्धा दिवस व्यायाम आणि 40 अंडी तो रोज खात असे. याशिवाय तलवारबाजी, किक-बॉक्सिंग, कुंग-फू आणि घोडेस्वारी याचा रोज सराव करत असे. 

या सर्वांचा परिणाम म्हणजे बाहुबली चित्रपटाची प्रचंड हवा. देशात नाही तर विदेशातही बाहुबली बघितला गेला. एकदा नव्हे. पुन्हा पुन्हा. बघितला गेला. प्रेक्षकांना जणू बाहुबली नावाचं व्यसन लागलं होतं. या बाहुबलीनं फॅशनच्या दुनियेतही आपला ठसा उमटवला. बाहुबली दागिने आले. नोज पिन,  नेकलेस, बांगड्या,  मांगटीका,  पैजण, ब्रेसलेट, झुमके, तगडी, बाजुबंद, कंबरपट्टा. अशा अनेक दागिन्यांची फॅशन या चित्रपटानं पुन्हा आणली.

लाखो रसिकांना या चित्रपटानं भूल पाडली. मात्र चित्रपट बघितल्यावर एक प्रश्नाचं कोडंही सगळ्यांना पडलं होतं. तो प्रश्न म्हणजे कटप्पाने बाहुबली को क्यु मारा. या चित्रपटाचा सिक्वल बाहुबली-दि कन्क्लूजन 2017 मध्ये आला. त्या दोन वर्षाच्या काळात हा प्रश्न म्हणजे युनिर्व्हसल झाला होता. या चित्रपटाच्या दुस-या भागात त्याचं उत्तर मिळालं. पण बाहुबलीच्या पहिल्या भागाची नशा मात्र अद्यापही आहे…

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat Bollywood Topics bollywood update Celebrity Celebrity News Celebrity Talks Entertainment Indian Cinema
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.