Umesh Kamat-Priya Bapat यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

Bigg Boss Marathi 6: घरातून हकालपट्टीनंतर Divya Shinde ची पहिली प्रतिक्रिया; “खूप काही सांगायचं आहे” म्हणत लिहीली पोस्ट
Bigg Boss Marathi 6 च्या सीझनमध्ये प्रेक्षकांना चकित करणारी घटना घडली आहे. स्पर्धक दिव्या शिंदे ( Divya Shinde) हिला बिग बॉसने थेट घराबाहेर काढल्याने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला. एका टास्कनंतर झालेल्या वादात दिव्याने इतर स्पर्धकांना गंभीर स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर बिग बॉसने तिला अनेक वेळा समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र दिव्याने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. ही संपूर्ण घटना घडण्याआधी बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये दिव्याशी सविस्तर चर्चा केली होती.(Divya Shinde Eviction)

अभिनेता राकेश बापटनेही भावाच्या नात्याने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील दिव्या आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत ठाम राहिली आणि “मी कोणाचीही माफी मागणार नाही” असे तिने ठामपणे सांगितले. अखेर नियमांचे उल्लंघन झाल्याने बिग बॉसने तिला घराबाहेर जाण्याचा निर्णय जाहीर केला.

हा निर्णय ‘भाऊचा धक्का’ सुरू होण्याआधीच घोषित करण्यात आल्यामुळे घरातील इतर स्पर्धक भावूक झाले. तसेच दिव्याच्या चाहत्यांसाठीही ही बाब अनपेक्षित होती. सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी बिग बॉसच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी दिव्याच्या बाजूने मत व्यक्त केले. घरातून बाहेर पडताच दिव्या शिंदेच्या टीमकडून एक अधिकृत निवेदन सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये दिव्याच्या चाहत्यांचे आभार मानण्यात आले असून, एक महत्त्वाची विनंतीही करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, दिव्याच्या एक्झिटमुळे अनेक जण भावूक झाले आहेत किंवा धक्का बसला आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र प्रेक्षकांनी कोणतीही चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Divya Shinde Eviction)
==========================
==========================
तसेच या पोस्टमध्ये “आम्हाला प्रेक्षकांसोबत अजून खूप काही शेअर करायचे आहे. योग्य वेळी आम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि आमची बाजूही स्पष्ट करू,” असेही नमूद करण्यात आले आहे. शेवटी ‘थँक यू! टीम दिव्या शिंदे’ असा उल्लेख करण्यात आला आहे.दरम्यान, दिव्या शिंदे स्वतः या संपूर्ण प्रकरणावर कधी आणि काय प्रतिक्रिया देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.