Dhadak 2 : तृप्ती डिमरीच्या रखडलेल्या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाचा

Chhatrapati Shivaji Maharaj : असा आहे शिवकाळाच्या चित्रपटांचा इतिहास !
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय! त्यांचा इतिहास म्हणजे आपल्या सर्वांसाठीच एक प्रेरणा आहे. हीच प्रेरणा आपल्याला कधी साहित्यरुपात वाचायला मिळाली, गडकिल्ल्यांमध्ये अनुभवायला मिळाली, तर कधी सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शिवरायांवर आजपर्यंत कित्येक मराठी, हिंदी, तेलुगु भाषेत चित्रपट आले. काही महिन्यांपूर्वी कांतारा फेम रिषभ शेट्टीने ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने राजा शिवाजी चित्रपट घेऊन येणार असं त्याने जाहिर केलं होतं. आणि २०२६ मध्ये महाराष्ट्र दिनी ‘राजा शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मराठीसह बॉलीवूडला शिवरायांच्या चित्रपटाची ओढ आता जरी लागली असली, तरी त्यांच्यावर आधारित चित्रपटांना १०० वर्षांचा इतिहास आहे. जाणून घेऊयात शिवरायांवर आधारित चित्रपटांचा प्रवास… (Historical movies history)

छत्रपती शिवाजी महाराज जसे एक विशाल व्यक्तिमत्त्व आहेत, तसेच त्यांच्यावर आधारित असलेले चित्रपटदेखील भव्य दिव्य आहेत, आणि याची मुहूर्तमेढ रोवली बाबुराव पेंटर यांनी, १९२३ साली व्ही. शांताराम यांच्यासोबत त्यांनी ‘सिंहगड’ हा चित्रपट तयार केला होता. यानंतर महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून ‘कल्याण खजिना’, ‘नेताजी पालकर’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ असे चित्रपट तयार करण्यात आले. या सर्वच सायलेंट फिल्म्स होत्या. १९३० साली प्रभात फिल्म्स कंपनीने आणि व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘उदयकाल’ हा पूर्णपणे शिवरायांच्या इतिहासावर आधारित असलेला पहिला चित्रपट आला. यानंतर ‘भवानी तलवार’, ‘स्वराज्याच्या सीमेवर’, ‘शककर्ता शिवाजी’, ‘रायगड’, ‘भगवा झेंडा…’ असे अनेक चित्रपट आले. पण मार्केट खाल्लं १९३२ सालच्या व्ही शांताराम यांच्या ‘सिंहगड’ या नव्याने बनवलेल्या चित्रपटाने… यामध्ये मास्टर विनायक यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती. १९४३ साली भालजी पेंढारकर यांनी शिवरायांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं धनुष्य पेललं आणि बहिर्जी नाईक हा मुव्ही बनवला. यामध्ये सुर्यकांत मांढरे यांनी शिवरायांची भूमिका केली होती.(Marathi historical movies)

================================
हे देखील वाचा: Sharad Kelkar : ‘तान्हाजी’नंतर महाराज का साकारले नाही? शरद म्हणाले….
=================================
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्या पुढच्या काही वर्षात ‘जय भवानी’, ‘मर्द मराठा’, ‘स्वराज्याचे शिलेदार’ असे काही चित्रपट आले. पण १९५२ साली शिवरायांवर एक असा चित्रपट आला, ज्यामुळे चित्रपटसृष्टीचा चेहरामोहराच बदलला. भालजी पेंढारकर यांच्या ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाने इतिहासच घडवला. चंद्रकांत मांढरे यांनी या चित्रपटात साकारलेली शिवरायांची भूमिका अजरामर झाली. आजही सिनेमा इतिहासात शिवरायांची सर्वश्रेष्ठ म्हणून हीच भूमिका गणली जाते. याचवर्षी बॉलीवूडमध्ये शिवरायांच्या इतिहासावर आधारित पहिला चित्रपट आला होता आणि याचंही नाव ‘छत्रपती शिवाजी’ होतं. यामध्ये पृथ्वीराज कपूर यांनी शिवरायांची भूमिका केली होती. (celebrity news)

त्यानंतर ६०च्या दशकातही शिवरायांवर आधारित चित्रपट येतच राहिले. ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘रायगडाचा राजबंदी’ असे काही चित्रपट आले. यावेळी पहिल्यांदाच तेलुगु भाषेत असा चित्रपट आला, ज्यामध्ये शिवरायांचा भूमिका एका सुपरस्टारने साकारली, त्यांचं नाव शिवाजी गनेसन ! १९७३च्या ‘भक्त तुकाराम’ या चित्रपटात गनेसन यांनी साकारलेले शिवराय मराठी सिनेसृष्टीच्या पलीकडे पोहोचले. १९८७ साली पुन्हा एकदा हिंदीमध्ये ‘शेर शिवाजी’ नावाचा चित्रपट आला यामध्ये परीक्षित साहनी यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती. अनेकांना परीक्षित साहनी माहित नसतील. थ्री इडीअटसमध्ये फरहान कुरेशीच्या वडिलांचा रोल करणारे प्रसिद्ध अब्बा म्हणजेच परीक्षित साहनी! (Bollywood tadaka)

८०च्याच दशकात दूरदर्शनवर ‘भारत एक खोज’ कार्यक्रम सुरु झाला होता. ज्यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका नसिरुद्दीन शाह यांनी केली होती. १९८७ साली बाबासाहेब पुरंदरे यांच्या कथेवर आधारित ‘सर्जा’ नावाचा एक मराठी चित्रपट आला होता, ज्यामध्ये रविंद्र महाजनी यांनी शिवरायांचा रोल केला होता. यानंतर जवळपास २० वर्ष मराठी, हिंदी किंवा इतर इंडस्ट्रीत शिवरायांवर एकही चित्रपट आला नाही. आणि २००९ साली एक चित्रपट आला, जो all टाईम ब्लॉकबस्टर ठरला, तो म्हणजे ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ ! यामध्ये महेश मांजरेकर यांनी शिवराय साकारले होते. या चित्रपटाने biggest ओपनिंग विकेंड कलेक्शनचा रेकॉर्ड केला होता. यानंतर २०११ ला यशवंत भालकर दिग्दर्शित ‘राजमाता जिजाऊ’ हा चित्रपट आला होता. मराठीत पहिल्यांदाच शिवरायांच्या चित्रपटाची सिरीज करण्याचा निश्चय केला आणि तो यशस्वी झाला. दिग्पाल लांजेकरने शिवराज अष्टक ही शिवाजी महाराजांच्या आठ ऐतिहासिक प्रसंगांची चित्रपट सिरीज सुरु करत आपला पहिला ‘फर्जंद’ हा चित्रपट आणला आणि तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. यामध्ये चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारली होती. (Raja Shivaji movie)

फर्जंदनंतर दिग्पालचाच ‘फत्तेशिकस्त’ आला. आणि त्याचवर्षी प्रसाद ओकचा हिरकणी हा मुव्ही आला, ज्यांनी बॉक्सऑफिसवर चांगलं कलेक्शन केलं. २०२० साली बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच शिवकाळावर आधारित सर्वात मोठा मुव्ही आला, तो म्हणजे ‘तान्हाजी – द अनसंग warrior’ ! ओम राऊतने डीरेक्ट केलेल्या या मुव्हीमध्ये तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अजय देवगनने केली होती, तर शिवाजी महाराज साकारले शरद केळकरने ! या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर ३७० कोटींचा गल्ला जमवला होता. २०२२ साली दिग्पालचा ‘पावनखिंड’ हा मुव्ही आला होता ज्याने तब्बल ७५ कोटींची कमाई केली होती. यानंतर दिग्पालचे ‘शेर शिवराज’ आणि ‘सुबेदार’ हे चित्रपट आले होते, जे फारसे चालले नाहीत. दिग्पालच्या सर्वच चित्रपटांमध्ये चिन्मय मांडलेकरनेच शिवरायांची भूमिका केली होती. (Entertainment news)

२०२२ सालीच दिग्दर्शक अभिजित देशपांडेचा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आला होता. ज्यामध्ये शिवरायांची भूमिका सुबोध भावेने केली होती, आणि शरद केळकरने बाजीप्रभू देशपांडे साकारले होते. यानेही बॉक्स ऑफिसवर बराच गल्ला जमवला होता. याच वर्षात आणखी एक चित्रपट आला होता, ज्याचं नाव सरसेनापती हंबीरराव ! यामध्ये शिवराय आणि संभाजी महाराज दोघांची भूमिका गश्मीर महाजनीने केली होती. अमोल कोल्हे यांनी सिरीयलमध्ये साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. राजकारणात आल्यानंतर त्यांचा त्यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट आला होता. स्टार प्लसवर टेलिकास्ट झालेलं महाभारत तर सर्वांनाच माहितीये. यामध्ये भगवान कृष्ण यांची भूमिका करणारा सौरभ जैन त्याच्या उत्तम अभिनयाने घराघरात पोहोचला. आता त्यालाही शिवरायांची भूमिका मिळाली आहे. ‘वीर मुरारबाजी – पुरंदर की युद्धगाथा’ या चित्रपटात तो शिवराय साकारणार आहे. (Chhatrapati Shivaji maharaj)
================================
हे देखील वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj : शिवराय साकारलेल्या ’या’ अभिनेत्यांना पूजतात!
=================================
आता लवकरच रितेश देशमुख ‘राजा शिवाजी’ चित्रपट दिग्दर्शित करणार असून त्यात स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांची तो भूमिका साकारणार आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, जिनिलिया देशमुख, भाग्यश्री असे मराठी-हिंदीतील मातब्बर कलाकार असणार आहेत.

मराठी-हिंदानंतर दाक्षिणात्य चित्रपटांकडून शिवरायांचा इतिहास मांडण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आबे. ‘कांतारा’ गाजवणारा कन्नड इंडस्ट्रीचा स्टार ऋषभ शेट्टीने शिवरायांवर चित्रपट करणार असल्याची घोषणा केली आहे. ‘द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज’ असं या चित्रपटाचं नाव असून संदीप सिंग यांचं दिग्दर्शन करणारे. एकंदरीत २०२५, २६ आणि २७ या तिन्ही वर्षांमध्ये शिवरायांवर बॉलिवूडमध्येच असे बिग प्रोजेक्ट बनत आहेत. पण प्रश्न असा पडतो, या चित्रपटांमध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन इतिहासाची मोडतोड करणं निर्माते थांबवतील का ? कारण तान्हाजी हा चित्रपट असाच लिबर्टी घेऊन बनवला गेला होता, ज्यामध्ये कित्येक प्रसंग चुकीचे होते आणि यावर इतिहासकारांनी आक्षेप घेतला होता.(Historical movies)
================================
हे देखील वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj : ‘या’ कलाकारांनी साकारली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
=================================
गेल्या १०० वर्षात जवळपास १५ पेक्षा जास्त अभिनेत्यांनी शिवरायांची भूमिका केली आहे. ज्यांनी उत्तम साकारली, त्यांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. शिवरायांचा इतिहास हा अनेकांसाठी जितका प्रेरणादायी तितकाच संवेदनशील आहे. अनेक जण इतिहासाला हानी न पोहोचवता चित्रपट बनवण्यात यशस्वी झाले. मात्र काही निर्मात्यांनी चुकीचा इतिहास सर्रास वापरला त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये हे शिवधनुष्य या दिग्गजांना पेलवतं का? हे महत्त्वाचं ठरणार आहे.(Bollywood news)