Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

अनाथ लहान मुलाच्या भावविश्वाचा उत्कट प्रवास मांडणारा ‘हा’ चित्रपट टॅक्स फ्री कसा झाला?
भारतीय चित्रपटाच्या इतिहासाचा आढावा घेताना काही व्यावसायिक यश न मिळालेले परंतु दर्जेदार असलेल्या चित्रपटांची देखील दखल घ्यावी लागते. अलीकडे असंच सिने इतिहास धुंडाळताना सावन कुमार टाक यांचा पहिला चित्रपट ‘नौनिहाल’ ची आठवण झाली. खरंतर हा चित्रपट आज कुणालाही आठवण्याची सुताराम शक्यता नाही. पण या चित्रपटात मांडलेला विषय खूप महत्त्वाचा होता. एका अनाथ मुलाच्या वेदना चित्रपटात दाखवल्या होत्या. हा सिनेमा तसे कुठलेच व्यावसायिक मूल्य घेऊन बनला नव्हता. त्यामुळे या चित्रपटाच्या यशाची काहीच कोणाला खात्री नव्हती. पण हळूहळू माउथ पब्लिसिटीतून या चित्रपटाला यश मिळत गेले. या सिनेमाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी टॅक्स फ्री केला. कोणता होता तो चित्रपट आणि काय होती त्याची नेमकी स्टोरी?

निर्माता सावन कुमार टाक यांच्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा खूप मोठा प्रभाव होता. त्या काळात पंतप्रधानांच्या प्रभावात संपूर्ण देशच होता. हिच थीम घेऊन सावन कुमार यांनी हा चित्रपट बनवला होता. चित्रपटाची कथा खूप भावस्पर्शी होती. एक अनाथ मुलगा आपल्या प्राचार्यांना विचारतो की “बाकी सर्व विद्यार्थ्यांना त्याचे पालक भेटायला येतात. मला कधीच कोणी कसं भेटत नाही?”. तेव्हा शाळेचे प्रिन्सिपल थोडेसे दुःखी होतात. कारण याला काय उत्तर द्यावे तरी काय? त्यानंतर ते त्या मुलाला घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या फोटो समोर उभा करतात आणि म्हणतात,” हे चाचा नेहरू आहेत. आपले पंतप्रधान आहेत. हे सर्व मुलांचे काका आहेत. तुझे देखील काका आहेत.” त्यांच्या उत्तराने हा लहान मुलगा खूपच भारावून जातो. जगात कुणीतरी आपले आहे हि भावना त्याच्या बालमनाला खूप सुखावून जाते. आणि आपल्या चाचा नेहरूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागतो.
या पुढचा त्याचा प्रत्येक दिवस हा पंतप्रधानांची भेट कशी होईल? आपल्या काकांची भेट कशी होईल याचाच तो विचार करू लागतो. त्याला समजते पंडित नेहरू मुंबईला येणार आहे आणि चौपाटीवर त्यांचे भाषण होणार असते. तो मुलगा पाचगणी येथून मुंबईला जातो. रस्त्यात असंख्य अडचणी येतात. त्याचे पैसे चोरले जातात. तो अनंत अडचणी पार करत चौपाटीला पोहोचतो. पण तिथली सभा संपलेली असते आणि नेहरू दिल्लीला निघून गेलेले असते. तिथे त्याला एक वयस्कर व्यक्ती (हरींद्रनाथ चट्टोपाध्याय)भेटते. त्या व्यक्ती सोबत तो दिल्लीला जाण्याचा आणि नेहरूंना भेटण्याचा प्लॅन करतो. त्याची पं नेहरू यांची भेट होते का ? यावरच संपूर्ण सिनेमाची स्टोरी आहे.
================================
हे देखील वाचा : ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित Amitabh-Jaya Bachchan यांचा हा सिनेमा अर्धवट का राहिला?
=================================
या सिनेमात शेवटी एक गाणे होते. म. रफी यांच्या स्वरातील ‘मेरी आवाज सुनो…’ या गाण्याच्या चित्रीकरणात सावन कुमार यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची अंत्ययात्रा दाखवली होती. प्रत्येक भारतीय हे गीत पडद्यावर पाहताना अक्षरशः थिएटरमध्ये रडत होते. रफी यांनी अतिशय भावममधुर स्वरात (राग यमन) हे गाणं लिहिलं होतं कैफी आजमी यांनी. आणि मोहम्मद रफी यांनी अतिशय दर्दभऱ्या स्वरात गायलं होत. चित्रपटाला संगीत मदन मोहन यांची होती. हा चित्रपट प्रदर्शित झाला फारसा चालला नाही पण त्याच काळात निर्माता सावन कुमार यांना एक मित्र भेटला आणि तो म्हणाला “तुम्ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटून ह चित्रपट टॅक्स फ्री करण्याची विनंती करा!” त्यामुळे तरी या चित्रपटाला प्रेक्षकांची उपस्थिती वाढेल”.
सावन कुमार म्हणाले की,” ठीक आहे. पण पंतप्रधान इंदिरा गांधींना मी कसे भेटायचे? माझी काहीच ओळख नाही.” त्यावर याच चित्रपटात काम करणारे कलावंत हरींद्रनाथ चट्टोपाध्याय (जे सरोजिनी नायडू च सख्खे भाऊ होते) त्यांनी इंदिराजींची भेट घडवून देण्याचे ठरवले . सावनकुमार त्यांच्या सोबत दिल्लीला इंदिराजींना भेटले. हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी इंदिरा गांधी ना सांगितले ,” हा नौनिहाल खूप चांगला चित्रपट आहे आणि यात पंडित नेहरू प्रत्यक्ष दिसत जरी नसले तरी संपूर्ण चित्रपट भर त्यांचे अस्तित्व आहे.” इंदिराजी म्हणाल्या,” तुम्ही म्हणताय म्हणजे चित्रपट नक्कीच चांगला असेल!” हरींद्रनाथ चट्टोपाध्याय म्हणाले,” यातील एक गाणे तुम्ही ऐका आणि त्यांनी मेरी आवाज सुनो… हे गाणं ऐकवलं. सोबतच त्यांनी या गाण्याच्या चित्रिकरणाबाबत सांगितले.

इंदिरा गांधी हे गाणे ऐकताना सद्गतीत झाल्या. गंभीर झाल्या. आणि नंतर तर त्यांनी डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या वडिलांची आठवणी ने व्याकूळ झाल्या. त्या पटकन डोळे पुसत आपल्या केबिनमध्ये गेल्या. सावन कुमार यांनी आपला चित्रपट टॅक्स फ्री व्हावा अशी विनंती करणारे पत्र त्यांना आधीच पाठवले. इंदिराजींनी काही वेळाने आतून बाहेर आल्या आणि नमस्कार करीत म्हणाल्या ,” तुमचे काम होऊन जाईल.” नंतर काही दिवसात हा चित्रपट टॅक्स फ्री झाला आणि हळूहळू या चित्रपटातील वेग पकडला. या चित्रपटात मुख्य भूमिका त्या लहान मुलाचीच होती. राजूची हि भूमिका मा. बबलू याने केली होती. (या मास्टर बबलू बाबत फारशी माहिती उपलब्ध नाही त्याचे खरे नाव मनोज त्रिहान होते असे समजते.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
पुण्यातील चित्रपट अभ्यासक कैलास मुंदरा यांच्या मते दहा पंधरा वर्षांपूर्वी याचे नाव पुन्हा एकदा वर्तमानपत्रात गाजले होते. ज्यावेळी काही अवयव ड्रग्स त्याच्याकडे सापडले होते.) या चित्रपटात संजीवकुमार,बलराज सहानी, इंद्राणी मुखर्जी, हरींद्रनाथ चट्टोपाध्याय, असित सेन, जगदीप यांच्या प्रमुख भूमिका होत्या.सिनेमाचे दिग्दर्शक राज मार ब्रास यांचे होते. ‘नौनिहाल’ शब्दाचा अर्थ ‘लहान मूल’ . अनाथ लहान मुलाचे भावविश्व उलगडणारा हा सिनेमा ऑफ बीट शैलीतला होता. सावनकुमार यांनी निर्माण केलेला हा पहिलाच चित्रपट होता. एक वेगळा प्रयत्न होता.