
Shah Rukh Khan : डायलॉगमध्ये छोटीशी चूक आणि सेटवर किंग खानने मागितली सगळ्यांची माफी!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) किती ताकदीचा अॅक्टर आहे आपण जाणतोच… शिवाय, २०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने किंग खानचं ठरलं… ३० वर्षांच्या फिल्मी कारकिर्दितला पहिला राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला… इतकंच नाही तर मेट गालामध्येही (Met Gala) त्याने डेब्यु केला… दिल्लीच्या या मुलाने हळूहळू आपल्या टेलेंटने बॉलिवूड काबीज केलं त्यामुळे माज असणारच ना भाई… त्यामुळे जर का तुम्हाला सांगितलं की शाहरुख खान कोणाची माफी मागू शकतो तर तुम्हाला खरं वाटले का? पण हो असं घडलं आहे… २०२५ मध्ये नॅशनल क्रश हा टॅग मिळवणाऱ्या गिरीजा ओक (Girija Oak) हिने ‘जवान’ चित्रपटातील एका खास किस्सा नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला… ‘जवान’च्या शुटींगवेळी नेमकी शाहरुखकडून काय चूक झाली होती? जाणून घेऊयात…

२०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘जवान’ (Jawan Movie) चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसला.. त्याच्यासोबत या चित्रपटात ८ अभिनेत्रीही दिसल्या आणि त्यात होती मराठमोळी गिरीजा ओक... बऱ्याच मुलाखतीत गिरीजाने शाहरुखसोबत काम करताना अनुभव शेअर केला होता.. नुकताच ‘जवान’च्या शूटिंगदरम्यान चेन्नईत घडलेला एक अनुभव सांगताना गिरिजा अक्षरशः भावुक झाली. (Bollywood News)
तर, झालं असं की, ‘जवान’ चित्रपटाच्या एका सीनमध्ये शाहरुखकडून डायलॉग बोलताना थोडीशी चूक झाली होती. त्यामुळे सीन पुन्हा घ्यावा लागणार होता. आधीच चेन्नईतील थंडी असल्यामुळे वेळेत शुटींग पूर्ण करण्याच्या तयारीत टीम होती… पण काही केल्या शाहरुख एक डायलॉग बोलताना चुकत होता… वेळ वाया जातोय हे किंग खानच्या लक्षात आलं… आणि इतका मोठा सुपरस्टार असतानाही शाहरुखने सेटवरील प्रत्येकाकडे पाहून ज्युनियर आर्टिस्टपासून ते अगदी टेक्निशियनपर्यंत सगळ्यांची मनापासून माफी मागितली. शाहरुख म्हणाला की, “माझ्यामुळे तुम्हाला आणखी एक टेक करावा लागतोय… I’m really sorry,” असे शब्द त्याने सगळ्यांना सांगितले. त्याचे ते शब्द ऐकून सगळेच थक्क झाले होते… (Shah Rukh Khan)

‘जवान’ चित्रपटात शाहरुख डबल रोलमध्ये दिसला होता, एका रोलमध्ये त्याच्या डोक्यावर केसच नव्हते आणि एकात त्याला विग लावावा लागला होता.. विगमुळे त्याला गरम होऊ नये यासाठी सेटवरचं तापमान मुद्दाम कमी ठेवलं जायचं. यामुळे सहकलाकारांना जबरदस्त थंडी वाजायची. अशा परिस्थितीतही, शाहरुख प्रत्येकाच्या अडचणींबद्दल संवेदनशील होता. “आपण कोणाबरोबर काम करतोय, याची त्यांना कायम जाणीव असते,” असं गिरिजा शाहरुखबद्दल बोलताना म्हणाली होती.. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : एका गैरसमजामुळे भांडण; Shah Rukh Khan आणि Sunny Deol मध्ये ३० वर्ष होता अबोला!
================================
बरं, शाहरुखच्या Kindness अनुभव इंडस्ट्रीतल्या ऑलमोस्ट सगळ्याच कलाकारांना आला आहे… त्याच्या घरी पार्टी असेल किंवा त्याला कुणी भेटायला जरी ’मन्नत’वर गेलं असेल तरी त्यांना तो कारपर्यंत सोडायला जातो हे बऱ्याच कलाकारांनी सांगितलं आहे… सेम किस्सा ‘जवान’ चित्रपटाचा director Atlee च्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेलिब्रेशनच्या दिवशीही घडला होता, यावेळी शाहरुख सगळ्यांची काळजी घेताना दिसला.. चेन्नईत उशिरा रात्री बर्थडे सेलिब्रेशन झाल्यामुळे सर्व महिला कलाकार सुरक्षित पोहोचाव्यात म्हणून त्याने स्वतःच्या सुरक्षा ताफ्यातील गाडी त्यांच्या मागे पाठवली होती. त्यामुळे गिरीजाने सांगितलेल्या शाहरुखबद्दलच्या पर्सनल अनुभवामुळे शाहरुख खान सुपरस्टार का आहे? याचं उत्तर मिळतं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi