Mukkam Post Devach Ghar: ५ भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला

Gulkand : हिंदी चित्रपटांना ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाची टक्कर!
हिंदी चित्रपटसृष्टीपाठोपाठ आता मराठी चित्रपटसृष्टीलाही सुगीचे दिवस पुन्हा एकदा आल्याचं दिसून येत आहे. १ मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाला ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ या दोन चित्रपटांनी टक्कर दिली होती. दरम्यान, प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना प्रचंड प्रतिसाद दिल आहे. खरं तर यापूर्वी सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ (Zhapuk Zhupuk) चित्रपटालाही प्रेक्षक पसंती देतील अशी अपेक्षा होती पण ती जरा फेल झाली. मात्र, ‘गुलकंद’ (Gulkand) आणि ‘आता थांबायचं नाय’ (Aata Thambaych Naay) या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली जाणून घेऊयात…(Box office collection)

असं म्हणतात प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतं…प्रेमाची हटके अन् मजेशीर गोष्ट सांगणारा ‘गुलकंद’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘गुलकंद’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ५५ लाख, दुसऱ्या दिवशी २५ लाख तर तिसऱ्या दिवशी ४२ लाख, चौथ्या दिवशी ५७ लाखांची कमाई करत आत्तार्यंत एकूण १ कोटी ७९ लाखांची कमाई केली आहे. तर दुसरीकडे, त्याचदिवशी प्रदर्शित झालेल्या आता थांबायचं नाय या चित्रपटाने चार दिवसांत १ कोटी १६ लाखांचा गल्ला कमावला आहे. (Marathi movie gulkand)

‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, पर्ण पेठे, प्राजक्ता हनमघर, ओम भुतकर यांसारख्या कलाकारांची मांदियाळी होती. तर ‘गुलकंद’मध्ये सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट आहे.
======================================
हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!
=======================================
वर्षाच्या सुरुवातीलाच मराठीतील दोन चित्रपटांनी उत्कृष्ट कमाई करण्याची सुरुवात केलेली पाहून नक्कीच सुखद चित्र पुढे दिसेल असं म्हणावं लागेल. लवकरच मराठीत ऐतिहासकी, बायोपिक्स आणि सीक्वेल्स असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी रसिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. (Movie star cast)