
Housefull 5 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; कोण आहे ७०० कोटींच्या संपत्तीचा वारसदार जॉली?
बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा मल्टिस्टारर चित्रपट भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी टीझर प्रदर्शित झाला होता. यात एका माणसाचा खुन होतो आणि त्याचा तपास चित्रपटात होणार अशी हिंट देण्यात आली होती. आणि प्रेक्षकांची आणखी उत्कंठा वाढवणारा ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात दमदार अॅक्शन, सस्पेन्स आणि हास्याचे स्फोट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.(Entertainment tadaka)

हाऊसफुल्ल ५ चित्रपटाची विशेष खासियत म्हणजे हा चित्रपटाची संपूर्ण कथा एका जहाजावर घडणार आहे. विनोदी मर्डर मिस्ट्री असणाऱ्या या चित्रपटात तब्बल १८ सुपरस्टार दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ६९ बिलियन पाउंड्सचे मालक असलेले रंजीत दोबरिया हे एका भल्या मोठ्या शिपवर शंभराव्या वाढदिवसाची पार्टी देत असतात. याच पार्टीत ते आपला खरा वारसदार म्हणजे त्यांचा मुलगा ‘जॉली’ असल्याचं जाहीर करतात. पण, खरा गोंधळ इथूनच सुरु होतो. कारण रितेश देशमुख (Riteish Deshmukh), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अक्षय कुमार (Akshay kumar) हे तिघे आपणच ‘जॉली’ असल्याचा दावा करतात आणि मग होतो एक मर्डर. आता खुन कुणाचा होतो? आणि का होतो? आणि महत्वाचं म्हणजे ७९७ कोटींच्या संपत्तींचा वारसदार असणारा खरा जॉली नेमका कोण आहे? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातून लवकरच मिळणार आहेत.(Bollywood news)

तरुण मनसुखानी दिग्दर्शित हाऊसफुल्ल ५ चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, शर्यस तळपदे, डिनो मोरिया, नर्गिस फाखरी, चित्रांगदा सिंग, सोनम बाजवा, साउंडर्या शर्मा आणि जॉनी लिव्हर अशी तगडी स्टारकास्ट आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ बऱ्याच वर्षांनी स्क्रिनवर एकत्र झळकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाचं बजेट ३७५ कोटी असून आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती कमाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.(Housefull 5 movie cast)
================================
हे देखील वाचा: Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची भूमिका साकारणार?
=================================
२०१० मध्ये आलेल्या ‘हाऊसफुल’ (Housefull) चित्रपटाची ही फ्रॅचायझी आहे. पहिला चित्रपट यशस्वी झाल्यानंतर ‘हाऊसफुल २’ रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय, रितेश, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, ऋषी कपूर, रणधीर कपूर, मिथुन चक्रवर्ती होते. त्यानंतर ‘हाऊसफुल ३’ आणि ‘हाऊसफुल ४’ हे चित्रपट देखील आले. हाऊसफुल्लच्या चारही भागांनी बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता ‘हाऊसफुल्ल ५’ काय धमाल घडवून आणणार हे पाहण्यासाठी ६ जून २०२५ ची वाट पाहावी लागणार आहे.(Housefull movie franchisee)