Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘डार्लिंग डीन’ ची सेट वर कशा प्रकारे घेतली जात आहे काळजी?

 ‘डार्लिंग डीन’ ची सेट वर कशा प्रकारे घेतली जात आहे काळजी?
Press Release

‘डार्लिंग डीन’ ची सेट वर कशा प्रकारे घेतली जात आहे काळजी?

by Kalakruti Bureau 11/07/2020

गेले अनेक दिवस देशात लोकडाऊन सुरू झाल्याने सर्व काम ठप्प झालं होतं. मात्र मिशन बिगन अगेन अंतर्गत हळू हळू पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाकी.’झी युवा’ वाहिनीवरील आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ‘डॉक्टर डॉन’ या मालिकेच्या सेटवर देखील आता लगबग दिसू लागली आहे कारण मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे. कोरोनाच्या संकटाचा विचार करता, योग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरण केले जात आहे. सेटवर नेमके वातावरण कसे आहे, आणि आपली लाडकी अभिनेत्री श्वेता शिंदे कशाप्रकारे काळजी घेत आहे, याविषयी तिच्याशी केलेली ही बातचीत;

चित्रीकरणादरम्यान सेटवर काय काय खबरदारी घेतली जात आहे?

मीरारोड, ही अत्यंत गजबजलेली जागा आहे. या ‘रेड झोन’मध्ये चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मालिकेचे चित्रीकरण एका रिसॉर्टमध्ये सुरु आहे. मालिकेतील कलाकार व संपूर्ण टीम तिथेच राहते. कुणालाही बाहेरून आत येण्याची, अथवा बाहेर कुठेही जाण्याची परवानगी देण्यात येत नाही. जेवणाखाण्याच्या कारणाने सुद्धा कुणीही आवाराच्या बाहेर पडत नाही. संपूर्ण सेट, प्रत्येक कलाकारांची खोली या सगळ्याचं निर्जंतुकीकरण करण्यात येतं. मास्क, सॅनिटाजयझर्स, फेसशिल्ड या सगळ्याचा वापर करूनच चित्रीकरण केलं जातं. कलाकारांना सीनच्या दरम्यान या गोष्टी वापरणे अशक्य असते, त्यामुळे आम्ही कलाकार मंडळी अधिक खबरदारी घेत आहोत. एखाद्या सीनची तालीम करायची झाली, तरीही सामाजिक अंतर राखले जाते. आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, याचा विचार करून, सेटवरील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागत आहे.

सेटवर नेमकं कसं वातावरण पाहायला मिळत आहे?

दिग्दर्शक, मुख्य कलाकार या मंडळींनी पुढाकार घेऊन सेटवरील वातावरण सकारात्मक आणि उत्तम राहील याची काळजी घेणे आवश्यक असते. आमच्यापैकी कुणालाही काहीही झालेले नाही आणि सगळेजण आपापली जबाबदारी ओळखून, उत्तमरीत्या काम करू याची जाणीव आमच्या वागण्याबोलण्यातून सर्वांना होईल याची संपूर्ण खबरदारी घेतली जाते. त्यामुळे सकारात्मक वातावरणात चित्रीकरण पार पडेल याची आम्ही काळजी घेत आहोत.

सेटवर तू स्वतःची काळजी कशी घेत आहेस?

मी सातत्याने थर्मास सोबत ठेवते. गरम पाणी पीत राहणं, वेळोवेळी सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं, सुरु आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढेल यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मी करते आहे. चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार, नियमित व्यायाम या गोष्टी सुरु आहेत. आरोग्य उत्तम राहावं आणि कुठलाही आजार होऊ नये, यासाठी जी काही खबरदारी घेणं शक्य आहे, ती सर्व खबरदारी मी घेते आहे. सगळेच कलाकार योग्यप्रकारे, आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत.

तू स्वतःची काळजी कशाप्रकारे घेत आहेस?

माझा मेकअप मी स्वतःचा स्वतः करते आहे. माझी केशभूषा होण्याआधी त्यासाठी लागणार असलेली सर्व उपकरणं व्यवस्थित निर्जंतुक करण्यात येतात. मालिकेतील पोषाखासाठी वापरण्यात येणारे कपडे सुद्धा योग्यरीतीने निर्जंतुक करून मगच मी वापरते. या सर्व छोट्या गोष्टींची सवय नसल्यामुळे, सुरुवातीच्या काळात सगळंच थोडं कठीण वाटत आहे. मात्र यासगळ्याची सवय आम्ही हळूहळू करून घेत आहोत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment marathi Show Television Zee Yuva
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.