Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’

सनी देओलऐवजी विरारच्या छोकऱ्याला मिळाली होती Gadar : Ek Prem

Ajay Devgan ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत!

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला;

अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये पेटला वाद

 “तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये पेटला वाद
टीव्ही वाले मिक्स मसाला

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये पेटला वाद

by रसिका शिंदे-पॉल 13/02/2026

मराठी बिग बॉसचं सहावं सीझन सध्या तुफान गाजतंय. पण खरी रंगत तर राखी सावंत हिने घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतर आली आहे. घरात येताच तिने रुचिता जामदार आणि तन्वी कोलते यांना टार्गेट केलं. आणि आता कॅप्टन सागर कारंडे आणि तिच्यात जोरदार भांडण झालं असून तिने घरातील काही सामानांची मोडतोड करत बिग बॉसच्या घरातील नियमांचं उल्लंघन केलं आहे. नेमकी काय घडलं आहे जाणून घेऊयात… (Marathi Big Boss Season 6)

घरातील साफसफाईवरुन राखी सावंत आणि सागर कारंडे यांच्यात वाद झाला आहे. सोशल मिडियावर प्रोमो रिलीज केला असून यात दिसतं की, बाथरूममध्ये जमा झालेली घाण राखी सागरला दाखवते आणि हे स्वच्छ करा असंही सांगते. पण सागर साफसफाई करण्यास तिला नकार देतो. तो कॅप्टन असल्यामुळे खरं तर राखी त्याला सांगते पण त्यावरुन नवा ड्रामा तयार होतो. (Rakhi Sawant)

सागर राखीला म्हणतो की, “तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये. मी साफ करणार नाही” यानंतर राखी त्य़ाच्यावर भडकून म्हणते, “हे तुम्हाला करावं लागेल…आम्ही पण जेवण बनवतो ना..ते खाता ना तुम्ही? मग नाटकं का करताय?” असं बोलून राखी वॉशरूम एरियाच्या बाहेर येते आणि रागात किचनमध्ये येऊन काचेची वस्तू फोडते. ‘बिग बॉस’च्या घरातील कोणतीही वस्तू फोडणं हा महत्वाचा नियमभंग आहे. त्यामुळे राखीने प्रॉपर्टी फोडल्यावर आता घरात हायवॉल्टेज ड्रामा होणार हे फिक्स आहे. (Sagar Karande)

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6च्या घरात करण-प्राजक्ताचा सुरु आहे रोमान्स; ‘तो’ खास क्षण झाला कॅमेरात कैद !

================================

दरम्यान, जरा फिका पडत चाललेला हा सहावा सीझन राखी सावंतने आपल्या येण्याने चांगलाच रंगवला आहे. नेटकरी देखील राखीच्या खेळाचं कौतुक सोशल मिडियावर करत आहेत. “राखीने गेम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय…जे कॅमेऱ्यासमोर येत नव्हते ते सुद्धा शोमध्ये दिसू लागलेत”, “राखीमुळे बिग बॉस पाहायला मजा येतेय”, “राखी बोलते सबको कोलते”, “वाह एक नंबर आता खरी मजा येणार शो पाहायला”, “राखी आली तेव्हापासून शो वेगळ्याच लेव्हलला गेलाय”, “राखीने वाट लावलीये सर्वांची” अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत. (Marathi Trending News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Big Boss Marathi big boss marathi season 6 drama queen rakhi sawant Entertainment News Rakhi Sawant ruchita jamdar Sagar karande tanvi kolte
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.