Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास
Deva : शाहिद कपूरचा आणि अमिताभ बच्चनचा
एक नाव अनेक चित्रपट हे एक फिल्मी कोडे आहे. कोड्यात अमूकतमूक चित्रपटाचा नायक असं म्हटल्यावर त्याच नावाचा आणखीन एकाच्या (कदाचित अधिकही) नावाच्या नायक वा नायिकेचे चित्रपट पडद्यावर येवून गेले असतील तर “कोड्यात ” पडायला होईल… (Deva)
‘देवा‘ (Deva) नावाचा शाहिद कपूरचा ॲक्शनपॅक्ड मसालेदार मनोरंजक चित्रपट आपल्यासमोर येण्यास सज्ज झालाय याची आपणास कल्पना आहेच. Rosshan Andrrews दिग्दर्शित या ढिश्यूम ढिश्यूम मारधाड चित्रपटात पूजा हेगडे, पावेल गुलाटी नायिका आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियात पहायला मिळताच मला अमिताभ बच्चनची भूमिका असलेला “देवा” आठवला. (Bollywood masala)
अमिताभचे निस्सीम भक्त वगळता अन्य चित्रपट रसिकांना या “देवा” (Deva) ची कदाचित कल्पना नसावी. चित्रपटसृष्टीच्या फ्लॅशबॅकमध्ये डोकावल्यावर अशा बर्याच रंजक व एक्स्युझिव्हज गोष्टी माहित पडतील. विशेष उल्लेखनीय गोष्ट, अमिताभच्या ‘देवा’चे निर्माता व दिग्दर्शक सुभाष घई होते आणि ते तर शोमॅन म्हणून ओळखले जाणारे. आपल्या या लौकिकास साजेसा असा आपल्या चित्रपटाची ग्लॅमरस व बहुचर्चित मुहूर्त त्यांनी केल्यास आश्चर्य ते काय हो? २४ जानेवारी १९८७ ची ही गोष्ट. हा दिवस म्हणजे त्यांचा वाढदिवस.
मला आठवतय, “देवा” (Deva) च्या मुहूर्ताचे अतिशय देखणे आणि महागडे असे आमंत्रण माझ्या हाती येताच दोन गोष्टींनी माझे लक्ष वेधून घेतले. एक म्हणजे, subhash ghai च्या दिग्दर्शनातील चित्रपटात प्रथमच Amitabh Bachchan नायक आणि दुसरी गोष्ट, आमंत्रणावर अतिशय ठळक अक्षरात होते, ड्रेस कोड सूट.
अंधेरी पूर्वेकडील एका पंचतारांकित हॉटेलमधील प्रशस्त हाॅलमध्ये हा मुहूर्त आणि काॅकटेल पार्टी असली तरी त्याच स्पाॅटवरील तोपर्यंतच्या (आणि अगदी त्यानंतरच्याही) ओल्या असो वा सुक्या पार्टीत असो, अशी ‘सुटाबुटात या’ विनंती (की अट?) कधीच नव्हती. तेव्हा गिरगावातील चाळीत राहणाऱ्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाकडे सूट तो कसा असणार? सणासुदीला बूटाला पाॅलीश करुन घेणारा मी.. तसेच केले आणि अर्थातच लोकल ट्रेनने अंधेरीत पोहचलो. (Untold stories)
सुभाष घई व अमिताभ बच्चन अशी दिग्दर्शक व अभिनेता जोडी पहिल्यांदाच एकत्र याचे सकारात्मक ग्लॅमरस सावट पार्टीत पाऊल टाकताच जाणवले. अनेक बडे निर्माता, दिग्दर्शक व कलाकार पार्टीत असणे यात आश्चर्य नव्हते. सिनेपत्रकारीतेत असल्यानेच मला असे अनेक लाभ झालेत. मुहूर्त दृश्यातील अमिताभचे दाढीधारी पठाण रुपडे वेगळेच होते. त्याच्या उंचीने त्यात रुबाब आला होते. ते कुतूहल निर्माण करणारे होते.
=============
हे देखील वाचा : sequel movie : २०२५ : मराठी, हिंदीत सिक्वेल फार
=============
सुभाष घईच्या प्रत्येक चित्रपटाला मिडियात भरपूर कव्हरेज हे समीकरण घट्ट होते.. एखाद्या निर्मात्याच्या चित्रपटाला प्रदर्शित व्हायच्या वेळेस जेवढे कव्हरेज मिळत नाही, त्यापेक्षाही जास्त कव्हरेज ‘देवा’ला मिळत होते. सगळीकडेच या “देवा” (Deva) चित्रपटाची हवा म्हणूनच की काय निर्माता पहलाज निहलानी यांनी शत्रुघ्न सिन्हाला मध्यवर्ती भूमिका देत गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत “देवा ओ देवा” या चित्रपटाचा मुहूर्त केला.
योगायोग कसा असतो बघा, शत्रुघ्न सिन्हाच्या ‘देवा ओ देवा’चा मुहूर्त होत असतानाच त्याच फिल्मीस्थान स्टुडिओत एका फ्लोअरवर ‘देवा’ चित्रपटाचे पहिले चित्रीकरण सत्र सुरु होते आणि सेटबाहेर ठळक अक्षरात फलक होता, पत्रकार व पाहुणे यांना या चित्रपटाच्या सेटवर प्रवेश नाही. यामुळे तर “देवा” (Deva) च्या निर्मितीतील उत्सुकता आणखीन वाढली.
आणखीन एक दिवशी अचानक कुजबुज ऐकू येवू लागली, ‘देवा’चे पहिले चित्रीकरण सत्र हेच शेवटचे चित्रीकरण सत्र ठरलयं. पण का? असे काही घडले की उलटसुलट बातम्या, किस्से, कथा, दंतकथा पसरणे यात आश्चर्य ते काय? कोणी म्हणाले, अमिताभ बच्चनची ढवळाढवळ सुभाष घईला अजिबात आवडत नव्हती. त्यातून संघर्ष होवू लागला. अमिताभच्या सूचनांना सुभाष घई हस्तक्षेप समजला असेल तर त्याला कोण काय करणार? ‘देवा’ (Deva) चित्रपट एक दीड रिळांच्या शूटिंगनंतर बंद झाला हेच सत्य. काही वर्षांनंतर सुभाष घईच्या मुक्ता आर्ट्सच्या चित्रपटाची माहिती देणारी एक फोटो पुस्तिका प्रकाशित करण्यात आली त्यात याच ‘देवा’च्या सेटवरचा सुभाष घई व अमिताभ यांच्यातील संवादाचा एक फोटो पहायला मिळला. या ‘देवा’चे अस्तित्व एवढेच राहिले. (Bollywood tadka)
शाहिद कपूर (Shahid kapoor) चा ‘देवा’ (Deva) येत असतानाच अमिताभचा ‘देवा’ आठवायलाच हवा… सुभाष घईच्या दिग्दर्शनातील चित्रपटात अमिताभ बच्चन हा योग कधीच आला नाही त्याचे हो काय? असे अनेक चित्रपट निर्मितीच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर बंद पडतात (कायमचेच डब्यात जातात) पण सगळेच चित्रपट अमिताभचे ‘देवा’सारखे बंद पडूनही गाजणारे नसतात. अमिताभचे रुद्र, शिनाख्त, औकात असे जवळपास पंचेचाळीस पन्नास चित्रपट बंद पडलेत. त्यात हा ‘देवा’ वेगळाच.