Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!

Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी २०२३ हे वर्ष फारच कमालीचे गेलं… ‘पठाण’, ‘जवान’, ‘गदर २’ आणि ‘अॅनिमल’ या चार चित्रपटांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत बॉक्स ऑफिसवर प्रत्येक चित्रपटाने ५०० कोटींच्या पुढचा टप्पा गाठला होता. या चित्रपटांव्यतिरिक्त ‘टायगर ३’, डंकी, ‘१२ वी फेल’, ‘ओएमजी २’ या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. .. मात्र, २०२३च्या मानाने २०२४ हे वर्ष हिंदी चित्रपटांसाठी फार चांगलं गेलं नाही… बिग बजेट चित्रपट होते खरे पण प्रेक्षकांना अपेक्षित मनोरंजन करु शकले नाहीत… आणि आता २०२५ हे वर्ष सुरु झालं असून आत्तापासूनच २०२६ मधील बिग बजेट चित्रपटांची चर्चा सुरु झाली आहे.. जाणून घेऊयात…. (Big budget films)
२०२४ या वर्षात तसे बरेच चित्रपट आले पण त्यापैकी ‘बडे मिया छोटे मिया’, ‘चंदू चॅम्पियन’, ‘वेदा’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे चित्रपट गाजले… आणि २०२५ या नव्या वर्षाची दमदार सुरुवात अक्षय कुमारच्या स्काय फोर्सने अनपेक्षितपणे केली. पुढे विकी कौशलच्या छावाने फेब्रुवारीपासून बॉक्स ऑफिसवरील घोडदौड मार्च संपायला आला तरी यशस्वीपणे सुरुच ठेवली आहे.. … आता पुढे देखील अनेक बिग बजेट चित्रपट २०२५ मध्ये येणार आहेत. यात ‘केसरी २’, ‘हाऊसफुल्ल ५’, ‘’बागी ४’, ‘वॉर २’, ‘अल्फा’, ‘रेड २’, ‘सन ऑफ सरदार २’, ‘तेरे इश्क मे’ या चित्रपटांचा समावेश आहे. तसं पाहायला गेलं तर २०२५ या वर्षात बरेच सीक्वेल्स प्रदर्शित होणार आहेत. (Bollywood upcoming films)
तर २०२६ मध्ये आतापासून डोकावून पाहिलं तर जानेवारी महिन्यात ‘बॉर्डर २’ रिलीज होण्याची शक्यता आहे.. ज्यात सनी देओल, वरुण धवन दिसणार आहेत. त्यानंतर जवळपास १८ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ‘भूल भूलैय्या’ चित्रपटानंतर आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’ घेऊन येणार आहेत ज्यात परेश रावल (Paresh Rawal) देखील दिसणार आहेत… (Entertainment news)

त्यानंतर दिवाळीच्या काळात संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अॅन्ड वॉर’ (love ANd War) या चित्रपटातून Alia Bhatt रणबीर कपूर आणि विकी कौशल (Vicky Kaushal) आपल्या भेटीला येणार आहेत. तर या चित्रपटाची टक्कर यश आणि कियारा अडवाणीच्या टॉक्सिक सोबत होणार आहे. तसेच, याचदरमन्यान शाहरुख खान, अभिनषेक बच्चन आणि सुहाना खान यांना ‘किंग’ हा चित्रपटही येण्याची शक्यता आहे. (Bollywood dharmaka)
इतर बिग बजेट चित्रपटांसोबत इम्रान हाश्मीचा ‘आवारापन २’ देखील थिएटरमध्ये धडकणार .. तसेच, मॅडॉक फिल्म्सचा ‘भेडिया २’ (Bhediya 2), आणि ‘चामुंडा’ देखील प्रदर्शित होणार आहेत..या सगळ्यात बहुप्रतिक्षित आणि चर्चित नितेश तिवारींचा ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटही पुढ्याच वर्षी रिलीज होणार आहे…आणि या चित्रपटाचा दुसरा भाग २०२७ मध्ये येणार आहे…वर्षाची सुरुवात जशी धमाकेजार झाली तसाच शेवट विकी कौशलच्या महावतार चित्रपटाने होण्याची शक्यता आहे..(Bollywood news update)
==============
हे देखील वाचा :शाहरुख खानला हिंदी सिनेमात पहिला ब्रेक हेमामालिनीने दिला!
==============
दरम्यान, गेल्या अनेक काळापासून हिंदी चित्रपट इतर भाषिक किंवा प्रामुख्याने साऊथचीच कॉपी करत आहेत किंवा रिमेक करत आहेत असं म्हटलं जात होतं.. पण आता २०२५ आणि २०२६ हे वर्ष प्रेक्षकांची ही मानसिकता बदलून नव्या कथा भेटीला घेऊन येणार आहेत.. शिवाय आजवरच्या हिंदी चित्रपटांच्या इतिहासात ही दोन वर्ष सर्वात जास्त बिग बजेट चित्रपट देणारी वर्ष असणार आहेत…(upcoming big budget films)