
Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?
मराठीत आजवर बरेच राजकीय चित्रपट आले पण राजकीय चित्रपटासोबतच बायोपिक असणारा ‘धर्मवीर’ चित्रपट विशेष लक्षवेधी ठरला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रवीण तरडे यांनी आणि आपल्या अभिनयाने त्याला चार चांद लावले होते प्रसाद ओक यांनी. महत्वाचं म्हणजे ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) ज्यांच्या कॅमेरा लेंन्समधून आपल्यापर्यंत आला ते म्हणजे महेश लिमये (Mahesh Limaye). ‘धर्मवीर २’ हा चित्रपट कथा, कलाकारांची अॅक्टिंग आणि बेस्ट दिग्दर्शनामुळे लक्षात राहिलाच पण यातील प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली. अशाच या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्रेमची एक भन्नाट आठवण आज तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात कॅमेऱ्याचे जादूगर महेश लिमये आणि त्या फ्रेमचं कनेक्शन आहे तरी काय?

तर, मुळातच आर्टिस्ट असणाऱ्या लिमयेंची कॅमेऱ्यासोबत कॅनवासवरही मजबूत पकड आहेच. त्यांनी १९८८ मध्ये स्वामी समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पेंटींग काढलं होतं. आणि ते पेंटींग लिमयेंच्या बायकोच्या मामांनी पाहिलं होतं. मामा आनंद दिघेंसोबत बरीच वर्ष काम करत असल्यामुळे त्यांनी लिमयेंना ते पेंटींग आनंद दिघेंना (Anand Dighe) तु भेट म्हणून दे असं सांगितलं. आता शिवराय म्हणजे दिघे साहेबांचं आराध्य दैवतच. त्यामुळे मामांचं ऐकून लिमयेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पेंटींगची एक गोल़्डन बोर्डरची खास फ्रेम तयार करुन ठेवली आणि एके दिवशी दिघे साहेबांना भेटायला जाण्याचा योग आला. टेंभीनाक्यावर मामांसोबत लिमये दिघे साहेबांना ती फ्रेम द्यायला गेले. नेहमीप्रमाणे लोकांचा गराडा त्यांच्याभोवती उभा होता. पण त्यातही लिमये आणि मामांना त्यांनी जवळ बोलावलं. (Marathi Movies)

महेश लिमयेंनी दिघे साहेबांना ती फ्रेम हातात दिली. पायातील चपला काढून त्यांनी शिवरायांच्या त्या फ्रेमला वंदन केलं आणि आनंदाश्रमात ती फ्रेम लावायला दिली. आणि विशेष म्हणजे आज जेव्हा आपण ‘धर्मवीर २’ (Dharmaveer 2) चित्रपट जेव्हा पाहतो आणि त्यात आनंद दिघे जेव्हा आनंदाश्रमात बसलेले असतात त्यावेळी त्यांच्या मागे दिसणारी ती छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम ही लिमयेंनी त्यांना भेट दिलेलीच फ्रेम आहे. यावरुन एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की बायोपिक असो किंवा कोणत्याही genere चा चित्रपट असो डिरेक्टर्स, आर्ट डिरेक्टर्स, DOP’s यांच्या तगड्या मेहनतीनेच चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सजवली जात असते आणि त्या प्रत्येक scences ची एक स्वतंत्र आणि इंटरेस्टिंग कथा किंवा आठवण असते. (Bollywood Movies)
================================
हे देखील वाचा : Hollywood मधून मराठीत रिमेक झालेले ‘हे’ चित्रपट माहिती आहेत का?
================================
दरम्यान, महेश लिमयेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ५०० पेक्षा अधिक जाहिरातींसाठी त्यांनी काम केलं आहे. ऐश्वर्या राय, जॉन अब्राहम अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी जाहिराती शुट केल्या आहेत. तसेच, ‘उत्तरायण’, ‘फॅशन’, ‘हिरामंडी’, ‘हिरोईन’, ‘ट्राफिक सिग्नल’ (Mahesh Limaye Movies) अशा अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि वेब सीरीजची सिनेमॅटॉग्राफी महेश लिमये यांनीच केली आहे. आणि आता लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाच्या सिनेमॅटॉग्राफीचीही जबाबदारी त्यांच्याच हातात आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi