“तुमच्या जिभेचा ब्रेक फेल झालाय”; रितेश भाऊंनी घेतली Tanvi Kolte

जेव्हा अमिताभ बच्चन यांना अपयशाच्या गर्तेतून Yash Chopra यांनी बाहेर काढले!
नव्वदचे दशक अमिताभ बच्चन यांच्यासाठी मोठे चॅलेंजिंग होते. या दशकामध्ये त्यांना कधी नव्हे तो अपयशाचा सामना करावा लागला होता. हे अपयश फक्त सिनेमातलंच नव्हतं तर वैयक्तिक जीवनामध्ये देखील त्यांना त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीला आलेल्या आर्थिक नुकसानीमुळे आलेलो होतो अमिताभ बच्चन या नावाची जादू आता ओसरू लागली होती. अमिताभ कर्जाच्या विळख्यात खोल खोल रुतत चालले होते. अशावेळी त्याना आठवण झाली आपले जुने मित्र यश चोप्रा यांची. तब्बल वीस वर्षानंतर हे दोघे एकत्र आले आणि पुन्हा एकदा अमिताभ बच्चन हा सितारा डौलाने नभांगनात तेजाने चमकू लागला. अमिताभ च्या आयुष्यात आलेलं अपयशाचं मळभ दूर करणारा हा सिनेमा होता तरी कोणता?

5 मार्च 1999 या दिवशी अमिताभ बच्चन यश चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले ही फार मोठी घटना होती. आजच्या काळाच्या भाषेत सांगायचं तर ती मोठी ब्रेकिंग न्यूज होती. कारण मागच्या वीस वर्षात या दोघांमध्ये संवाद फारसा होत नव्हता. त्याचं कारण होतं 1981 साली प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा चित्रपट. यश चोप्रा यांचा अतिशय महत्त्वकांक्षी असलेला हा चित्रपट फ्लॉप झाला होता. या अपयशाची कारण शोधताना कळत नकळतपणे दोघांनी एकमेकांवर काही आरोप केले होते. यश चोप्रा यांनी तर खाजगीत असं सांगितलं होतं की आपण आयुष्यात या पुढे कधीही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार नाही.

खरंतर अमिताभ आणि यश चोप्रा हे कॉम्बिनेशन बॉलीवूड मधलं अतिशय सुपरहिट सिनेमा देणार कॉम्बिनेशन होतं. याची सुरुवात 1975 सालच्या ‘दिवार’ या सिनेमा पासून सुरु झाली होती. अमिताभचे सुपरस्टार पद आणखी घट्ट करणारा हा सिनेमा होता. या नंतर 1976 साली ‘कभी कभी’ आला. यात अमिताभ ची भूमिका एका कवी मनाच्या प्रियकराची होती. 1978 साली यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘त्रिशूल’ हा चित्रपट दिग्दर्शित केला हा त्या वर्षातला सुपर डुपर हिट सनेमा होता. अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅन इमेज ला आणखी मोठं करणारा होता. कोळसा खाण दुर्घटने वरील ‘काला पत्थर’ (1979) हा चित्रपट यश चोप्रा यांनीच दिग्दर्शित केला होता. यात अमिताभ बच्चन यांचा रोल अल्टिमेट होता.
================================
================================
एकूणच अमिताभच्या यशाच्या पीक पिरेड मध्ये यश चोप्रा आणि त्यांचे चित्रपट यांचा मोठा वाटा होता. ‘काला पत्थर’ या चित्रपटानंतर यश चोप्रा यांनी एक हळुवार प्रेम कथा पडद्यावर आणण्याचे ठरवले. चित्रपटाचे नाव होतं सिलसिला . अमिताभ बच्चन -जया भादुरी रेखा हा त्या काळातील मीडियामध्ये अत्यंत गाजलेला प्रेमाचा त्रिकोण त्यांनी सिनेमाच्या माध्यमातून पुढे आणण्याचे ठरवलं. खरं तर या चित्रपटाची स्टार कास्ट आधी वेगळी होती पण यश चोप्रा यांनी अमिताभ रेखा यांच्या अफेअर आणि त्यातून होणाऱ्या चर्चा हे सर्व कॅश करून घेण्यासाठी सिलसिला मध्ये या तिघांना एकत्र आणले! चित्रपट खरोखर दृष्ट लागावा इतका चांगला बनला होता पण प्रेक्षकांना मात्र आवडला नाही. चित्रपटाला फारसे व्यावसायिक यश मिळाले नाही. या अपयशाची कारणमीमांसा करताना अमिताभ आणि यश चोप्रा यांच्यातील संबंधात बाधा आली आणि हे दोघे पुन्हा कधीच एकत्र न येण्यासाठी सेपरेट झाले!

पण नियती आपला खेळ खेळत असते. ऐंशी आणि नव्वद च्या दशकात यश चोप्रा यांच्या सिनेमाच्या यशाचा आलेख उंचावणारा होता पण याच नव्वद दशकामध्ये अमिताभ बच्चन अपयश आणि अवहेलना यांनी पुरता बेजार झाला होता. त्यांचे कुठलेच प्रोजेक्ट यशस्वी होत नव्हते. एबीसीएल कंपनी तोट्यात गेली होती. कर्जाचा डोंगर आ वासून होता. अशावेळी त्याला आठवण झाली आपले जुने मित्र यश चोप्रा यांची! आणि अमिताभ यश चोप्रा यांच्या ऑफिसमध्ये गेला 5 मार्च 1999 रोजी! इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर दोघांनाही बरं वाटलं. मधल्या काळातील परिस्थितीने दोघांमधील कटूता कुठल्या कुठे विरघळून गेली होती अमिताभने यश चोप्रांना सांगितले ,”मला आता तुमची गरज आहे!”. त्यावर यश चोप्रा यांनी लगेच सांगितले,” तुझ्यासाठी माझ्याकडे एक चांगली भूमिका आहे!” आणि इथूनच ‘मोहब्बते‘ या चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
================================
================================

‘मोहब्बते’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची चरित्र अभिनेत्याची मध्यवर्ती भूमिका होती. हा चित्रपट मल्टीस्टारर होता शाहरुख खान या चित्रपटाचा नायक होता. हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला नाही त्यांचा मुलगा आदित्य चोप्राने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सिनेमा सुपर डुपर हिट झाला. 2001 साल च्या जुलै महिन्यापासून अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्ही शो सुरू झाला जो आजता गायत चालू आहे. ‘मोहब्बते’ या सिनेमाने आणि ‘केबीसी’ या टीव्ही शो ने अमिताभ बच्चन यांचे स्टार बदलले. आणि अमिताभ बच्चन सेकंड जबरदस्त सुरू झाली.