Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Gashmeer Mahajani ‘माऊथ पब्लिसिसिटीमुळे फुलवंती तरला’ गश्मीर महाजनीने केले रोखठोक भाष्य
मराठी इंडस्ट्रीमधील चॉकलेट बॉय आणि हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani). गश्मीर नेहमीच विविध कारणांमुळे मीडियामध्ये प्रकाशझोतात येत असतो. मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्री गाजवणाऱ्या गश्मीरने आपल्या अभिनयाने आणि आपल्या लुक्सने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. हिंदी इंडस्ट्री गाजवताना गश्मीरने मराठीमध्ये देखील आपले काम चालू ठेवले आहे. सध्या गश्मीर त्याच्या आगामी एक राधा आणि एक मीरा या सिनेमासाठी खूपच चर्चेत आहे. या सिनेमात तो मृण्मयी देशपांडेसोबत काम करताना दिसणार आहे. (Gashmeer Mahajani)
गश्मीर चर्चेत येण्याचे अजून एक मोठे कारण म्हणजे त्याचा फुलवंती (Phullwanti) सिनेमा. मागच्यावर्षी गश्मीर प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमात झळकला होता. हा सिनेमा आणि यातील त्याची भूमिका कमालीची गाजली. गश्मीरने या सिनेमात महापंडित शास्त्री ही भूमिका साकारली होती, तर प्राजक्ता माळीने फुलवंतीची भूमिका निभावली होती. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचे लेखन केले होते, तर दिग्दर्शन त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहल तरडेने केले होते.

दमदार कथा, प्रतिभावान कलाकार, उत्तम संगीत, कमालीचे दिग्दर्शन अशा सर्वच महत्वाच्या बाबी जुळून आल्या आणि फुलवंती सिनेमा तयार झाला. या सिनेमाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. मात्र तरीही गश्मीरने त्याला फुलवंती सिनेमाच्या बाबतीत काही चुका वाटल्या त्यामुळे हा सिनेमा अधिकची कमाई करू शकला नाही. असे मत त्याने नुकतेच मांडले आहे. (Latest Marathi Movies)
गश्मीरने सांगितले की, “फुलवंती सिनेमा एका विशिष्ट प्रेक्षकांसाठीच बनला होता. त्या प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे तो यशस्वी झाला. सिनेमाचा आर्थिक बाजूने विचार केला तर या चित्रपटाचे एकूण बजेट हे जवळपास ४.२५ कोटींच्या आसपास होते. पोस्ट-प्रोडक्शन आणि प्रमोशनसाठी देखील मोठा खर्च केला गेला. तरी सुद्धा या चित्रपटाने ७ कोटींचीच कमाई केली, जेव्हा सिनेमा जास्त कमाई करू शकला असता. (Entertainment mix masala)

जर या फुलवंती सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख योग्य असती, तर ही कमाई नक्कीच ८ कोटींच्या घरात पोहोचली असती. माझ्या मते फुलवंतीच्या प्रदर्शनाची तारीख चुकीची होती. नवमीच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण हा दिवस सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात जाण्यासाठी योग्य नव्हता. त्यामुळे पहिल्या वीकेंडला फुलवंतीला अपेक्षित प्रतिसाद मिळालाच नाही. जर प्रदर्शनाची तारीख दुसऱ्या दिवशीची असती, तर हा चित्रपट अजून यशस्वी झाला असता. पण तरी तो माऊथ पब्लिसिटीमुळे चालला.” (Gashmeer Mahajani On Phullwanti)
पुढे गश्मीर सिनेमाच्या ट्रेलरबद्दल आणि प्राजक्तावर होणाऱ्या चिडचिडीबद्दल म्हणाला, “फुलवंती सिनेमा अॅमेझॉनवर देखील खूपच चालला. ट्रेलर लोकांना खूप आवडला होता. मात्र इथे देखील चूक झाली. ११ ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित होणार होता. त्याच्या केवळ ७ दिवस आधी म्हणजे ४ ऑक्टोबरला ट्रेलर आला. जिथे हा ट्रेलर किमान १५ दिवस आधी येणे अपेक्षित होते.
======
हे देखील वाचा : Abhishek Bachchan अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर चमकले अभिषेक बच्चनचे नशीब, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक
Pranit More कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहारियावर विनोद करणे पडले महागात
======
“प्रसिद्धीच्या दृष्टीने देखील सिनेमा खूप गंडलेला होता. सिनेमाची प्रसिद्धी जशी व्हायला हवी होती तशी झाली. केवळ ६५ टक्के इतकीच प्रसिद्धी झाली. ३५ टक्के प्रसिद्धी कमी पडली. अनेक गोष्टी उशिरा झाल्या. प्राजक्ताची पहिली निर्मिती त्यात तीच फुलवंती त्यामुळे तिच्यावर खूप दडपण होते. प्राजक्ताची फक्त एक चूक आहे ती म्हणजे तिला वेळेचे अजिबात भान नाही. माझी प्रमोशनच्या वेळी अनेकदा तिच्यावर चिडचिड व्हायची. ती प्रत्येक ठिकाणी उशीरा यायची. प्रसिद्धीसाठी प्रोडक्शनची गाडी असते. त्यामुळे उशीर झाला तर त्यांचा खर्च वाढतो. पण पुढे माझ्या चिडचिडीमुळे तिचे उशिरा येणे कमी झाले होते.”