DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया कुणाची होती?
भारतामध्ये थिएटरला सर्वाधिक चाललेला चित्रपट म्हणून आता ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाकडे पाहिले जाते. 20 ऑक्टोबर 1996 या रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट कोरोनाचा दोन वर्षाचा कालावधी सोडला तर मागची 30 वर्ष हा चित्रपट, अखंडपणे मुंबईच्या ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहात चालू आहे! हा कदाचित जागतिक विक्रम असावा. हा चित्रपट यशराज फिल्मसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा होता. यश चोप्रा यांचे चिरंजीव आदित्य चोप्रा याने दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता. या सिनेमाला वर्ल्ड वाईड प्रचंड यश मिळाले. हा सिनेमा भारत्तातील आणि भारताबाहेरील एन आर आयला कनेक्ट होणारा सिनेमा होता.

चित्रपटात परदेशात राहून भारतीय संस्कृती जपत असणाऱ्या पंजाबी कुटुंबाची कथा होती. जुन्या संस्कृती आदरासोबत सोबतच नवीन वेस्टर्न कल्चर चा स्वीकार या सर्वांचं एक कम्प्लीट म्युझिकल एंटरटेनमेंट पॅकेज म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’. शाहरुख खान, काजोल, अमरीश पुरी हे चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये होते. चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत जतिन ललित यांचे होते. चित्रपटातील सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. विदेशी लोकेशन्स वर फुलणारी प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती. (Bollywood Cult Classic Movie)
या चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्याचा किस्सा मध्यंतरी जतिन ललित यांनी एका वाहिनीवरील कार्यक्रमात सांगितला होता. खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. या सिनेमात ‘मेहंदी लगाके रखना डोली सजाके रखना..’ या गाण्याची शुटिंग चालू होती. हा चित्रपट सुरुवातीपासूनच मोठ्या स्केलवर बनत होता. त्यामुळे या चित्रपटाच्या मीटिंग्स खूप उशिरापर्यंत चालत असायच्या. परदेशातील प्रेक्षक वर्ग नजरेसमोर ठेवून चित्रपट बनत होता. चित्रपट सर्वच बाबतीत उजवा ठरावा म्हणून प्रत्येकाची धडपड होती. मीटिंग उशिरापर्यंत चालत असल्यामुळे खाणे पिणे देखील तिथेच व्हायचं. पामेला चोप्रा स्वतः जातीने सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था पाहत असायच्या. ‘मेहंदी लगाके रखना…’ या गाण्याची शुटिंग देखील खूप उशिरापर्यंत चालत असायची. सिनेमात हे गाणे खूप महत्वाचे होते. गाणं व्यवस्थित बसवलं गेलं. रेकॉर्डिंग अजून बाकी होतं. (Dilwale Dulhaniya Le Jayenge Movie)

आनंद बक्षी, जतीन ललित, यश चोप्रा आदित्य चोप्रा सर्वजण उपस्थित होते. रात्र खूप झाली होती. सर्वजण जायला निघाले. जतीन ललित म्हणाले की,”मीटिंग दुपारपासून चालू असल्यामुळे आम्ही अक्षरशः थकलो होतो. पण त्याच वेळी गीतकार आनंद बक्षी आणि यश चोपप्रा हे पंजाबी मधून एकमेकांशी काहीतरी बोलत होते. आम्ही तिकडे लक्ष दिले नाही. दोघेही परस्परांशी बोलताना पंजाबी भाषेचाच वापर करायचे! त्यांचं बोलणं झाल्यानंतर यश चोप्रा यांनी आम्हाला थांबायला सांगितले आणि पुन्हा आमची मीटिंग पुन्हा सुरू झाली!”.. त्यावेळी यश म्हणाले की,” या गाण्यांमध्ये काजोलची एन्ट्री खूप चांगली होते आहे पण शाहरुखची देखील एंट्री तशीच धडाकेबाज व्हायला पाहिजे. शेवटी तो चित्रपटाचा हिरो आहे. त्यासाठी गीतकार आनंद बक्षी यांनी गाण्याचा स्टार्ट बदलला आहे!” संगीतकार जतीन ललित गोंधळात पडले. कारण गाणं बऱ्यापैकी कम्प्लीट झालं होतं. पण आनंद बक्षी म्हणाले ,” शाहरुखची एन्ट्री त्याच्या इमेजला साजेशी पण धडाकेबाज व्हायला पाहिजे. आणि लगेच त्यांनी पंजाबी मधून काही ओळी गायला सुरुवात केली. सर्वांनी तिथल्या तिथे ताल धरला.” आनंद बक्षी यांनी पंजाबी मधून गायलेल्या ओळी होत्या
ये कुडीया नशे की पुडीया
ये मुंडे गली के गुंडे
ये कुडीया नशे दी पुडिया
ये मुंडे गली के गुंडे
ये कुडीया नशे दी पुडिया
हो हो…

आनंद बक्षी म्हणाले “आपण गाण्याचा स्टार्ट इथूनच करूया…’ सर्वांना ती आयडिया खूप आवडली. पंजाबी मधल्या गाण्याच्या ओळी गीताचे वजन आणखी वाढवणाऱ्या होत्या. उदित नारायण आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड झालं आणि प्रचंड लोकप्रिय झाले. सुरुवातीच्या पंजाबी ओळी ने गाणे आणखी धमाल बनले होते. या गाण्यात मोठी नाट्यमयता होती. परंपरा होती सोबत विद्रोह होता. आनंद होता सोबत दर्द देखील होता. कुटुंबासोबतचे प्रेम आणि प्रतारणा या भावना होत्या. या गाण्यासाठी उदित नारायण यांना फिल्मफेअरचे बेस्ट मेल सिंगर चे अवार्ड मिळाले.
================================
हे देखील वाचा : Dilwale Dulhania Le Jayenge : राज-सिमरनच्या लव्हस्टोरीला ३० वर्ष पूर्ण
================================
आनंद बक्षी हे स्वतः चांगले गायक होते संगीताची त्यांना खूप चांगली जाण होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी देखील एका मुलाखतीत सांगितले होते तेव्हा एखाद्या गाण्याचा मुखडा जेव्हा बक्षी घेऊन यायचे तेव्हा त्याची चाल देखील सोबत घेऊन यायचे! त्यामुळे आमचे काम बऱ्याचदा सोपे व्हायचे. जतीन ललित यांनी या मुलाखतीत देखील सांगितले की “आनंद बक्षी यांच्यामुळे आमचे काम 50% कमी व्हायचे कारण त्यांच्याकडे म्युझिकचा एक वेगळा सेन्स होता.” ‘मेहंदी लगाके रखना…’ हे गाणं चित्रपटातील हायलाईट ठरले. सिनेमात या गाण्याच्या नंतर लगेच ‘वक्त’ या चित्रपटातील ‘ऐ मेरी जोहराजबी…’ हे गाणं जोडून घेतल्यामुळे आणखी धमाल निर्माण झाली!