
Gaurav Khanna याने Big Boss 19 च्या विजेत्या ट्रॉफीवर कोरलं नाव!
बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या हिंदी बिग बॉसच्या १९व्या (Big Boss 19) पर्वाचा ग्रॅंड फिनाले ७ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झाला. यंदाचं सीझन फारचं गाजलं. तान्या मित्तल (Tanya Mittal), फराना यांनी तर सीझन हादरवूनच टाकलं होतं. आणि अखेर या लढतीत अभिनेता गौरव खन्ना याने बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरं आहे. फरहाना भट्ट, तान्या मित्तल, प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमाल मलिक या टॉप ५ फायनलिस्टपैकी गौरवने बाजी मारत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. (Gaurav Khanna)
‘बिग बॉस १९’च्या सुरुवातीलाच गौरव शांत आणि फार फोकस होत तो खेळत होता. उगाच कुणाशी वाद न घालता संयम ठेवून त आपला मुद्दा मांडण्याचा कायम करत असलेला प्रयत्न प्रेक्षकांना विशेष आवडला. आकांडतांडव न करता हुशारीने खेळ खेळल्याचा परिणाम म्हणजे १९व्या पर्वाची बिग बॉसची ट्रॉफी गौरवच्या हातात आली. (Entertainment News)

खरं तर काही अंशी प्रेक्षकांना प्रणित मोरे जिंकावा असं वाटत होतं. पण प्रेक्षकांच्या मनात काही वेगळंच होतं. मालिकाविश्वात २० वर्ष सातत्याने काम करत असणाऱ्या गौरव खन्नाला त्याच्या चाहत्यांनी खऱ्या अर्थाने सपोर्ट केलं असं नक्कीच म्हणावं लागेल. (Hindi Big Boss Season 19)
================================
हे देखील वाचा : “माझी तल्लख बुद्धी म्हणून…”; Sachin Pilgoankar यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
================================
गौरव खन्नाने आजवर ‘अनुपमा’, ‘सी.आय.डी’, ‘जीवन-साथी’, ‘भाभी’, ‘संतान’, ‘तेरे बिन’, ‘मेरी डोली तेरे आंगन’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने कामं केली आहेत.. इतकंच नाही तर २०२५च्या ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’चाही (Master Chief 2025) गौरव विजेता आहे. (Gaurav Khanna Serials)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi