Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

डोंबिवलीत क्रिकेटचा महा धमाका; ८० Marathi Celebrities सिनेकलाकार भिडणार ‘डोंबिवलीकर

सचिनदा आणि Pancham Da : बाप से बेटा सवाई ?

Marathi & Bollywood Movie 2025 : वर्षाच्या अखेरीस ‘हे’ चित्रपट

Coolie बेचाळीस वर्षांचा झाला; या सुपरहिटची गोष्टच वेगळी

Manisha Koirala To Bhagyashree : बॉलिवूडचे हे स्टार्स आहेत राजघराण्यातील

धनुष – क्रितीच्या Tere Ishq Mein ला प्रेक्षकांची पसंती; केली

“उंदरासारखे मोबाईल घेऊन…”; पाराझींबदद्ल Jaya Bachchan स्पष्टच बोलल्या

Vachan Dile Tu Mala मधून अभिनेते मिलिंद गवळी येणार भेटीला;

नवी मालिका ‘Vachan Dile Tu Mala’ लवकरच भेटीला; अनुष्का सरकटे

अभिनंदन! ‘त्या’ चर्चांना लागला पूर्णविराम; Samantha Ruth Prabhu-राज निदिमोरू यांनी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Coolie बेचाळीस वर्षांचा झाला; या सुपरहिटची गोष्टच वेगळी

 Coolie बेचाळीस वर्षांचा झाला; या सुपरहिटची गोष्टच वेगळी
कलाकृती विशेष

Coolie बेचाळीस वर्षांचा झाला; या सुपरहिटची गोष्टच वेगळी

by दिलीप ठाकूर 02/12/2025

मिडियात असल्यानेच कोणत्याही दिवशी काहीही घडू शकते याची सवय जणू अंगवळणी पडलीय. १९८२ सालापासून मी मिडियात आहे. मुद्रित माध्यमापासून ते उपग्रह वाहिन्यांचे जग, डिजिटल युग असा प्रवास करत असतानाच आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष ठेवणे सवयीचे झाले आहे. हे का सांगतोय? तर, २६ जुलै १९८२ च्या दुपारनंतरची वेळ. पीटीआय व यूएनआय या वृत्तसंस्थेने ‘न्यूज फ्लॅश करीत म्हटलं, अमिताभ बच्चनला अपघात. एवढ्यावरुन चित्र स्पष्ट होणे शक्य नव्हतेच. ‘बातमीवर लक्ष ठेवणे आवश्यक होते.’ आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल युगात ही बातमी एव्हाना दूरवर पोहोचल्याची खात्री आहे. त्या काळात एक परिपक्वता होती,‌‌ सऺयम होता. तीच ताकद होती.)

मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपटाच्या बंगलोर येथील बंगलोर विद्यापीठाच्या ज्ञान भारती कॅम्पसमधील सेटवर मारहाण दृश्यात पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याचा अभिनय करताना स्टीलच्या टेबलाचा कोपरा अमिताभ बच्चनच्या पोटात लागून तो जखमी झाला आहे, त्याला स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आले आहे असा अधिक तपशील या वृत्तसंस्थानी दिला. तोही पूर्ण खात्री करूनच दिला. बातमी वरकरणी छोटी, पण आशय खूपच मोठा आणि महत्वाचा. अमिताभ बच्चनच्या पोटात लागलेय ही त्यात महत्वाची गोष्ट. किती लागेलय नि कसे लागलेय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दुसर्‍या दिवशीच्या वृत्तपत्रात कुठे पहिल्या पानावर तर कुठे आतील पानावर छोटी बातमी आली. सुरुवातीला तेवढेच त्या घटनेचे महत्व. दोन तीन दिवसांत याच बातमीने वेगळे स्वरुप धारण केले. जागाही ठळक मिळू लागली. हा बदल, हा वेग मी मिडियात असल्यानेच अनुभवता होतो. बातमी वरकरणी छोटी राहिली नव्हतीच. गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे लक्षात आले. अमिताभचा अपघाती आजार बळावला असून त्याला मुंबईत आणण्यात येत आहे. मुंबईत त्याच्या उंचीची (आडव्या साईजची) रुग्णवाहिकेसाठी त्याचा सेक्रेटरी शीतल जैन याने मुंबईत सगळीकडे शोध घेतला असता गिरगाव डॉ. भडकमकर मार्गावरील शिवसेना शाखा क्रमांक १९ यांच्याकडे ती आहे असे समजले. याच रुग्णवाहिकेतून अमिताभला दक्षिण मुंबईतील डॉ. भुलाभाई देसाई मार्गावरील ( वॉर्डन रोड) ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सगळे घडत गेले. मिडियाने यात पाठलाग केला नाही.

काही दिवस अमिताभच्या तब्येतीबद्दलची माहिती देणारे इस्पितळाचे मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध होत राहिले. जया बच्चनसह सगळे कुटुंबिय अमिताभची विचारपूस करायला येत होते. आणि ते अतिशय स्वाभाविक होतेच. घरातला एक माणूस असा आजारी आहे म्हटल्यावर कोणाच्याही कुटुंबात जे जे घडते तेच येथेदेखिल. मुंबईत तेव्हा प्रसिद्ध होत असलेल्या इंग्रजी सायंदैनिकात हे सगळेच पहिल्याच पानावर सविस्तर प्रसिद्ध होत राहिले. हळूहळू चित्रपट रसिकांत अमिताभच्या तब्येतीविषयी चर्चा वाढत गेली.‌आणि काळ्जीही वाटू लागली. अमिताभ बच्चन कारकिर्दीतीच्या उत्तुंग स्थानावर असल्याचे ते दिवस होते.

२ ऑगस्ट १९८२ अमिताभवर अतिशय महत्त्वपूर्ण व अवघड शस्त्रक्रिया. ती यशस्वी व्हावी म्हणून देशभरातील त्याच्या असंख्य चाहत्यांकडून देवळांत , मशिदीत, चर्चमध्ये, गुरुव्दारात पूजा. सर्वधर्मसमभाव म्हणतात तो हाच. या गोष्टीच्याही बातम्या झाल्या. कारण अर्थातच अमिताभ बच्चन. या सदिच्छांनी अमिताभचा जणू पुनर्जन्म झाला. ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्यावर आता आणखीन काही दिवस त्याला इस्पितळात उपचार घ्यावे लागणार हे स्पष्ट होते. तो सुपर स्टार‌ असला तरी मुळात तो हाडामासाचा माणूसच. दुखणी खुपणी, आराम, विश्रांती हे सगळे असणारच.

आता प्रत्येक दिवसासोबत अमिताभच्या आजारावरुन माध्यमातून चर्चा वाढत होती.( तेव्हा मुद्रित माध्यमे होते. दूरदर्शनवर फक्त संध्याकाळी साडेसात वाजता बातम्या असत. महत्वाचे म्हणजे, ‘पेपरात आलंय म्हणजे खरं ‘ अशी सामाजिक विश्वासार्हता होती. ती आजही कायम आहे, पुढेही रहावी.) रेखा बुरख्यात येऊन अमिताभला बघून गेली असंही गाॅसिप्स रंगले. त्यात आश्चर्य ते काय? त्या काळात गॉसिप मॅगझिनमधून बरेच काही रंगवून खूलवून वाढवून लिहीले जात असे. पण त्याने चित्रपट दुर्लक्षित झाला नाही.

२४ सप्टेंबर १९८२ अमिताभला इस्पितळातून डिस्चार्ज. महत्वाची बातमी म्हणून आम्ही सिनेपत्रकार व फोटोग्राफर्सची ब्रीच कॅण्डीबाहेर मोठ्याच प्रमाणावर गर्दी. त्यात अमिताभच्या फॅन्सचीही विलक्षण गर्दी. मी अमिताभ बच्चनचा चाहता आणि पत्रकारही, असा दुहेरी भूमिकेत.अनेकांच्या चेहर्‍यावर अमिताभ आता कसा आहे वा दिसतोय याची उत्सुकता आणि थोडी चिंतादेखिल. अतिशय महत्वाचा आणि ह्रद्य क्षण. बराच वेळ वाट पाहिल्यावर बाहेर येत असलेला अमिताभ तब्येतीने हटलेला, चेहरा उतरलेला, नजर हरवलेली असा. आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. काहीं फॅन्सना अजिबात राहवले नाही. काहीजण त्याला बिलगले. गर्दीतून वाट काढत पुढे जात असलेला अमिताभ म्हणाला, मै तो चला गया था, आप की दुवाओ से वापस आया… वातावरणात व्याकुळता, संवेदनशीलता.

एव्हाना देशविदेशात त्याच्या तब्येतीत सकारात्मक सुधारणा व्हावी म्हणून सर्व धर्मात प्रार्थना केली जात होती. सामाजिक, सांस्कृतिक वातावरण ढवळून निघाले होते. चित्रपट व समाज या नात्याचा हा एक वेगळाच पैलू होता. आपल्या देशात चित्रपट खोलवर रुजलाय, अनेकांच्या भावविश्वाचा तो भाग आहे याचाच हा प्रत्यय होता. चित्रपट इतिहासात हेदेखील महत्त्वाचे. काही महिन्यांनी पूर्ण बरा झाल्यावर अमिताभने प्रत्येक रविवारी संध्याकाळी एक तास जुहूच्या आपल्या प्रतिक्षा बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून आपल्या चाहत्यांना दर्शन देणे सुरु केले. हळूहळू या ‘अमिताभ दर्शना’साठी गर्दी वाढू लागली. देशभरातून ‘अमिताभ भक्त’ येऊ लागले. अमिताभचा आजार हा जणू देशभरातील महत्वाचा विषय झाला. अजूनही अमिताभ प्रत्येक रविवारी आपल्या बंगल्याबाहेर येत आपल्या चाहत्यांना दर्शन घडवलो आणि प्रेमाचा स्वीकार करतों.

७ जानेवारी १९८३ साकी नाकाजवळील चांदिवली स्टुडिओत ‘कुली’च्या शूटिंगनेच अमिताभ पुन्हा कॅमेरासमोर येत आपली ‘सेकंड इनिंग’ सुरु करीत असल्याचे मनमोहन देसाई यांच्या निर्मिती संस्थेकडून आमंत्रण हाती आहे. अमिताभ पुन्हा कॅमेरासमोर कधी येतोय या उत्सुकतेला उत्तर मिळत होते. ज्या मारहाण दृश्यावर शूटिंग थांबले होते. त्याच दृश्यापासून शूटिंग सुरु होत होते. अतिशय महत्वाचा क्षण असल्याने आम्ही सिनेपत्रकार व फोटोग्राफर्सची भरपूर गर्दी. लाईव्ह अनुभव होता. आणि वेगळाही अनुभव होता.

रति अग्निहोत्रीची विशेष उपस्थिती होती.‌ अर्थात तीच या चित्रपटाची नायिका. एव्हाना नायिकाची पुढची पिढी आली होती आणि अमिताभ बच्चनची नायिका निवडणे एक प्रश्न झाला होता. कोणाला बरे संधी मिळेल? चित्रपटसृष्टीतील काही मान्यवरही हजर. त्यात उल्लेखनीय नाव दिग्दर्शक प्रकाश मेहरा. त्याचं नि मनमोहन देसाई यांच्यातील सततचे वाद गॉसिप्स मॅगझिनना हुकमी खुराक म्हणून त्याचं येणे महत्वाचे. आणि अमिताभसह ते दोघेही उत्साहात.

================================

हे देखील वाचा : जेव्हा अमिताभ बच्चन यांना अपयशाच्या गर्तेतून Yash Chopra यांनी बाहेर काढले!

================================

दोन तीन चित्रीकरण सत्रात काही महिन्यांनी ‘कुली’चे शूटिंग संपले. आनंद बक्षी यांची गीते व लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असलेली ध्वनिमुद्रिका आणि ध्वनीफित प्रकाशित झाली. अमिताभसाठी पहिल्यांदाच शब्बीरकुमार याचा प्लेबॅक वापरल्याने अमिताभ भक्त नाराज. सारी दुनिया का बोझ हम उठाते है (शब्बीरकुमार), ॲक्सीडंट हो गया (आशा भोसले व शब्बीरकुमार), लंबूजी लंबूजी (.शब्बीरकुमार व शैलेंद्रसिंग) ही गाणी अमिताभ कृपेने चक्क लोकप्रिय झाली. तशी गाणी अगदीच निराशाजनक. आठवू नयेत अशी. २ डिसेंबर १९८३’कुली ‘ प्रदर्शित झाला. मुंबईत‌ मेन थिएटर अलंकार. (चक्क बेचाळीस वर्ष झाली देखिल. कधी हो इतका काळ गेला? समजले नाही.) आम्हा सिनेसमिक्षकांना पहिल्याच दिवसाची सेकंड शोची ‘हाऊसफुल्ल थेटरात पब्लिकसोबत पिक्चर एन्जॉय करा हेच एक प्रकारे सांगण्यात आले.

सुरुवातीच्या काही स्लाईड्स, मग जाहिरातपट व भारतीय समाचार चित्र संपले. आणि सेन्सॉर सर्टिफिकेटवर दिसले, बावीस रिळे. खच्चून भरलेल्या थिएटरमध्ये अक्षरश: प्रचंड टाळ्या शिट्ट्या. आपण अगोदर प्रेक्षक आहोत मग समिक्षक आहोत याचे भान असल्यानेच मीदेखिल टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करतोय हे पाहून शेजारीच बसलेल्या खडूस समिक्षकाने चेहरा विचित्र केला. असे अनुभव आठवणीने विसरायचे असतात. पण सोपे नसते. पहिल्याच दृश्यापासून मनजींच्या योगायोगाने भरलेला मसालेदार मनोरंजक चित्रपट. हेलिकॉप्टरमधून फिरणारा क्रूरकर्मा खलनायक झफर खान ( कादर खान) एका गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर येतो तेव्हा त्याला समजते त्याला अतिशय आवडलेल्या सलमाचे (वहिदा रेहमान) अस्लम खानशी (सत्येन कप्पू) लग्न होऊन तिला इक्बाल खान हा मुलगा आहे. तरीही त्याची पाशवी वृत्ती शांत बसत नाही.

अस्लम खान कुटुंबाचे व नाथू ( निळू फुले) व त्याच्या पत्नीशी (आशालता बावगावकर) चांगले नाते. ते महाराष्ट्रीयन. त्यांचा मुलगा अगदी लहान आहे. झफर खान धरणावर काम करत असलेल्या अस्लम खानला ठार मारतो तेव्हा फुटलेल्या धरणातील पाणी गावात शिरुन हाहाकार उडतो. अख्खं गाव वाहून जाते. सलमा त्या पाण्यात वाहून जाताना तिच्या मेंदूला मार बसून तिची स्मृती जाते. नाथूची पत्नी व मुलगा वाहून जातो. नाथूला इक्बाल सापडतो. तर झफर स्मृती गेलेल्या सलमाला घेऊन दुसर्‍या शहरात निघतो. तेव्हा रेल्वे स्टेशनवर पेपर विकणारा इक्बाल तिला ओळखतो.पण ती त्याला अजिबात ओळखत नाही. मध्ये काही वर्ष जातात. इक्बाल मोठा होतो आणि रेल्वे स्टेशनवरचा ‘कुली ‘ (अमिताभ बच्चन) बनतो….

================================

हे देखील वाचा : Dharmendra :  सुपरस्टार ते यशस्वी निर्माता….

================================

कादर खानने लिहिलेल्या या पटकथेत सतत अशीच (धक्कादायक?) वळणे येत जातात. कॅमेरामन पीटर परेरा व संकलक ह्रषिकेश मुखर्जी हे मान्यवर आपली जबाबदारी चोख बजावतात. इक्बाल व ज्युली डिसोझाचे ( रति अग्निहोत्री) व सनी ( ॠषि कपूर) व दीपा अय्यंगार ( शोमा आनंद) अशी दोन प्रेमप्रकरणे. इक्बाल व सनीची मैत्री. यातच विकी पुरी ( सुरेश ओबेरॉय), जाॅनी डीकाॅस्टा ( अमरिश पुरी), ओम पुरी ( ओम शिवपुरी….हे नामकरण ग्रेटच), गोगा ( गोगा कपूर), दीपाचे वडील ( मुकरी), बॉम्ब ( पुनीत इस्सार) अशा अनेक व्यक्तिरेखा… अशातच इक्बाल खान व बाॅब यांच्या मारधाडीचे दृश्य सुरु होताच मनात आपोआपच येते, याच फायटींगच्या वेळेस अमिताभच्या पोटात टेबलाचा कोपरा लागून तो जिवघेण्या आजारातून बचावला. आणि तेवढ्यात तो प्रसंग फ्रीझ होतो.

स्लो मोशनमध्ये फायटिंग सुरु होते आणि पडद्यावर येतं, या दृश्याच्या वेळेस अमिताभ जखमी झाला, ते वाचूनच चित्रपटगृहात एक प्रकारची शांतता पसरते आणि ते दृश्य पुन्हा वेगाने दाखवले जाताच अख्ख्या थिएटरमध्ये प्रचंड टाळ्या शिट्ट्यांचा पाऊल पडतो. हे अमिताभवरचे प्रेम असते. अशा पध्दतीने एकादे दृश्य फ्रीझ करणे योग्य आहे का यावर काहींनी प्रश्न निर्माण केला. तोपर्यंत पिक्चर असं काही सुपर हिट झाला की अलंकार थिएटरमध्येच पन्नास आठवड्यांचा खणखणीत मुक्काम केला. अनेक शहरांत पिक्चरने ज्युबिली हिट यश संपादले. हे यशच महत्वाचे असते. चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्यानी एन्जॉय केला जातो तेव्हा थिएटरमधील कॅन्टीनही जोरात चालते.

चित्रपटाच्या क्लायमॅक्सला झफर खानच्या बंदूकीच्या गोळीने इक्बालचा मृत्यू होतो असा मूळ पटकथेत असलेला शेवट रसिकांना पटणार नाही असे मानतच तो बदलला गेला. मनमोहन देसाई आमचे गिरगावकर ( मी खोताची वाडीतील, ते खेतवाडीतील, चालत गेलो तरी सहाव्या मिनिटावर त्यांचे प्रताप निवासमधील घर) आणि माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक. म्हणून ‘कुली’चं परीक्षण लिहिताना ‘मनोरंजनाचा फॅक्टर ‘ महत्वाचा मानला. आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीत एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट हा घटक मोलाचा. तोच‌ या पिक्चरमध्ये पडदाभर होता. ‘कुली’ रिलीज झाल्यावर अमिताभच्या आजाराची गोष्ट हळूहळू मागे पडत गेली तरी त्या आठवणीच्या जखमा आजही कायम आहेत.

मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘गंगा जमुना सरस्वती’च्या सेटवर पुनीत इस्सारच्या मुलाखतीचा योग आला असता त्याचा ‘कुली’च्या सेटवर अमिताभच्या पोटात बसलेल्या ठोशाचा विषय निघणे स्वाभाविक होतेच. पुनीत इस्सार मला सांगू लागला, ती गोष्ट घडल्यानंतर बरेच दिवस मी अस्वस्थ होतो. मला काहीच सुचत नव्हते. आणि तसा घाबरतच मी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अमितजींना भेटायला गेलो. तेव्हा ते मला म्हणाले, यात तुझी काहीच चूक नाही. हे केवळ दुर्दैवाने घडले. चूकन झालयं. त्यात इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. प्रकाश मेहरा यांच्या राकेशकुमार दिग्दर्शित ‘खून पसिना’च्या एका मारहाण दृश्यात विनोद खन्नाच्या हाताला असाच मार बसला तेव्हाही मी असाच अस्वस्थ झालो होतो. विनोद खन्नाने तेव्हा माझी अशीच समजूत काढल्यावर मला हलकं वाटलं. तूही तसेच समज असे अमिताभ म्हणाल्याचे पुनीत इस्सार मला म्हणाला. असो.

================================

हे देखील वाचा : धर्मेंद्रची भूमिका असलेल्या Shalimar चा ग्लॅमरस मुहूर्त केवढा गाजला…..

================================

अमिताभ बच्चनचे आजारपण सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्र अक्षरश: ढवळून काढणारे. जनसामान्यात अस्वस्थता निर्माण करणारे. म्हणूनच त्याचा फ्लॅशबॅक हा असा, ‘कुली’च्या सेटपासून त्याच्या यशापर्यंतचा प्रवास…. अमिताभ बच्चन म्हटलं की त्या प्रगती पुस्तकात अशा अनेक वेगळ्या गोष्टी आहेत, ज्या अमिताभच्या कुटुंबावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत, त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहेत. आजही कौन बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ अधूनमधून या गोष्टीचा उल्लेख करतो, तेव्हा ते जुने दिवस आठवतात. ‘कुली’ हा अमिताभ बच्चनच्या सर्वात जास्त यशस्वी अशा दहा चित्रपटांतील एक मसालेदार मनोरंजक चित्रपट आहे आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित अशाच सर्वाधिक सुपरहिट‌‌ पाच चित्रपटापैकी एक आहे.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan amitabh bachchan movies Bollywood Bollywood Chitchat bollywood update coolie Coolie movie Entertainment News
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.