Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

बॉब बिस्वास… वन्स मोर
कहानी हा सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपट 2012 मध्ये आला होता. विद्या बालननं यात एक गर्भवती महिलेची भूमिका केली होती. या चित्रपटात एक आणखी रहस्यमयी पात्र होतं…बॉब बिस्वास…हा बॉब कॉन्ट्रैक्ट किलर होता. शाश्वत चॅटर्जी या गुणी कलाकारानं ही छोटी भूमिका अप्रतिम साकारली आहे. चेह-यावर निरागस भाव असणारा हा बॉब आपल्या सावजाला टिपण्यापूर्वी त्याला ‘नोमोस्कार’ असं बोलायचा. त्याच्या पुढे हात जोडायचा आणि पुढच्याच क्षणी त्याची हत्या करायचा. प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा हा बॉब बिस्वास आता नव्यानं मोठ्या पडद्यावर येत आहे.
यावेळी या बॉबची भूमिका साकारत आहे अभिषेक बच्चन. गेल्या आठवड्यात बॉब बिस्वासच्या शुटींगची सुरुवात कलकत्ता येथे झाली. त्यावेळी अभिषेकने आपले बॉब लुकचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. त्याचा हा लुक बघून त्याच्या चाहत्यांनाही प्रश्न पडला आहे ‘पेहचान कौन’ एवढा जबरदस्त अभिषेकनं आपला लूक बदलला आहे.
हे ही वाचा: देसी गर्ल प्रियांका चोप्रा ऑस्करच्या स्पर्धेत….
बॉब बिस्वास हा कहानी या चित्रपटाचा प्रिक्वल आहे. कहानी चित्रपटामध्ये मध्ये बॉबचा एवढा प्रभाव होता की, सुजॉय घोष यांनी हे पात्र वेगळं करुन त्यावर स्वतंत्र चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. विद्या बालनच्या भूमिकेबरोबर बॉबची भूमिका करणा-या शाश्वत चॉटर्जी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. आता शहारुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे या बॉब बिस्वासची निर्मिती होत आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. शिवाय चित्रांगदा सिंग, अमर उपाध्याय, दीपराज राणा, गोपाल सिंग, पुरब कोहली, देव गिल, दिपीप्रिया रॉय, आणि विशेष भुमिकेत विद्या बालन यात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिया अन्नपूर्णो घोष करणार आहे.

बॉब बिस्वास ही एका सिरीयल किलरची कथा आहे. समाजात एक चेहरा असणारा बॉब वास्तवात वेगळा असतो. अभिषेक बच्चनने या दुहेरी भूमिकेसाठी मेहनत घेतली आहे. कोलकत्ता येथे 9 डिसेंबर पर्यंत चित्रपटाचे चित्रीकरण होणार आहे.
अभिषेक नुकताच लुडो या चित्रपटात बिट्टू या भूमिकेत दिसला. लुडोतील त्याच्या या बिट्टूचे अनेकांनी कौतुक केले आहे. याशिवाय त्याची ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली. एका पित्याची मानसिकता सांगणारी ही वेबसिरीज अभिषेकसाठी मोठी लॉटरी ठरली. एक सस्पेंन्स भूमिका यात अभिषेकनं साकारलीय. यातील त्याच्या अभिनयाचं सोशल मिडीयावर कौतुक होतंय. तशीच मिळती जुळती अशी बॉब बिस्वासमधील अभिषेकची भूमिका आहे.