
Aishwerya Rai ते आलिया भट्ट; अर्ध्यातच कलाकारांनी सोडले ‘हे’ सुपरहिट चित्रपट!
एखाद्या चित्रपटातून कलाकाराचा अचानक पत्ता कट होणं काही नवं नाही… कधी अॅक्टर किंवा अॅक्ट्रेलसला दुखापत झाली की तो मधूनच बॅकआऊट करतात किंवा मग काही कलाकारांच्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो… आज आपण अशाच कताही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी चित्रपटांचं शुटींग तर सुरु केलं होतं पण काही कारणांमुळे अर्ध्यातच चित्रपटाला रामराम केला आहे… विशेष म्हणजे या यादीत अगदी ऐश्वर्या राय, आलिया भट्ट यांचीही नावं आहेत…(Bollywood news)
ऐश्वर्या राय-बच्चन
२०१८ मध्ये रिलीज झालेल्या Fanney Khan चित्रपटानंतर भारताची विश्वसुंदरी ऐश्वर्या राय पुन्हा बॉलिवूडमध्ये दिसलीच नाही… ‘पोन्नियन सेल्वन २’ (Ponniyin Selvan 2) चित्रपट तिने केला पण तो साऊथमध्ये… कधी तिने नकळत बॉलिवूडमधून एक्झिट घेतली हे कुणाला कळलच नाही… पण तुम्हाला माहित आहे का शाहरुख खानच्या ‘चलते चलते’ (Chalte Chalte Movie) चित्रपटात आधी त्याच्यासोबत ऐश्वर्या दिसणार होती… मात्र, नंतर तिची जागा राणी मुखर्जीने (Rani Mukherjee) घेतली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला होता…(Aishwerya Rai-Bachchan)

कार्तिक आर्यन
‘भूल भूलैय्या २’, ‘सॅम बहाद्दर’ या चित्रपटांनंतर अजूनतरी कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला नाही… परंतु, धर्मा प्रोडक्श्न्सच्या दोस्ताना २ मध्ये कार्तिकची वर्णी लागली होती… जान्हवी कपूरसोबत खरं तर कार्तिक स्क्रिन शेअर करणार होता; शुटींगही सुरु झालं होतं… मात्र, आता कार्तिक ‘दोस्ताना २’ (Dostana 2 movie) मध्ये दिसणार नाही हे पक्क झालं आहे… अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपटांच्या सीक्वेल्समध्ये त्याला कार्तिक रिप्लेस करतोय अशा चर्चा सुरु झाल्या होत्या… आता मात्र कार्तिकलाच रिप्लेस करण्यात आलं असून ‘दोस्ताना २’ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता विक्रात मेस्सी आणि The Ba***ds Of Bollywood फेम लक्ष्य झळकणार आहेत…

श्रद्धा कपूर
फिमेल सेंट्रिक चित्रपटाच्या जगात हॉरर-कॉमेडी युनिवर्सचा एक महत्वाचा भाग असणाऱ्या श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) हिने फार मोजकेच पण धमाकेदार चित्रपट केले आहेत… प्रत्येक भूमिका मुलींना आपल्यातलीच वाटेल याची विशेष काळजी श्रद्धाने आपल्या अभिनयातून घेतलेली दिसते… पण श्रद्धाला परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) सायना नेहवालच्या बायोपिकमधून रिप्लेस केलं होतं…

आलिया भट्ट
बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा ‘लव्ह अॅण्ड वॉर’ चित्रपट लवकरच येतोय.. पण तुम्हाला माहित आहे का सुशांत सिंग राजपूतच्या ‘राबता’ (Raabata Mlovie) चित्रपटात क्रिती सेनॉनच्या आधी आलिया भट्ट लीड हिरोईन असणार होती… पण करण जोहरच्या चित्रपटासाठी तिने मध्यातच ‘राबता’ चित्रपटाला रामराम केला होता… (Alia Bhatt Movies)
================================
हे देखील वाचा : Deepika Padukone ते आलिया भट्ट; बॉलिवूड कलाकारांनीही सामना केलाय ‘या’ आजारांचा
=================================
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi