दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
हा अभिनेता ठोकणार बॉलिवूडला रामराम, म्हणतोय गावात जाऊन करणार शेती
स्टाईल या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून बॉलिवूड मध्ये पदार्पण केलेला शर्मन जोशी…यानंतर रंग दे बसंती, गोलमाल, ३ इडियट्स, फरारी की सवारी असे अनेक वजनदार चित्रपट त्याने साकारले. रंगभूमीवर मनापासून प्रेम करणारा अभिनेता शर्मन आता याच रंगभूमीला निरोप द्यायच्या विचारात आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे……
रंग दे बसंती,स्टाईल, गोलमाल, थ्री इडियटस, फेरारी की सवारी अशा अनेक चित्रपटात विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता शर्मन जोशी एक हरहुन्नरी अभिनेता आहे. गेल्या काही वर्षांत शर्मनचे अनेक सोलो सिनेमे प्रदर्शित झालेत. पण बॉक्स ॲाफिसवर त्याच्या या सोलो चित्रपटांनी निराशा केली. याच सगळ्यांचा परिणाम म्हणून त्याने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं ठरवलं आणि नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शर्मनने काही गोष्टींचा खुलासा केला…..
तुझ्या सोलो सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवतात, तेव्हा नेमके काय विचार मनात येतात? असा सवाल शर्मनला यावेळी केला गेला. यावर शर्मन जे काही बोलला ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तो म्हणाला, ‘माझा सिनेमा आपटला की, बॉलिवूड सोडून गावात परतण्याचा विचार माझ्या मनात येतो. गावात स्थायिक होऊन मस्तपैकी शेती करावी. कुटुंबासोबत शांत आयुष्य घालवावे आणि स्वत:च्या आतल्या कलाकाराला शांत करण्यासाठी कधी कधी नाटक करावे, असे मला वाटते. ‘मिशन मंगल’ हा सिनेमा येण्यापूर्वीच गावात स्थायिक होण्याच्या विचारात मी होतो. पण ‘मिशन मंगल’चालला आणि माझा प्लान मी पुढे ढकलला. पण आता ‘बबलू बॅचलर’ चालला नाही तर मी गावात जाऊन तिथेच स्थायिक होईल, असेही तो म्हणाला. मी गंमत करत नसून गंभीर आहे, असेही त्याने स्पष्ट केले.
असो …पण शर्मनच्या चाहत्यांचा हिरमोड होणार हे नक्की. शरमन सारख्या कलाकारांनी हार मानू नये असं जरी आपल्याला वाटत असलं तरी चित्रपटसृष्टी काही फारशी प्रेमळ आणि प्रत्येकालाच न्याय देणारी नाही.
शब्दांकन – शामल भंडारे