Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दिलीप-Raj Kapoor-देव या तिघांना घेऊन सिनेमा बनवण्याचा गोल्डीचा प्रोजेक्ट का फसला?

 दिलीप-Raj Kapoor-देव या तिघांना घेऊन सिनेमा बनवण्याचा गोल्डीचा प्रोजेक्ट का फसला?
बात पुरानी बडी सुहानी

दिलीप-Raj Kapoor-देव या तिघांना घेऊन सिनेमा बनवण्याचा गोल्डीचा प्रोजेक्ट का फसला?

by धनंजय कुलकर्णी 05/12/2025

हिंदी सिनेमातील सदाबहार त्रिकूट दिलीप कुमार राज कपूर आणि देव आनंद  या तिघांनी पन्नास आणि साठ चे दशक आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजवले. या तिघांनी एकत्र कधीच काम केले नाही. राजकपूर आणि दिलीप कुमार यांनी १९४९ सालच्या मेहबूब दिग्दर्शित ‘अंदाज’ या चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. त्यानंतर पुन्हा ते कधीच एकत्र आले नाहीत. दिलीप कुमार आणि देव आनंद यांनी  एस एस वासन दिग्दर्शित १९५५ सालच्या ‘इन्सानियत’ या चित्रपटात एकत्र भूमिका केली होती. त्यानंतर ते पुन्हा कधीच एकत्र आले नाहीत.  

देव आनंद आणि राजकपूर यांनी कोणत्याही चित्रपटात एकत्र भूमिका केली नाही. खरंतर हे तिघेही त्या काळातील सुपरस्टार होते. या तिघांना एकत्र घेऊन चित्रपट करायचा कोणत्याच निर्मात्यानी कधी प्रयत्न केला नाही का? माहिती नाही. पण सत्तरच्या दशकामध्ये विजय आनंद तथा गोल्डी याने या तिघांना एकत्र घेऊन एक चित्रपट बनवायचा प्लॅन केला होता. ख्यातनाम लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांनी लिहिलेल्या ‘एक होता गोल्डी’ या पुस्तकात हा किस्सा विस्ताराने लिहिला आहे.

‘सफर’ (१९७०)  या चित्रपटाच्या  यशानंतर निर्माते मुशीर रियाज हे या चित्रपटाला निर्माण करणारा होते. सत्तरच्या दशकातील गाजलेले पटकथा आणि संवाद लेखक सलीम जावेद या सिनेमाचे स्क्रिप्ट आणि संवाद लिहणार होते.  विजय आनंद यांनी जेव्हा आपल्या या प्रोजेक्ट बाबत देव आनंद यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा देवने गोल्डीला बजावले ,” एक लक्षात घे गोल्डी, हा सिनेमा तू दिलीप कुमार सोबत करतो आहेस. जर तू सांगतो तसेच कथानक आणि संवाद  शेवटपर्यंत राहिले तरच मी या चित्रपटात काम करेन. कारण दिलीप कुमार कथानकात आणि पटकथेत नेहमी बदल करत असतात. जर तू याची गॅरंटी घेत असशील तर मी तुझ्या चित्रपटात काम करेन!”  त्यावर गोल्डी विजय आनंद यांचे म्हणणे असे होते,”हा सिनेमा मी दिग्दर्शित करत आहे. त्यात कुठलेही बदल होणार नाहीत. याची खात्री बाळगा.”  

यानंतर गोल्डी दिलीप कुमार यांना भेटला आणि त्यांना त्याने आपली कथानक ऐकवले. दिलीप कुमारने गोल्डीला विचारले,” देव आनंद माझ्यासोबत काम करायला तयार आहे का?” त्यावर गोल्डीचे उत्तर होते,” नक्की तो काम करेल!”  त्यावर दिलीप कुमारचे म्हणणे होते,” तसं असेल तर मी देखील तयार आहे!”  राज कपूर यांचा प्रश्न नव्हता. गोल्डीला त्यांच्याबद्दल पूर्ण खात्री होती. राजकपूर एक परिपूर्ण व्यावसायिक कलावंत होता तो या चित्रपटासाठी तयार झाला.

==============

हे देखील वाचा : Sai Paranjpye यांच्या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी कलात्मक गाणे गायले!

==============

चित्रपटाची कथा मुंबईतील गॅंगवॉरची  होती. यात दिलीप कुमार आणि देव आनंद हे दोन वेगवेगळ्या एरियातील गुंड दाखवले जाणार होते. दिलीप कुमारची भूमिका मराठी दादा ची होती. यात त्याचा पेहराव धोतर कोल्हापुरी चप्पल, टोपी  असा असणार होता. तर देव आनंद चे कॅरेक्टर नेहमीच्या स्टाईलचे होते.शहरी गुंडगिरी करणाऱ्या दादा चे  होते.  दोघांची आपापल्या एरियामध्ये प्रचंड दादागिरी असते. दोघांची स्वतःची गॅंग असते. त्यांच्यात आपापसात कायम कुरबुरी, मारामाऱ्या चालू असायच्या.  कहानी मध्ये ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा दिलीप कुमारची बहिण देव आनंद च्या प्रेमात पडते. दिलीप कुमारला अर्थातच हे आवडत नाही.तो नंतर दिलीप कुमारची बहिण किडनॅप होते. देव आनंदला वाटते दिलीप कुमारने मुद्दाम त्याच्या बहिणीला किडनॅप केले आहे तर दिलीप कुमारचा संशय देव आनंद वर असतो.

यातून संघर्ष टोकाला भिडतो. दोघे समोरासमोर संघर्षासाठी येतात. इथे राज कपूरच्या कॅरेक्टर ची  एन्ट्री होते. तो एक हसमुख दिलदार व्यक्ती असतो. तो या दोघांना सांगतो ,”तुम्ही दोघे मूर्ख आहात .तुम्ही एकाच व्यक्तीवर प्रेम करत आहात. एक जण आपल्या बहिणीवर प्रेम करतो आहे. तर दुसरा आपल्या प्रेयसीवर. आणि विनाकारण तुम्ही दोघे एकमेकांवर संशय घेत आहात. तिला  तिसऱ्याच एका व्यक्तीने किडनॅप केले आहे. तुम्ही एकत्र या आणि त्या तिसऱ्या व्यक्तीच्या विरुध्द  लढायला तयार राहा!”  तिसरी व्यक्ती अर्थातच कोणी नसते. या दोघांना एकत्र आणणे हा राजकपूरचा हेतू असतो. कथानक चांगले होते.

================================

हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.

=================================

या सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन जेव्हा गोल्डी दिलीप कुमार कडे गेला आणि  दिलीपकुमार स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा दिलीप  विजय आनंदला म्हणाला,”माझ्याकडे पण एक स्टोरी आहे ती ऐक.” गोल्डीने त्यांची कथा ऐकली.त्यात दिलीप ने स्वत:वर अधिक फोकस असलेली स्टोरी ऐकवली.  दिलीप कुमार म्हणाला ,”आपण आधी या वर चित्रपट बनवूया.” तेव्हा गोल्डी म्हणाला ,” ठीक आहे. बघूत. पण तुम्ही देखील माझ्या स्टोरी चा  विचार करा.” दुसऱ्या दिवशी मुशीर रियाज यांना भेटून गोल्डीन सगितले,” आपण सिनेमाची आयडिया ड्रॉप करूया. कारण दिलीप कुमार स्वतःची स्टोरी पुढे करत आहे. आणि माल वाटत नाही ते या सिनेमात मला कोऑपरेट करतील !” अशाप्रकारे गोल्डी चा या तिघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न फसला!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Dev Anand Dilip kumar Entertainment Raj Kapoor
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.