
Bigg Boss Marathi 6: ‘तुम्ही कुठे झोपणार?’ पहिल्याच दिवशी Sonali Raut ने बिग बॉस घरात माजवली खळबळ
Bigg Boss Marathiचा सहावा सीझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, पहिल्याच दिवशी या शोने जबरदस्त चर्चा निर्माण केली आहे. अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. शोच्या भव्य उद्घाटनावेळी रितेश देशमुखच्या जोशपूर्ण उपस्थितीने संपूर्ण मंचावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. या पर्वात दिपाली सय्यद (Deepali Sayyad) , सागर कारंडे (Sagar Karande) आणि खानदेशचा लोकप्रिय चेहरा सचिन कुमावत (Sachin Kumavat ) यांनी घरात प्रवेश केला. मात्र या तिघांपेक्षा जास्त लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री सोनाली राऊतने. तिच्या एंट्रीमुळे केवळ प्रेक्षकच नव्हे तर घरातील स्पर्धकही थक्क झाले.(Bigg Boss Marathi 6)

सोनाली राऊत ( Sonali Raut) ही बिग बॉसच्या हिंदी आवृत्तीत आधीच आपली छाप पाडून गेलेली आहे. याच अनुभवाचा उल्लेख करत तिने यावेळीही आपली भूमिका अधिक ठळक असणार असल्याचं संकेत दिले. रितेश देशमुखने तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं, मात्र मजेशीर अंदाजात तिला थोडी ‘सूचना’ही दिली. त्यावर सोनालीने, “आधी ट्रेलर होता, आता पूर्ण सिनेमा पाहायला मिळेल,” असं म्हणत वातावरण अधिक रंगतदार केलं.इतकंच नाही तर तिच्या मिश्कील संवादाने रितेशही हसत-हसत उत्तर देताना दिसला. या हलक्याफुलक्या फ्लर्टिंगमुळे स्टेजवर मजेशीर क्षण निर्माण झाले.

शॉर्टकट दारातून घरात प्रवेश केल्यानंतर सोनालीने पहिल्याच क्षणापासून आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. घरात पोहोचताच तिने दिपाली, सागर आणि सचिन यांच्याशी संवाद साधला. मात्र झोपण्याच्या जागेबाबत तिने विचारलेला प्रश्न ऐकून तिघेही गोंधळून गेले. “तुम्ही कुठे झोपणार?” या साध्या वाटणाऱ्या प्रश्नामागे लपलेला तिचा आत्मविश्वास सर्वांच्याच लक्षात आला. पुढे बेडरूम आणि कॅप्टन रूम पाहिल्यानंतर तिने थेट कॅप्टनच्या बेडवर दावा केल्यामुळे इतर स्पर्धक अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट दिसलं. सागरने तर तिच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बिग बॉसकडून योग्य माहिती देण्यात आली आहे का, असा सवालही केला.(Bigg Boss Marathi 6)
==============================
===============================
एकूणच, सोनाली राऊतने पहिल्याच दिवशी घरातील वातावरण ढवळून काढलं आहे. तिचा बिनधास्त स्वभाव आणि थेट बोलण्याची शैली पाहता येणारे दिवस घरातील स्पर्धकांसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार हे नक्की. आता पुढील दिवसांत ती कोणते नवे रंग दाखवते, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.