Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

सावधान! सेलिब्रिटींचे ‘रीललाईफ’ कंटाळवाणे होते आहे…
आता मी जी गोष्ट सांगणार आहे ती सोळा आणे खरी आहे. पण त्याला काही पुरावे नाहीत. म्हणूनच त्या घटनेत सहभागी असणाऱ्या लोकांची नावं मी इथे घेणार नाही. येत्या काळात एक सिनेमा मराठी जगतात प्रदर्शित होणार आहे. हा नायिकाप्रधान सिनेमा असणार आहे. या सिनेमासाठी नायिकेची निवड करण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक जंग जंग पछाडत होते. खरंतर एक अभिनेत्री होतीच त्यांच्या डोळ्यासमोर. पण आणखी कुणी मिळतं का, हे पाहिलं जात होतं.
काही काळानं आणखी एक नाव या नायिकेच्या भूमिकेसाठी आलं. आता दोघींमध्ये कोण यावर चर्चा सुरू झाली. दोन्ही अभिनेत्री उत्तम अभिनेत्या आहेत. दोघीही एकाच वयोगटातल्या. दोघींनी आपलं काम यापूर्वीच्या कलाकृतींमधून, नाट्यकृतींमधून दाखवून दिलेलं आहे. असं असताना या सिनेमात घ्यायचं कुणाला? तर मग एका अभिनेत्रीची अखेर निवड केली गेली.
आता जिची निवड झाली, तिला झुकतं माप का दिलं गेलं? याचं कारण एकच होतं की, तिला सोशल मीडियावर आणि विशेषत: सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स होते. शिवाय त्यात दररोज भरच पडत होती. हा असा आजचा इन्स्टाग्रामचा महिमा आहे. याच महिम्यावर मी येणार आहे.

आता साहजिक आहे की, मी कोणत्या सिनेमाबद्दल बोलतोय याचं कुतुहल सगळ्यांना असणार आहेच. पण मगाशी सांगितलं त्यानुसार कलाकारांची नावं सांगणं इथे योग्य नाही. हिंट देऊ शकतो.. ती हिंट अशी, की हा सिनेमा एका नाटकावर बेतला आहे.
गणित साधं सरळ होतं. ज्या अभिनेत्रीला जास्त फॉलोअर्स आहेत तिला जर सिनेमात घेतलं, तर त्याचा फायदा सिनेमाला होईल, असा सरळ हिशेब आहे. आज कोणाही कलाकाराला काम द्यायचं असेल, तर त्याचा सोशल मीडियावरचा वावर पाहिला जातो. त्याला किती लोक फॉलो करतात.. तो सोशल मिडियावर काय काय टाकतो.. त्याला लोक कसे रिएक्ट होतात; हे सगळं पाहिलं जातं. (Instagram reels and celebrities)
इन्स्टावर याचं प्रमाण जास्त आहे, कारण तिथे व्हिज्युअल्स जास्त चालतात. उदाहरणार्थ, इथे फोटो, व्हिडिओ, रील्स यांना ऊत आलेला असतो आणि त्याला मिळणारे हिट्स पाहता आपल्या कलाकृतीला त्याचा कसा फायदा होईल हेच यातून प्रत्येक निर्माता, चॅनल पाहू लागलं आहे. आज काल इन्स्टावर गेल्यानंतर अनेक मराठी-हिंदी कलाकार रील्स करताना दिसतात. ते त्यामुळेच!
ही रील करण्यामागे दोन कारणं असतात, काहींना काम मिळवायचं असतं, तर काहींना काम मिळाल्यामुळे ते करणं क्रमप्राप्त असतं. पण यालाही ना नाही. आता काळच असा आहे त्याला तुम्ही आम्ही काय करणार?

पण मुद्दा आपण जे काही आता इन्स्टावर केलं जातंय त्याबद्दल आहे. आज इन्स्टाग्राम उघडलं की कचऱ्यासारखे रील्स पडलेले असतात. एकेक करत आपण स्क्रोल करत जावं, तर त्यातून सध्या ट्रेडी असलेलं गाणं.. ट्रेंडी असलेलं म्युझिक आपल्याला समजतं. त्यावरच सगळं गाव रील करून टाकत असतं. अर्थात ज्याची त्याची निवड आहे ती. पण अशाच ‘पायलीला पचास’ असलेल्या म्युझिक्सवर जेव्हा आपले कलाकारही रील्स करून टाकताना दिसतात तेव्हा मात्र मनात दोन गोष्टी येतात. (Instagram reels and celebrities)
पहिली ही की याच घिश्यापिट्या बॅकग्राऊंडवर या संबंधित अभिनेत्याने वा अभिनेत्रीने रील का केली असावी? आणि दुसरा प्रश्न असा की, मग हेच करायचं होतं, तर त्याच सामान्य बॅकग्राऊंडवर अभिनेता वा अभिनेत्री असं बिरुद नसलेल्या मुलं-मुली जास्त उत्तम एक्सप्रेस होतायत. मग आता यात नेमकं गुणवान कोण ते ओळखायचं कसं?
एक नक्की की काही सेकंदांपुरती मर्यादित असलेली रील्स करायला.. त्यात पटापट बदलती एक्स्प्रेशन्स द्यायलाही गट्स लागतात. ते खायचं काम नाही. पण आपले अभिनेते किंवा अभिनेत्री.. हे रसायन त्याहून वेगळं असायला हवं. हे म्हणजे, मुंबईत धावणाऱ्या लोकल्स आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये जो फरक आहेत तोच इथे आहे, असं वाटत राहातं. (Instagram reels and celebrities)
लोकल उपनगरीय असतात म्हणून त्या काही कमी प्रतिष्ठेच्या आहेत अशातला भाग नाही. लोकल जलद पिकअप घेते. थोडा वेळ स्टेशनवर थांबते. पुन्हा वेग पकडते. शहरांतर्गत प्रवासाला ही लोकल ट्रेन जास्त परवडते. या बाबी जरी खऱ्या असल्या तरी लांब पल्ल्यांच्या गाड्यांची किंमत यामुळे कमी होत नाही. या गाड्या लोकल ट्रेन्सच्या तुलनेत उशीरा पिकअप घेतात. प्रत्येक स्टेशनला थांबत नाहीत. पण त्यांचा वेग इतरांपेक्षा जास्त असतो. त्यांच्या इंजिनातली ताकद लोकलला झेपणारी नसते. (Instagram reels and celebrities)
आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा. लोकल असो वा लांब पल्ल्याची गाडी, या दोघांच्या गरजा वेगवेगळ्या असतात असं जरी मानलं तरी त्यात डॉल नावाचा एक प्रकार असतो, ज्याला इंग्रजीत ‘ग्रेस’ म्हणतात. तो नेमका कशात आहे, हे ज्यानं त्यानं ठरवावं.
इन्स्टावरच्या कलाकारंच्या रील्सबद्दल असंच आहे. अलिकडे जे कलाकार मालिकांमध्ये काम करतायत त्यांना आपल्या इन्स्टावर अशा पोस्ट टाकणं बंधनकारक असतं म्हणे. तशी सक्ती चॅनल कलाकारांवर करतं. म्हणून मग ते कलाकार रील्स करताना दिसू लागतात. यातून या कलाकारांचे फॉलोअर्स त्यांना वाढवायचे असतात. त्याला हरकतही नाही. (Instagram reels and celebrities)
इथे आपण एक गोष्ट लक्षात घेत नाही की, जी कलाकार मंडळी गेली अनेक वर्षं मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत, त्यांनी आपल्याच कामातून आपला असा एक ब्रॅंड बनवलेला असतो. त्या ब्रॅंडचं एक बॅगेज या कलाकारांच्या खांद्यावर असतंच. हा काही एखाद्या भूमिकेचा छाप नव्हे. त्यामुळे हे बॅगेज या कलाकारांना हवंच असतं. त्यात काही चूक नाही, ते असायलाच हवं. त्यातूनच या कलाकारांना नवी कामं मिळत असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांना यांना बोलवलं जातं इत्यादी इत्यादी. पण मग इन्स्टावर रील करताना ते बॅगेज नेमकं कुठं जातं?
तात्पर्य असं की आपण कोण आहोत, आपण आजवर नेमकं काय आणि किती चांगलं काम करून बसलो आहोत, हे लक्षात घेऊन ही रील्स झाली, तर ती जास्त प्रेक्षणीय होतील. तुमचा फॉलोअर तुम्हाला फॉलो करेलच. तुम्ही तुम्हाला हवं ते संगीत निवडा, तुम्हाला हवं ते एक्स्प्रेशन द्या आणि त्याचा ट्रेंड होऊ द्या. तसं झालं तर आपला इन्फ्ल्युएन्स होतोय असं म्हणता येईल.(Instagram reels and celebrities)
======
हे देखील वाचा – सोशल मीडियाने आणली बौद्धिक दिवाळखोरी चव्हाट्यावर
======
बरं, नवं काही नसेल काढता येत तर ट्रेडिंग नसलेल्या गोष्टींना प्रवाहात आणता येईल. पण तसाही विचार होताना दिसत नाही. एकिकडे फॉलोअर कॅच करायचा आहेच. पण दुसरीकडे आपला ग्रेसही कमी होऊ द्यायचा नाहीये, अशी कसरत करता आली तरच आपल्याला आपला ग्रेस टिकवता येईल.
इन्स्टावरच्या हजारो रील्ससारखंच आपलं रील असणार असेल, तर त्याला काय अर्थ? या रील्समधून त्या त्या कलाकाराची चॉईसही कळत असते. आणि त्याचंही रीडिंग या मंडळींनी आता सुरू केलं आहे असं समजतं. सतत चेष्टा होऊन बसण्यापेक्षा काहीतरी नवं केलेलं चांगलं. सतत रील्स बघून कंटाळा त्यामुळे येतो. काहीतरी वेगळं, काहीतरी नवं इतकाच हेतू ठेवला तरी आपल्या कलाकारांच्या रील्सची दखल घेतली जाईल यात शंका नाही.