Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

हेमंत कुमार आणि Kishore Kumar यांचा एकत्रित सांगीतिक प्रवास..

बात पुरानी बडी सुहानी

हेमंत कुमार आणि Kishore Kumar यांचा एकत्रित सांगीतिक प्रवास..

by धनंजय कुलकर्णी 02/01/2026

संगीतकार जर स्वतः गायक असेल तर त्याला दुहेरी फायदा होत असतो गायक म्हणून तो इतर संगीतकारांकडे गाऊ   शकत असतो आणि इतर संगीतकारांच्या अनेक चांगल्या गोष्टी तो आपल्या संगीतात आणू शकत असतो.  किशोरकुमार आणि हेमंत कुमार हे दोघे ही संगीतकारा सोबतच स्वतः एक उत्तम पार्श्वगायक देखील होते.  हेमंत कुमार यांनी हिंदी सिनेमा सृष्टीत बंकिमचंद्र  यांच्या आनंदमठ  या कलाकृतीवरील चित्रपटापासून (१९५१) संगीतकार म्हणून काम सुरू केले.  याच काळात म्हणजे पन्नास च्या दशकाच्या आरंभी किशोर कुमार हे देखील चित्रपटसृष्टीत आले.  किशोर कुमार देखील स्वतः उत्तम गायक तर होतेच पण काही चित्रपटांना त्यांनी अतिशय सुंदर असं संगीत देखील दिलं होतं. 

हेमंत कुमार आणि किशोर कुमार यांचा प्रवास समांतर रित्या चालू होता.  तरी त्यांनी एकमेकांसोबत काही चित्रपटांमध्ये काम केले होते. किशोरकुमार ने हेमंत कुमार यांच्या संगीत नियोजनात काही गाणी गायली तर हेमंत दा किशोर कडे गायले! कधी कधी एखाद्या तिसऱ्या  संगीतकाराकडे या दोघांची एकत्रित द्वन्द्व गीते होती. हे दोघे पहिल्यांदा बिमल रॉय यांच्या ‘नोकरी’(१९५४) या चित्रपटापासून एकत्र आले.  खरं तर या चित्रपटाला संगीत सलील चौधरी यांचे होतं. या चित्रपटात किशोर कुमार यांचे एक अप्रतिम गाणे होते.  ‘छोटासा घर होगा बादलो की छाव मे..’ हे गाणं चित्रपटात त्यांच्यावरच चित्रित झालं होतं.  याच गाण्याचा सॅड व्हर्जन हेमंत कुमार यांनी गायलेले होते यानंतर १९५६ साली किशोर कुमार पहिल्यांदा हेमंत कुमार यांच्या संगीत नियोजना खाली गाणे गायले.  चित्रपट होता ‘बंदी’.  यानंतर पुढच्या वर्षी ‘मिस मेरी’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी हेमंत कुमार यांच्या संगीतात ‘गाना न आया बजाना न आया दिलबर को अपना बनाना न आया..’  हे गाणं गायलं.

याच वर्षीपासून किशोर कुमार यांनी बंगालीमध्ये देखील पार्श्वगायत सुरू केले.  चित्रपट होता ‘लुका छोरी’ या चित्रपटात किशोर कुमार यांनी पाच गाणी गायली होती.  या चित्रपटाला संगीत हेमंत कुमार यांचं होतं.  यात किशोर कुमार यांनी पहिल्यांदा  रवींद्र संगीता तील एक गाणे देखील गायले होते जे त्या काळी खूप लोकप्रिय झाले होते.  १९६० साली ‘गर्लफ्रेंड’ या किशोर कुमार आणि वहिदा रहमान यांच्या चित्रपटाला हेमंत कुमार यांचे संगीत होते.  यात एक अप्रतिम युगल गीत होते.  ‘ कशती का  खामोश सफर है शाम भी है तन्हाई भी  दूर किनारे पर बजती है लहरो  की शहनाई भी आज मुझे कुछ कहना है..’  हे किशोर कुमार आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेले गाणं आज देखील रसिकांच्या मनात खोलवर रुजलेलं आहे. हे गाणे साहिरने लिहिलं होतं.

================================

हे देखील वाचा : Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य सिनेमा!

================================

1961 साली Ektuku Choya Lageया बंगाली चित्रपटात किशोर कुमार आणि विश्वजीत यांनी अभिनय केला होता.  हा चित्रपट बंगालमध्ये प्रचंड गाजला या चित्रपटात किशोर कुमार यांची अप्रतिम गाणी होती.  या चित्रपटाला संगीत हेमंत कुमार यांचे होते दोन मित्रांच्या मैत्री वरील हा चित्रपट बंगालमधील एक माईल स्टोन सिनेमा ठरला.  १९६८ साली ‘दो  दुनी  चार  या चित्रपटाला हेमंत कुमार यांचे  संगीत होतं.  यात ‘हवाओपे लिख दो हवाओ के नाम ही किशोर कुमार यांचं गाणं प्रचंड गाजलं .  यानंतर १९६९ साली असित सेन दिग्दर्शित ‘खामोशी’ या चित्रपटातील ‘वो  शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है..’  हे गाणं तर किशोर कुमारच्या टॉप टेन गाण्यापैकी एक बनले.  १९७० साली ‘राहगिर’ नावाचा एक चित्रपट आला होता. यामध्ये किशोर कुमारने हेमंत कुमारच्या संगीत नियोजना खाली ‘वैद के  पल्ले पडे’ हे विनोदी गाणे गायले होते. 

================================

हे देखील वाचा : Madhumati : मधील हे गाणे बिमल रॉय यांनी का अर्धवट चित्रित केले?

================================

१९७२ साली ‘बीस साल पहले’ या चित्रपटासाठी किशोर कुमारने गाणे गायले. याच वर्षी आनंदिता या बंगाली चित्रपटातील ‘ओगो निवेदिता’ हे गाणं गायलं जे बंगालमध्ये आज देखील लोकप्रिय आहे.हा चित्रपट हेमंतकुमार यांनीच दिग्दर्शित केला होता. १९७७ साली हेमंतकुमार यांच्या संगीत नियोजनात ‘प्रॉक्सी’ या चित्रपटात किशोरणे एक गाणे गायले होते. हे हेमंतदा कडील  त्यांचे शेवटचे गाणे. यानंतर आर डी बर्मन यांनी १९७९ साली ‘चोर हो तो ऐसा ‘ या सिनेमात या दोघांकडून एक मिश्र गीत गावून घेतले. या दोघांचे हे दुसरे आणि शेवटचे द्वन्द्व गीत ठरले. किशोर कुमारने जसे हेमंत कुमारच्या संगीत नियोजनात गाणी गायली तशीच दोन गाणी हेमंत कुमार यांनी देखील किशोर कुमार यांच्या संगीत नियोजना खाली केली हे चित्रपट होते ‘दूर गगन की छाव मे’ आणि ‘दूर का राही’ या दोन्ही चित्रपटातील टायटल सॉंग हेमंत कुमार यांनी गायले होते!

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Entertainment News hemant kumar hemant kumar songs Kishore Kumar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.