फोर्ब्स मासिकात अक्षयचा डंका….
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड़ करणारा अक्षय कुमार आता फोर्ब्स मासिकामध्येही मानाच्या जागी आला आहे. फोर्ब्सनं नुकतीच सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांची यादी जाहीर केली. त्यात आपले खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार सहाव्या क्रमांकावर आहेत. 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 362 करोड रुपये एवढी अक्षयच्या कमाईची नोंद फोर्ब्समध्ये झाली आहे. विशेष म्हणजे शहारुख खान, सलमान खान आणि अमिर खान ही खानमंडळी अक्षयच्या आसपासही नाहीत.
दरवर्षी किमान चार चित्रपट अक्षयचे मोठ्या पडद्यावर येतात. यातील बहुतेक चित्रपट हे करोडो रुपये बॉक्सऑफीसवर कमवातात. यावर्षी कोरोनामुळे चित्रपट जगताला मोठा फटका बसला. अनेकांचे करोडेचे नुकसान झाले. पण अक्षयची बातच वेगळी. कोरोनामुळे जवळपास सहा महिने स्टार मंडळींना घरात बसवले. पण या घरात बसण्याच्या काळात अक्षयनं त्याच्या आगामी चित्रपटातील भूमिकांवर लक्ष दिलं.
त्याचे दोन ऐतिहासीक चित्रपट येणार आहेत. या चित्रपटांसाठी अभ्यास आवश्यक असतो. लॉकडाऊनच्या काळात अक्षयनं या स्क्रीप्टचा चांगला अभ्यास केला. लॉकडाऊनमध्ये थोडी सूट मिळाल्यावर लक्ष्मी चित्रपटाच्या शूटसाठी तो संपूर्ण युनिटला घेऊन परदेशात गेला. तिथे शूट पूर्ण केलं. आणि लक्ष्मी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजही केला. लक्ष्मी चित्रपटाच्या निमित्तानं अक्षयकुमार सर्वाधिक ट्रोल झाला. त्याला चित्रपटाचे नावही बदलावे लागले. अक्षयचा सर्वाधिक बकवास चित्रपट असा शेरा लक्ष्मी चित्रपटवर बसला. तरीही या चित्रपटानं अक्षयला पैसा वसूल कमाई करुन दिली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक ओपनिंग मिळणारा चित्रपट म्हणून लक्ष्मीची नोंद झाली. एवढ्या वादळात अक्षयमात्र त्याच्या आगामी चित्रपटाच्या तयारीला लागलाही. त्याच्या याच स्वभावामुळे त्याला सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्यांच्या यादीत बसवलं आहे.
हे वाचलंत का: रामसेतु…नवीन वाद… सच या कल्पना. ही टॅग लाईन वादाचा विषय होणार ?
लवकरच अक्षय कृती सेन बरोबर बच्चन पांडे, सारा अली खान आणि धनुष सोबत अतरंगी रे, वाणी कपूर सोबत बेल बॉटम, आणि मिर वर्ल्ड मानुषी छिल्लर बरोबर पृथ्वीराज या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. अक्षयसोबत एकही बॉलिवूडचा अभिनेता या यादीत नाही. सलमान खानचा राधे चित्रपट दिवाळीला येणार होता. मात्र कोरोनाचा फटका राधेला बसला. सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण चालू आहे. याव्यतिरिक्त सलमानचा बिग बॉस हा शो चालू आहे. अमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे सर्व शुटींग नुकतेच पूर्ण झाले आहे. मोजकेच चित्रपट देऊनही अमिर खान कमाईमध्ये सलमान आणि शहारुखच्या वरच्या स्थानी आहे.
फोर्ब्सच्या यादीत अक्षयच्या पुढे सर्व हॉलिवूडस्टारचा नंबर लागतोय. त्यातली पहिली जागा पटकावलीय ती दि रॉकनं अर्थात ड्वेन जॉनसन याने 87.5 मिलियन डॉलरची कमाई करणारा ड्वेन फोर्ब्सच्या पहिल्यास्थानावर आहे. जॉनसनचा उल्लेख महान कुस्तीवीर म्हणून करण्यात येतो. त्याचे द रॉक सेज हे पुस्तक अनेक वर्ष बेस्ट सेलरच्या यादीत होते. द स्कोर्पियन किंग, द रनडाउन, बी कूल, वाकिंग टाल, ग्रिडआयरन गैंग, द गेम प्लैन, गेट स्मार्ट, रेस तीसरी दुनिया तक, प्लैनेट 51, टूथ फेरी, डूम, द ऑदर गाईज़, फास्टर या त्याच्या चित्रपटांनी करोडोची कमाई केली आहे. द रॉक पाठोपाठ रेयान रेनॉल्ड (71.5 मिलियन डॉलर), मार्क वाह्लबर्ग (58 मिलियन डॉलर), बैन अफ्लैक (55 मिलियन डॉलर) आणि विन डीजल (54 मिलियन डॉलर) या हॉलिवूडच्या अभिनेत्यांनी पहिल्या पाचमध्ये फोर्ब्स मासिकात नंबर लावला आहे.