
Housefull चित्रपटाच्या फ्रेंचायझीने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर कमावले ७९० कोटी!
विनोदी चित्रपटांच्या यादीत ‘हाऊसफुल्ल’ (Housefull movie) चित्रपटाची फ्रेचांयझी प्रेक्षकांचं मन जिंकण्यात चांगलीच यशस्वी ठरली आहे. २०१० मध्ये ‘हाऊसफुल्ल १’ (Housefull 1) आला होता आणि प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेने खरंच वेड लावलं होतं. अक्षय कुमारला (Akshay Kumar) आत्तापर्यंत अॅक्शन आणि ‘हेरा फेरी’ (Hera Pheri) चित्रपटाच्या विनोदी अॅंगलने पाहणाऱ्या त्याच्या चाहत्यांना ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटातून वेगळाच अक्षय कुमार दिसला होता. पहिल्या भागाच्या अफाट यशानंतर एकामागून एक ४ भाग आत्तापर्यंत आले असून बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल चित्रपटाच्या फ्रेचायझीने जवळपास ४५० कोटींच्या पुढे आत्तापर्यंत लाईफटाईम कमाई केली आहे. आता लवकरच ‘हाऊसफु्लल ५’ (Housefull 5) येणार आहे. जाणून घेऊयात ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटांनी आत्तापर्यंत किती कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.(Housefull movie franchisee)

‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाच्या फ्रेचायझीने आत्तापर्यंत जगभरात ७९० कोटींच्या पुढे कमाई केली असून जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत या चित्रपट फ्रेचायझीचा ७वा क्रमांक लागतो. २०१० मध्ये आलेल्या ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, लारा दत्ता, दीपिका पादूकोण, अर्जून रामपाल आणि जिया खान, चंकी पांडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २०१० मध्ये हाऊसफुल्लने पहिल्या दिवशी १० कोटी कमावले होते. तर एकूण ७ आठवडे थिएटर गाजवणाऱ्या या चित्रपटाने ७५.७५ कोटी कमावले होते.(Bollywood news)

यानंतर २०१२ मध्ये ‘हाऊसफुल्ल २’ (Housefull 2) आला होता. ज्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, असीन, जॅकलिन फर्नांडिस, जॉनी लिव्हर, झरिन खान ऋषी कपूर, रणधीर कपूर, मिथून चक्रवर्ती, चंकी पांडे, बोमन इराणी, रणजीत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हाऊसफुल्ल २ ने पहिल्या दिवशी १२.१९ कोटी कमवत ८ आठवडे थिएटर भंडावून सोडलं होतं. २०१२ मध्ये आलेल्या या चित्रपटाने एकूण ११२ कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती.(Bollywood news update)
================================
हे देखील वाचा: Multi Star Cast Movies – भारतीय चित्रपटसृष्टीचा बदलता काळ!
=================================
‘हाऊसफुल्ल’ १ आणि २ च्या यशानंतर २०१६ मध्ये ‘हाऊसफुल्ल ३’ (Housefull 3) आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाकरी, बोमन इराणी, चंकी पांडे हे कलाकार होते. या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५.२३ कोटी कमावले होते. ६ आठवडे थिएटरमध्ये सुरु असणाऱ्या हाऊसफुल्ल ३ ने ११०.२० कोटींचं कलेक्शन केलं होतं.(Entertainment)

तर, २०१९ मध्ये ‘हाऊसफुल्ल ४’ (Housefull 4) मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, क्रिती खरबंदा आणि पुजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आधीच्या तीन भागांपेक्षा पहिल्या दिवशी हाऊसफुल्ल ४ ने १९.०८ कोटींची सर्वाधिक कमाई केली होती. ७ आठवडे थिएटरमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटाने २१०.३ कोटी कमावले होते. (Entertaiment trending news)

आता लवकरच हाऊसफुल्लच्या फ्रेंचायझीमधील पाचवा भाग येणार असल्यामुळे नक्कीच प्रेक्षकांची ‘हाऊसफुल्ल ५’ कडून फार अपेक्षा आहेत. मल्टिस्टार कास्ट (Multi Star Cast movies) असणाऱ्या या चित्रपटात तब्बल १८ मातब्बर कलाकार दिसणार आहेत. खरं तर ‘हाऊसफुल्ल’ चित्रपटाने प्रत्येक भागात नाविन्य दाखवलं होतं. यांची एक खासियत म्हणजे प्रत्येक भागाचा दिग्दर्शक वेगळा होता. ‘हाऊसफुल्ल १’ चं दिग्दर्शन राजेश वर्मा, ‘हाऊसफुल्ल २’ चं साजिद खान, ‘हाऊसफुल्ल ३’ चं, साजिद आणि फरहाद सामजी, ‘हाऊसफुल्ल ४’ चं फरहाद सामजी आणि आता ‘हाऊसफुल्ल ५’ चं तरुण मनसुखानी करणार आहेत. (Housefull movie box office collection)

‘हाऊसफुल ५’(Housefull 5) या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, भारतीय चित्रपटांच्या इतिहात पहिल्यांदाच प्रेक्षकांना दोन क्लायमॅक्स पाहता येणार आहेत आणि त्यांची निवडही ते स्वत:च करुच शकतात. त्यामुळे ढिगभर विनोदांसह मर्डर मिस्ट्री असणारा २०२५ मधील आत्तापर्यंतचा ‘हाऊसफुल्ल ५’ बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार का हे पाहण्याची सगळ्यांची उस्तुकता लागली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार,अभिषेक बच्चन ,जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त ,नर्गिस फाखरी, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, चित्रगंधा सिंग असे अनेक कलाकार दिसणार आहेत. ६ जून २०२५ रोजी आता हाऊसफुल्ल ५ काय धुमाकूळ घालणार हे पाहायलाच हवं. (Housefull 5 movie cast)