Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

danny denzongpa : डॅनीला हा आयकॉनिक रोल कसा मिळाला?
काही काही भूमिकांवर कलावंत आपलं नाव कोरून जातो आज आपण त्या भूमिकेत दुसऱ्या कुठल्या कालावंताचा असा विचारच करू शकत नाही. अशीच एक आयकॉनिक भूमिका अभिनेता डॅनीला (danny denzongpa) मिळाली होती बी आर चोप्रा यांच्या धुंद (Dhund) या चित्रपटात. या सिनेमात डॅनीने साकारलेला खलनायक जबरदस्त होता. अपंग, कायम व्हीलचेअरवर वावरणारा, चेहऱ्यावर कायम त्रासिक, चिडका, उद्दाम, रागीट संतापी भाव आणि संशयी वृत्तीचा खलनायक अगदी परफेक्ट रंगवला होता. डॅनीला ही भूमिका खूप आवडली होती पण ती त्याला मिळाली नव्हती. बी आर चोप्रा यांना या भूमिकेसाठी डॅनी खूपच कमी वयाचा आणि अपरिपक्व वाटत होता मग शेवटी डॅनीला ही भूमिका मिळाली? कशी खूप इंटरेस्टिंग असा किस्सा आहे.

पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डॅनी (danny denzongpa) साठच्या दशकाच्या अखेरीस शिकत होता. १९६९ साली बी आर चोप्रा यांनी एकदा एफ टी टी आयला व्हिजीट केली त्यावेळेला त्यांच्या दृष्टी पथात डॅनी आला. पूर्वांचल भागात वाढलेला डॅनी त्यांना पाहताक्षणी आवडला आणि त्याला, ”तुझा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर मुंबईतून येवून भेट.” असे सांगितले. नंतर डॅनीने आपला कोर्स पूर्ण केला. तो मुंबईला आला आणि चुकून बी आर चोप्रा यांच्या ऐवजी तो बी आर इशारा (B. R. Ishara) यांना जाऊन भेटला. बी आर इशारा यांना देखील डॅनी खूप आवडला. त्यांनी डॅनीला आणि रीना रॉयला घेऊन एका चित्रपटाचे अनाउन्समेंट करून टाकले. पण दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण झाला नाही. (entertainment mix masala)

नंतर गुलजार यांनी ‘मेरे अपने’ या चित्रपटात डॅनीला एक छोटीशी भूमिका दिली. तसेच बी आर इशारा यांनी देखील ‘जरुरत’ या चित्रपटात डॅनीला (danny denzongpa) घेतले. याच दरम्यान त्याची भेट पुन्हा एकदा B. R. Chopra यांच्याशी झाली. त्या वेळी ते ‘दास्तान’ हा चित्रपट करत होते. हा चित्रपट बिग बजेट होता. यात दिलीप कुमार, शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, बिंदू यांच्या भूमिका होत्या. सिनेमाचा नायक दिलीप कुमार असल्यामुळे चित्रपट तब्येतीने बनत होता. याच काळात बी आर चोप्रा यांनी एक स्मॉल बजेट सिनेमा काढायचे ठरवले. अगस्ता ख्रिस्ती यांच्या एका गाजलेल्या कादंबरीवर (द अन एक्स्पेक्टेड गेस्ट) त्यांनी चित्रपट काढायचे ठरवले. तो चित्रपट होता ‘धुंद’.

जेव्हा डॅनीला बी आर चोप्रा ‘धुंद’ नावाचा चित्रपट काढत आहेत असे कळले त्यावेळेला त्यांनी यात भूमिका मिळावी यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला. परंतु बी आर चोप्रा यांना यातील खलनायकायका भूमिकेसाठी डॅनी खूपच तरुण आणि अपरिपक्व वाटला. त्यामुळे त्यांनी ही भूमिका अमिताभ बच्चनला ऑफर केली. डॅनीला याच सिनेमात दुसरी भूमिका दिली. डॅनी (danny denzongpa) नाराज झाला होता पण करणार काय? त्याच वेळेला अमिताभ बच्चन यांचा ‘आनंद’ हा चित्रपट हिट झाल्यामुळे ‘धुंद’ या चित्रपटातील निगेटिव्ह शेडची भूमिका त्याने नाकारली आणि तो या सिनेमातून बाहेर पडला. नंतर बी आर चोप्रा यांनी ही भूमिकेत शत्रुघ्न सिन्हाला घ्यायचे ठरवले. पण शत्रुघ्न सिन्हा घरी स्टोरी टेलिंग वर्कशॉपला उशिरा पोहोचल्यामुळे बी आर चोप्रा यांच्या मनातून तो उतरला आणि त्यांनी त्याचा पत्ता तिथेच कट केला!
==============
हे देखील वाचा : Kishore Kumar यांना एकच गाणे दोनदा का रेकॉर्ड करावे लागले?
==============
या सर्व घडामोडी डॅनी (danny denzongpa) पाहत होता. तो पुन्हा एकदा चोप्रा यांना भेटला आणि त्या भूमिकेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. बी आर चोप्रा यांनी देखील आता या भूमिकेसाठी डॅनीचा सिरीअसली विचार करायला सुरुवात केली. त्याची स्क्रीन टेस्ट घेतली आणि हे भूमिका त्यांनी डॅनीला ऑफर केली. डॅनीच्या आयुष्यातील ही सर्वोत्कृष्ट भूमिका ठरली. त्याने अतिशय मेहनत घेवून ती साकारली. १९७३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि जबरदस्त हिट झाला. डॅनीला या चित्रपटानंतर तब्बल साठ सिनेमाच्या ऑफर आल्या. त्यात एक ऑफर फिरोज खानच्या धर्मात्माची होती तर दुसरी रमेश सिप्पी यांच्या ‘शोले’ ची! त्याने धर्मात्मा स्वीकारला. अशा रीतीने डॅनीची सर्वोत्तम भूमिका प्रेक्षकांपुढे आली. आधी डॅनीला दिलेला रोल नंतर मदनपुरीने साकारला.
गमंत पहा बिग बजेट दास्तान सुपर फ्लॉप झाला आणि लो बजेटचा ‘धुंद’ सुपर हिट झाला!