
Dhurandhar: पाकिस्तानात ‘धुरंधर’चा राडा; बंदीमुळे पायरेटेड कॉपी डाऊनलोड करण्याचा वाढला ट्रेंड
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ने इतिहास रचला आहे… ५ डिसेंबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे… पाकिस्तानातील भारतीय गुप्तहेरांची सत्य कथा मांडणारा हा चित्रपट पाकिस्तानसह बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएईमध्ये बॅन करण्यात आला… पण तुम्हाला माहित आहे का ‘धुरंधर’ पाकिस्तानमध्ये बॅन असूनही सर्वात जास्त पाहिला जाणारा चित्रपट ठरला आहे… (Dhurandhar in Pakistan)
मिळालेल्या माहितीनुसार, ‘धुरंधर’च्या टॉरेंट आणि पायरसी लिंक्सचा इंटरनेटवर पूर आला आहे. यावरूनच चित्रपट डाउनलोड करून पाकिस्तानमधील लोकं पाहत आहेत. पाकिस्तानचे डार्क वेब एक्सपर्ट्स श्रीलंका, नेपाळ आणि मलेशियामधील सर्व्हरद्वारे चित्रपटाच्या लिंक्स मिळवत आहेत आणि तयारही करत आहेत. इतकंच नाही तर, ‘धुरंधर’ चिनी होस्टिंग वेबसाइट्स व इतर विविध प्लॅटफॉर्मवर कमी रिझोल्यूशनच्या ‘कॅम-प्रिंट’ स्वरूपात उपलब्ध आहे.. (Entertainment News)

न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, आयएसआय आणि आयएसपीआरशी कथितपणे लिंक्ड असल्याचा आरोप असलेल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून धुरंधर चित्रपटाच्या लहान-लहान क्लिप्स वापरल्या जात आहेत. ते या क्लिप्स शेअर करून भारतीय चित्रपटांची खिल्ली उडवत आहेत. तर, दुसरीकडे, देशात बंदी असूनही पाकिस्तानमधील लोक डार्क वेबवरून धुरंधर डाउनलोड करतायत आणि टिकटॉक, इन्स्टाग्रामवर पाकिस्तानी लोकं मोठ्या प्रमाणात रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहेत. (Pakistan And Dhurandhar)
================================
================================
आता एक नजर धुरंधर चित्रपटाच्या कमाईवर टाकूयात… आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने केवळ १५ दिवसांत ५०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली आहे… विशेष म्हणजे रणवीर सिंगचा (Ranveer Singh) हा पहिला चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आणि आणि अक्षय खन्नाचा हा ‘छावा’नंतर दुसरा चित्रपट आहे ज्याने इतकी मोठी मजल २०२५ मध्येच मारली आहे… (Akshaye Khanna Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi