Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे गाणे!
अभिनेते आणि दिग्दर्शक पी जयराज यांना 1980 साली भारतीय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. मूकपटापासून त्यांची अभिनयाची यात्रा सुरू होती. त्यांनी प्रतिमा (1945) या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते या सिनेमाचा नायक दिलीपकुमार होता! पी. जयराज यांनी भारतीय सिनेमाच्या तीन पिढ्यानसोबत काम केले. व्हि. शांताराम , मोतीलाल, पृथ्वीराज कपूर, अशोक कुमार यांच्या सोबत भूमिका केल्या. नंतरच्या पिढीच्या राजेंद्रकूमार (आस का पंछी ), धर्मेंद्र (जीवन मृत्यू), राजेश खन्ना (बहारो के सपने) पी जयरांज अमिताभ सोबत डॉन , शोले या सिनेमात चमकले होते! वयाच्या विसाव्या वर्षी त्यानी मूकपटातून अभिनयाची सुरुवात केली. रुवाबदार राज बिंडे व्यक्तिमत्व, भेदक नजर , खर्जातील आवाज या मुळे त्यांना विविध भूमिका साकारायच्या संधी मिळाल्या. अमरसिंग राठोड, पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, शहजहान , टिपू सुलतान , हैदर अली या व्यक्तीरेखा त्यानी साकारल्या.
त्यांच्या एका चित्रपटातील गाण्याचा किस्सा आहे खरंतर जयराज यांना गाण्याचे अजिबात अंग नव्हते. मुळात त्यांना गायला येत नव्हतेच. पण मुक पटाच्या नंतर जेव्हा सिनेमा बोलू लागला तेव्हा प्रत्येक कलाकाराला गाणं येणं कंपल्सरी झालं कारण तोवर प्लेबॅक सिंगिंग प्लेबॅक सिंगिंग ची पध्दत सुरू झाली नव्हती. अभिनेता जयराज यांना तर अजिबात गायला येत नव्हते त्यामुळे त्यांची खूप अडचण झाली. पहिले एक दोन सिनेमे न गाता निघून गेले पण 1933 साली आलेल्या ‘पतित पावन’ या चित्रपटात मात्र त्यांना गावे लागणार होते। या सिनेमाचे दिग्दर्शक फणी मुजुमदार होते तर संगीत प्रा बी आर देवधर यांनी दिले होते. जेव्हा आपल्याला या सिनेमात गायलाच लागेल हे निश्चित झालं तेव्हा जयराज यांनी एका गाण्याच्या शिक्षकाला आपल्या घरी बोलावलं आणि त्याच्याकडून रोज गाणं शिकू लागले.

परंतु काही दिवसातच तो गाणारा शिक्षक वैतागला आणि तो जयराज यांना म्हणाला,” सर तुमच्या आवाजामध्ये दर्द नक्की आहे पण सूर अजिबात नाही !” यानंतर या सिनेमाचे संगीतकार बी आर देवधर यांनी जयरांज यांना गायन शिकवायला सुरुवात केली. ते देखील वैतागले. पण शेवटी सिनेमाच्या शूटिंगची वेळ आली त्या काळात गाण्याचं वेगळं रेकॉर्डिंग होत नसे. त्या काळात सिनेमाचे शूट करतानाच गाणं देखील लाईव्ह रेकॉर्डिंग होत असे. वादक कलाकार कारण कुठेतरी झाडाच्या मागे, झोपडी च्या मागे लपून बसलेले असायचे आणि तिथून ते संगीत द्यायचे! नायक किंवा नायिका त्या सूरावर लाईव्ह गाणे गायचे. ‘पतित पावन’ मधील गाण्याच्या शूटिंगचा दिवस उजाडला. जयराज पूर्ण तयारी निशी आले होते पण ते मनातून खूप नर्वस होते. दिग्दर्शकाने ‘लाईट कॅमेरा ॲक्शन’ असे म्हटले आणि जयराज यांनी गायला सुरू केले. कुठेही स्वर आणि सूर यांचा मिलाफ होत नव्हता! तीन मिनिटाचे गाणे म्हणजे जर जयराज यांना तीन तपा इतकी मोठी भयंकर शिक्षा वाटले! अखेर गाणं संपलं.
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
================================
दिग्दर्शकांनी कट असे म्हटले. सर्व बादक कलाकार जोरजोरात हसू लागले कारण या गाण्यांमध्ये कुठेही सूर आणि स्वर यांचा संगम झालेला दिसला नाही. त्यामुळे जयरांज यांनी कानाला खडा लावला आणि ठरवले ,”माझ्या आयुष्यातील हे पहिले आणि शेवटचे गाणे यानंतर मी आयुष्यात कधीच गाणार नाही!!” आणि हे व्रत त्यांनी तंतोतंत पाळले. जयराज स्वतः कधी गायले नाही पण त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी खूपच मधुर आणि स्मरण रंजन करणारी आहेत. परवर दिगारे आलम तेरा ही है सहारा (हातीमताई ) ढलती जाये रात सुनले दिल की बात (रजिया सुलतान) ही गाणी आजही रसिकांच्या दिलात ताजी आहेत . त्यांच्या जीवनाचा गौरव करण्यासाठी, तेलंगणा सरकारने २०१८ मध्ये ‘जयराज यांचा जीवनप्रवास’ नावाची एक तासाची documentary तयार केली.