Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘चौदहवी का चांद’च्या यशाने Guru Dutt आत्मविश्वासाने पुन्हा उभा राहिला!
प्रतिभावान आणि संवेदनशील निर्माता दिग्दर्शक गुरुदत्त यांनी ‘कागज के फूल’ हा अतिशय महत्त्वाकांक्षी सिनेमा १९५९ साली बनवला होता. चित्रपट अतिशय सुंदर आणि काळाच्या पुढचा होता. पण त्या काळातील प्रेक्षकांना तितकासा आवडला नाही आणि गुरुदत्त यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट अक्षरश: फ्लॉप झाला. चित्रपटाने आर्थिक नुकसान तर प्रचंड झालेच पण गुरुदत्त हा कलावंत म्हणून आतून कोसळला होता. अतिशय मेहनत त्यांनी या चित्रपटासाठी घेतली होती. यातील प्रत्येक शॉट घेण्यासाठी गुरूने आपली प्रतिभा पणास लावली होती. पण सर्व प्रयत्नांवर पाणी फिरले आणि गुरुदत्त यांचा हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला.

यामुळे गुरुदत्त प्रचंड डिप्रेशन मध्ये गेले. त्यांचे दारू पिण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. दिवसा भर मद्य आणि रात्री झोपेच्या गोळ्या यामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली. ‘कागज के फूल’ या चित्रपटाला आलेल्या अपयशामुळे आता कर्जदार देखील रोज दारासमोर येऊन उभे राहू लागले. गुरुदत्त यांनी तर यापुढे मी कुठल्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नाही असे ठरवून टाकले होते. पण कर्जाचा डोंगर हा दिवसेंदिवस वाढतच होता. असे म्हणतात गीता दत्त यांनी आपले काही दागिने देखील विकायची तयारी द
गुरुदत्त यांना कथानक आवडले. त्यांनी अब्रार अल्वी यांच्याकडून स्क्रीन प्ले आणि डायलॉग लिहून घेतले. चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासाठी जुन्या काळातील ख्यातनाम दिग्दर्शक एम सादिक यांना बोलावण्यात आले. गुरुदत्त, वहिदा रहमान, जॉनी वॉकर ,रहमान ही त्यांची नेहमीची टीम चित्रपटात काम करत होती. गुरुदत्त यावेळी मात्र संगीतकार म्हणून सचिन देव बर्मन यांच्या ऐवजी संगीतकार रवि आणि गीतकार म्हणून साहीर लुधियानवी यांच्या ऐवजी शकील बादायुनी होईल यांची नियुक्ती केली. चित्रपटाचे टायटल होते ‘चौदहवी का चांद’ हा चित्रपट अवघ्या एक वर्षात तयार झाला. चित्रपटाची गाणी जबरदस्त बनली होती. त्यावेळी कलर सिनेमाची सुरुवात झाल्यामुळे गुरुदत्त यांच्या लहरी स्वभावामुळे हा संपूर्ण चित्रपट पुन्हा कलर मध्ये बनवावा असे त्यांना वाटले परंतु त्याच्या मित्रांनी फक्त एक गाणे कलर मध्ये करा असे सांगितले. त्या पद्धतीने या चित्रपटाचे टायटल सॉंग त्यांनी कलर मध्ये केले.

चित्रपट तयार झाला पण एक नवीन संकट उभे राहिले. कारण त्यावेळी के. असिफ यांचा ‘मुगल –ए- आजम’ हा चित्रपट देखील तयार झाला होता आणि तो देखील प्रदर्शनाच्या मार्गावर होता. दोन्ही चित्रपट मुस्लिम पार्श्वभूमीवरचे होते. त्यामुळे गुरुदत्त ला थोडीशी भीती वाटत होती. कारण दोन्ही मुस्लीम थीम चित्रपट लोक पाहायला येतील का अशी त्याला शंका वाटली. के असिफ यांच्या मेगा बजेट ब्लॉकबस्टर ‘मुगल –ए- आजम’ च्या तुलनेत हा खूप छोट्या बजेटचा सिनेमा होता. पण जॉनी वॉकरने पुन्हा यात मध्यस्थी केली आणि सेंट्रल इंडियाचे राइट्स स्वतःकडे घेतले. जेव्हा जॉनी वॉकर स्वतः चित्रपटांचे डिस्ट्रीब्यूशन हातात घेतो असे कळाल्यानंतर अनेक डिस्ट्रीब्यूटर पुढे आले आणि चित्रपट चांगल्या रेटमध्ये विकला गेला.
‘मुगल –ए- आजम’ रिलीज होण्याच्या काही पंधरा दिवस आधी आधी १५ जुलै १९६० रोजी काही ठराविक शहरात सिनेमा प्रदर्शित झाला. आणि मग हळू हळू संपूर्ण भारतभर या सिनेमाचे खूप चांगले स्वागत झाले. मुस्लिम बेल्ट मध्ये तर हा चित्रपट तुफान यशस्वी झाला. लखनऊ आणि हैदराबाद इथे या चित्रपटाने तर गोल्डन जुबली यश मिळविले. गुरुदत्त यांना ‘कागज के फूल’ या चित्रपटामुळे झालेला सगळा आर्थिक तोटा या छोट्या बजेटच्या ‘चौदहवी का चांद’ ने भरून दिला. जॉनी वॉकर यांनी स्वतः सांगितले की सेंट्रल इंडियाच्या राइट्स मधून त्यांना इतका अमाप पैसा मिळाला की त्यांनी मुंबईच्या ओशीवारा एरियामध्ये प्लॉट घेऊन तिथे बंगला बांधला!
================
हे देखील वाचा : Javed Akhtar : अभिनेता धर्मेंद्रने जावेद अख्तरची का माफी मागितली होती ?
================
एकूणच ‘चौदहवी का चांद’ हा चित्रपट गुरुदत्त यांचे आर्थिक अपयश धुऊन काढण्यासाठी उपयुक्त तर ठरला शिवाय गुरूला आत्मविश्वासाने उभा करू शकला. यानंतर गुरुदत्त यांनी विमल दत्त यांच्या ‘साहिब बीवी और गुलाम’ या चित्रपटावर काम सुरू केले!