Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

The Kashmir Files चित्रपटाने देशाची मानसिकता कशी बदलली?
२०२२ मध्ये द कश्मिर फाईल्स (The Kashmir Files Movie) हा चित्रपट रिलीज झाला होता… तेथील कश्मिर पंडित यांचं जीवन आणि समाजापासून एका महत्वाच्या घटकाच्या अडचणी या चित्रपटातून मांडण्यात आल्या होत्या… दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) सामाजातील असे विषय ज्यांना आजवर कुणीच वाचा फोडली नव्हती त्यांना चित्रपटाचं भव्य व्यासपीठ देत ग्लोबली विषय पोहोचावेत हा त्यांना कायम प्रयत्न त्यांनी दाखवला आहे. त्यांच्या चित्रपटांनी कायमच चर्चेला वाव दिला असून ‘द काश्मीर फाइल्स’ हा त्यांचा असाच एक चित्रपट, जो केवळ ब्लॉकबस्टर ठरला नाही, तर अनेकांच्या मनाला भिडला आणि भारतीय जनतेला एका कटू सत्याशी समोरासमोर आणून ठेवले.(Bollywood)

सामाजिकदृष्ट्या ज्वलंत विषयांवर भाष्य करणाऱ्या द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा कसा लोकांवर परिणाम झाला याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिलं आहे… एका पॉडकास्टमध्ये विवेक अग्निहोत्रींनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रभावाबद्दल आपले विचार मांडले. “तुम्ही एखाद्या काश्मिरी पंडिताला विचारून बघा, त्याला या चित्रपटातून काय मिळालं,” असं म्हणत त्यांनी स्वतःच एक अनुभव शेअर केला. “तुम्ही गिरीजा देवीचा शेवटचा सीन पाहिला आहे? त्यांचं कुटुंब विशेषतः त्यांची बहीण मला एक ईमेल पाठवते. त्या म्हणाल्या, ‘गेल्या ३० वर्षांमध्ये आमच्या घरी कोणीही दीदीचं नाव घेत नव्हतं. पण तुमचा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच झूम कॉलवर एकत्र आलो… आणि संपूर्ण रात्र फक्त रडत होतो. त्यातून आम्हाला थोडा सुकून मिळाला.’”(Entertainment news)

अग्निहोत्री पुढे म्हणाले, “हा फक्त काश्मिरी पंडितांचाच नाही, तर संपूर्ण भारताचाही प्रश्न आहे. आधी जेव्हा काश्मीरचा उल्लेख यायचा, तेव्हा जगात ‘फ्री काश्मीर’सारख्या घोषणांचा गजर असायचा. पण या चित्रपटानंतर जगभरात – लंडनच्या पार्लमेंटपासून ते जर्मनीपर्यंत – भारताचा एक नवा दृष्टिकोन समोर आला. जनजागृती झाली. यासीन मलिकला आज तुरुंगात डांबण्यात आलं आहे, काश्मिरी पंडितांसाठी सरकारने ट्रिब्यूनल स्थापन केलं आहे. आज काश्मीरवर बोलणं ही गौरवाची बाब मानली जाते. या चित्रपटाने सिद्ध केलं की, यशासाठी ना मोठे स्टार्स लागतात, ना चमचमता ग्लॅमर. फक्त सत्यात ताकद असावी लागते. आणि ती ताकद लोकांच्या मनापर्यंत पोहोचतेच”.(Bollywood masala)
================================
हे देखील वाचा: The Bengal Files: पल्लवी जोशीची ऐतिहासिक भूमिका; साकारणार १०० वर्षांची महिला
=================================
दरम्यान, ‘द कश्मिर फाईल्स’ आणि ‘द ताश्कंद फाईल्स’ नंतर लवकरच विवेक अग्निहोत्री यांना द बंगाल फाईल्स हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे, या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलं असून चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.(The Bengal Files Movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi