Mahesh Manjrekar यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं निधन

Deewar & Dev Anand : हे घडलं नाही, बरे झाले….
देव आनंदचा चाहता असणे हे एक प्रकारचे उर्जा देणारे असते. त्याच्या चित्रपटातील गाणी गुणगुणली तरी हुरुप येतो.( देस परदेस चित्रपटापर्यतची हे सांगायचे नव्हते पण तीच वस्तूस्थिती आहे.) राजेश खन्नाचा सुपर स्टारचा झंझावात विलक्षण होता. त्या काळात एकाच वेळी मुंबईतील ऐंशी टक्के चित्रपटगृहात त्याचेच चित्रपट दाखवत होते. चित्रपट रसिकही ते हाऊसफुल्ल गर्दीत एन्जॉय करीत होते.

अमिताभ बच्चनच्या उर्जेबद्दल सांगावे तेवढे थोडेच. आज वयाच्या ८३ व्या वर्षीदेखील तो कौन बनेगा करोडपतीचा प्रत्येक भाग खुलवतो. रंगवतो. एखाद्या व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे यासाठी अमिताभ बच्चन उत्तम आदर्श (मॉडेल) आहे. आजच्या गतिमान व व्यावसायिक जगात तर अमिताभकडून बरेच काही शिकण्यासारखे! हे सर्व आताच का सांगतोय? …

छे ते, काही कल्पनाच करवत नाही, आणि करु देखिल नव्हे. गुलशन रॉय निर्मित, सलिम जावेद लिखित व यश व चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ मध्ये अमिताभ बच्चनच्या जागी देव आनंद व शशी कपूरच्या जागी राजेश खन्ना असे कलाकार आहेत. क्षणभर डोळ्यासमोर दृश्य आणा विजय अतिशय अभिमानाने अंडरवर्ल्डमधील राज दावरला (इफ्तेखार) सुनावतो, “आज भी मै फेके हुये पैसे नहीं उठाता”, हे देव आनंदने आपल्या खास शैलीत म्हटल्याचे अमिताभ बच्चनसारखे पॉवरफुल्ल वाटले असते का? देव आनंदच्या बोलण्यावर आपण कितीही फिदा असू पण ते सगळ्याच प्रसंगात नाही हो.
====================================
हे देखील वाचा : मीठ भाकर ते Vadapav चित्रपटाच्या नावात खाद्य पदार्थांची परंपरा पाऊणशे वर्षांची…
====================================
‘दीवार’ला पन्नास वर्षे झालीत आणि सिंगल स्क्रीन थिएटरच्या युगातील हा लोकप्रिय चित्रपट व्हिडिओ कॅसेट; व्हिडिओ थिएटर,; उपग्रह वाहिनी, मोबाईल स्क्रीन करत करत ओटीटी युगापर्यत येताना रसिकांच्या किमान चार पिढ्या झाल्या आहेत आणि विजयचे श्रीमंतीमागच अजब तत्वज्ञान, झटपट श्रीमंतीचे यश अमिताभ बच्चनच रुपेरी पडद्यावर मांडू शकतो आणि आणि त्याचा धाकटा भाऊ पोलिस इन्स्पेक्टर रवि (शशी कपूर) हा अतिशय निर्धार व कर्तव्यनिष्ठपणे आपल्या मोठ्या भावाने चुकीच्या मार्गाने तत्त्वाला तिलांजली दिली आहे हे लक्षात आल्यावर भावाशी संघर्ष करतो. या भूमिकेत शशी कपूरच फिट्ट बसलाय. राजेश खन्ना ही व्यक्तीरेखा उत्तम वढवू शकला असता पण देव आनंदचा लहान भाऊ म्हणून आपण त्याचा स्वीकार करु शकलो असतो का?

देव आनंदच्या जागी अमिताभ बच्चन आल्यावर राजेश खन्नाने त्यांच्या लहान भावाची भूमिका स्वीकारणे शक्यच नव्हते. अगोदरच ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ (नोव्हेंबर १९७३) पडद्यावर आला तोच राजेश खन्नाला अमिताभ भारी ठरलाय अशी सगळीकडेच चर्चा वाढवणारा ठरला. १९७४ च्या सुरुवातीस ‘दीवार’च्या निर्मितीत हालचाल सुरु झाली. निर्माते गुलशन रॉय यांनी राजेश खन्नाला आपल्या नवीन चित्रपटासाठी करारबद्ध केले होते ते ‘दीवार’साठी उपयोगात यावे हा गुलशन रॉयचा व्यावसायिक दृष्टिकोन झाला. पण राजेश खन्नासाठी आमच्याकडे दुसरी पटकथा आहे, विजयच्या भूमिकेसाठी अमिताभच हवा हा सलिम जावेद यांचा आग्रह. हे फार महत्त्वाचे असते. पटकथा संवाद लेखकाचा विश्वास खूपच महत्त्वाची गोष्ट.
विजयच्या लहान भावाची भूमिका नवीन निश्चलला द्यायचं ठरलं. पण आपण ज्योती स्वरूप दिग्दर्शित ‘परवाना’ (१९७१) आपण नायक होतो आणि अमिताभ खलनायक होता, आपण त्याचा धाकटा भाऊ साकारायचा? ते, छे अजिबात नाही असे म्हणतच त्याने नकार दिला हे बरेच झाले, तसा तो खूप मर्यादा असलेला कलाकार होता. पण वागण्यात फार स्टारडम असल्याने त्यांच्या कारकिर्दीला गळती लागली. शशी कपूरचा बी. आर. चोप्रा निर्मित ‘वक्त’ च्या वेळचा यश चोप्राना चांगला अनुभव असल्याने त्यांनी शशी कपूरची निवड तर केली. पण त्याचा महत्वाचा प्रश्न, आपण वयाने अमिताभपेक्षा मोठे आहोत, अशा वेळी आपण लहान भावाची भूमिका स्वीकारणे योग्य नाही. यशजीनी त्याला सांगितले, तू त्याचा धाकटा भाऊ दिसशील ही जबाबदारी संपूर्णपणे माझी.

एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? चित्रपट निर्मिती होताना काही ना काही कारणास्तव मूळ कलाकार बदलत बदलत जात असतात. जे काही घडते बिघडते ते चांगल्यासाठीच. विजय व रवि यांच्या आईची भूमिका वैजयंतीमालानी करावी यासाठी गुलशन रॉय व यश चोप्रा चेन्नईला (तेव्हाचे मद्रास) गेले. वैजयंतीमालाने आपण आपल्या निवृत्तीवर ठाम आह़ोत असे सांगितले. त्यामुळे निरुपा रॉयची निवड झाली आणि चित्रपट सुपरहिट झाल्याचा निरुपा रॉयला चरित्र भूमिकेत मागणी वाढली.
====================================
हे देखील वाचा : Dev Anand : ….तसं झालं असतं तर देव आनंद ‘तिसरी मंझिल’चा नायक राहिला असता!
====================================
देव आनंद निरुपा रॉयचा मुलगा म्हणून शोभला असता का? ज्या वैजयंतीमालाचा आपण विजय आनंद दिग्दर्शित “ज्वेल थीम”चा नायक साकारला तिचा मुलगा म्हणून देव आनंदला चित्रपट रसिकांनी स्वीकारले असते का? ‘दीवार’ साठी देव आनंदला एक व्यावसायिक औपचारिकता म्हणून विचारले असावे. गुलशन रॉय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘जोशीला’ (१९७३) मध्ये देव आनंद होता म्हणून त्यातून विचारणा झाली असावी. एखाद्या भूमिकेसाठी औपचारिकपणे विचारणे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून चर्चा होणं या भिन्न गोष्टी आहेत निरुपा रॉय, देव आनंद व राजेश खन्ना यांचं ‘दीवार’चे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाले आणि हे सगळं सांगाव़ेसे वाटले. एक पोस्टर डिझाईन एक वेगळा विषय असतोच. फक्त तो लक्षात यायला हवा….