Varanasi : एस.एस. राजामौलींच्या आगामी चित्रपटाचं टायटल कन्फर्म! ३००० कोटी

Varanasi : एस.एस. राजामौलींच्या आगामी चित्रपटाचं टायटल कन्फर्म! ३००० कोटी पार करणारा पहिला चित्रपट ठरणार?
बऱ्याच दिवसांपासून एस.एस राजामौलींच्या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती… Globetortter हा हॅशटॅगही व्हायरल झाल्यामुळे नेमकी त्यांच्या आगामी चित्रपटाचं हे नाव आहे की अजून काही हे गुलदसत्यात होतं.. अखेर राजामौलींच्या आगामी बिग बजेट चित्रपटाचं नाव समोर आलं असून ते वाराणसी (Varanasi) असं आहे… या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) आणि प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) प्रमुख भूमिकेत दिसणार असून कुंभाच्या भूमिकेत पृथ्वीराज सुकुमारन असणार आहे…

दरम्यान, राजामौली म्हटलं की सगळं काही ग्रॅड असतंच आणि आपण ते आरआरआर किंवा बाहूबली फ्रेंचायझीतून पाहिलं व अनुभवलं आहेच… त्यामुळे आता वाराणसी या चित्रपटात राजामौली स्टाईलने आणखी एक बव्य धमाका प्रेक्षकांना पाहता येणार आहे यात शंकाच नाही… शिवाय, वाराणसी हा भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला १००० कोटी बजेट असणारा चित्रपट असून बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट ३००० कोटी कमावणारा पहिला चित्रपट असेल अशी शक्यता नाकारता येत नाही… (South Indian Films)

राजामौलींच्या आधीच्या काही चित्रपटांच्या बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या ‘इगा’ या चित्रपटाचं बजेट २६-४० कोटी होतं आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन ११० कोटींच्या पुढे झालं होतं… याव्यतिरिक्त २००९ मध्ये आलेल्या ‘मगधीरा’ चित्रपटाचं बजेट होतं ३५-४४ कोटी आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं १०० कोटींच्या पुढे, ‘बाहुबली १’ चं बजेट होतं जवळपास १८० कोटी आणि केलेक्शन होतं ६५० कोटी, ‘बाहुबली २’ चं बजेट १५० कोटी आणि कलेक्शन १४३० कोटी, ‘आरआरआर’ बजेट जवळपास ५५० कोटी आणि कलेक्शन जवळपास १२०० कोटींच्या पुढे होतं… त्यामुळे एकंदरीच राजामौंलीच्या प्रत्येक चित्रपटाने बजेटच्या दुप्पट-तिप्पट बॉक्स ऑफिस कलेक्शन आजवर केलं आहे… आणि आता ‘वाराणसी’चं बजेट १००० कोटी आहे म्हणजे कलेक्शन ३००० कोटींपर्यंत जाईल असा अंदाज बांधला जात आहे… (SS Rajamouli Movies)
================================
हे देखील वाचा : SSMB29 : राजामौलींच्या १००० कोटींचं बजेट चित्रपटाचा’बाहुबली’पेक्षाही भव्यसेट!
================================
आता जरा वळूयात SSMB29 याकडे… खरं तर जेव्हा SSMB29 ट्रेण्ड करत होतं, तेव्हा हेच राजामौंलींच्या चित्रपटाचं नाव आहे असं सगळ्यांना वाटलं होतं… पण याचा खरा अर्थ हा एस.एस राजामौली आणि महेश बाबू असा असून २९ च्या अर्थ म्हणजे महेश बाबूचा हिरो म्हणून हा २९वा चित्रपट आहे… बिग बजेट चित्रपटासोबतच राजामौलींनी वाराणसी चित्रपटासाठी हैदराबादमध्ये आरआरआर आणि बाहुबलीपेक्षाही भव्य सेट उभारत तिथेच वाराणसी उभी केली आहे… तसेच, प्रियांका चोप्रा हिने हॉलिवूडनंतर भारतात पुनरागमन करण्याचा निर्णय घेत बॉलिवूड नाही तर साऊथ फिल्म्सची निवड केली… २०१९ मध्ये आलेल्या ‘स्काय इज पिंक’ नंतर ६ वर्षांनी देसी गर्लने कमबॅक केला आ्हे… या चित्रपटात वाराणसी आणि काशीचं दर्शन प्रेक्षकांना होणार असून यात मार्वल युनिवर्समधील थॉर अर्थात हॉलिवूड अभिनेता Chris Hemsworth कॅमिओ करणार असं म्हटलं जात आहे… त्यामुळे वर्ल्डवाईड रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचं शुटींग अजूनही सुरु असून २०२७ मध्ये कदाचित रिलीज होण्याची शक्यता आहे… पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते एस.एस.राजामौलीचा वाराणसी चित्रपटाचा अविष्कार पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत…. (Globetortter)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi